Budhwar Upay हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. भगवान श्री गणेश हे देवतांचे स्वामी मानले जातात. जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य सुरू करतो तेव्हा सर्वप्रथम आपण श्रीगणेशाची पूजा करतो. मान्यतेनुसार कोणत्याही कामाची सुरुवात श्रीगणेशाची पूजा करून केल्यास त्या व्यक्तीचे काम कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण होते.
तुम्हालाही गणेशाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर गणेशाच्या या मंत्रांचा जप करावा. शास्त्रात गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. या मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गणपतीच्या या मंत्रांबद्दल सांगणार आहोत.
बुधवारी या मंत्राचा जप करा
श्रीगणेश गायत्री मंत्र
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।
गणपतीच्या या मंत्राला गायत्री मंत्र देखील म्हटलं जातं. जर आपल्याला एखाद्या कामात यश मिळवायचे असेल तर या मंत्राचा जप 108 वेळा करावा. अनेक प्रयत्नांनंतरही तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर या मंत्राचा जप केल्याने अडथळे दूर होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो.
तांत्रिक गणेश मंत्र
ॐ ग्लौम गौरी पुत्र,वक्रतुंड,गणपति गुरु गणेश
ग्लौम गणपति,ऋदि्ध पति। मेरे दूर करो क्लेश।।
घरामध्ये काही समस्या येत असतील किंवा जोडीदारासोबत दुरावण्याची परिस्थिती आहे. अशात या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. श्रीगणेशाच्या या मंत्राचा जप केल्याने घरातील संकटे तर शांत होतातच, शिवाय घरावर आशीर्वादही मिळतात.
लक्ष्मी गणेश मंत्र
ॐ श्रीं गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं में वशमानय स्वाहा।
या लक्ष्मी गणेश मंत्रामुळे समाजात व्यक्तीला आदर आणि प्रतिष्ठा मिळते. सर्व प्रयत्न करूनही तुमचा नोकरीचा शोध संपत नसेल तर या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. या मंत्राचा नियमित जप केल्याने नोकरीतील समस्या दूर होतात.