चाणक्य नीतिशास्त्रात माणसाच्या कल्याणासाठी अनेक स्रोत दिले आहेत. या स्रोतांमध्ये चाणक्याने बायकांसाठी 3 गोष्टी सर्वात जास्त धोकादायक मानल्या आहेत.
चाणक्याच्या मते ज्या घरात गुणवान स्त्री असते ते घर स्वर्गासम बनतं. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या 3 गोष्टींपासून बायकांनी दूर राहावं.
1 अहंकार - अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. चाणक्याच्या मते एका स्त्रीला नेहमी अहंकारापासून लांबच राहावं. अहंकारी स्त्रीच्या घरातून सौख्य समृद्धी हळू-हळू नाहीशी होऊ लागते. त्यांचा घरामधून देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती रागावून निघून जातात. म्हणून चाणक्य यांनी अहंकाराला स्त्रियांसाठी अतिशय धोकादायक मानले आहे.
2 अज्ञान - कोणत्याही स्त्रीसाठी अज्ञान चांगले नाही. चाणक्याच्या मते, स्त्री ज्ञानी असणं गरजेचे आहे. कारण आपल्या या समाजात स्त्रियांची महत्त्वाची भूमिका आहे. सुशिक्षित आणि जाणकार स्त्रियाच या समाजाला एक नवे वळण लावू शकतात. ते आपल्या या गुणांनी आपल्या घराला स्वर्ग बनवतात. परंतु एक अज्ञानी स्त्रीने सभ्य समाजाचे निर्माण करणं अशक्यच आहे.
3 लोभ - चाणक्याच्या मते, एका स्त्रीला लोभापासून लांबच राहावं. स्त्रीचे असे वर्तन संपूर्ण परिवाराचा नायनाट करते. चाणक्याचा मते, जेव्हा एखादी स्त्री लोभ करायला सुरुवात करते तर ती आपल्या घराचे सौख्य, शांतीला नष्ट करायला सुरुवात करते. लोभावश घरात मतभेद आणि भांडण होतात. कैकेयीला आपल्या मुलाचा लोभ झाला होता. मुलाच्या प्रेमापोटी तिच्या वागणुकीमुळे अयोध्येत सर्वत्र अशांतीचे वातावरण निर्मित झाले होते.