Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंकेचे गुपित सांगणारे विभीषण चांगले की वाईट, जाणून घ्या या 5 गोष्टी

लंकेचे गुपित सांगणारे विभीषण चांगले की वाईट, जाणून घ्या या 5 गोष्टी
, मंगळवार, 19 मे 2020 (15:20 IST)
वाल्मीकी रचित रामायणात आणि रामचरित मानससह रामायणात देखील विभीषणाला रावणाच्या पक्षाकडून द्रोही आणि फसवे म्हटले आहे. आजतायगत लोकांचा असा विश्वास आहे की विभीषणाने आपल्या भावाची फसवणूक केली. म्हणूनच आज ही म्हण प्रचलित आहे की "घर का भेदी लंका ढाये" म्हणजे बाहेरचा कोणीही व्यक्ती आपले काहीच करू शकत नाही जोवर आपल्या घराचा व्यक्ती त्याला मदत करत नाही. पण हे खरं आहे का ? विभीषण वाईट होता का ? चला तर मग आपणं हे सत्य जाणून घेऊया.....
 
1 भावांमध्ये अंतर : रामायणात एकीकडे राम होते तर दुसरी कडे रावण. जिथे प्रभू श्रीरामाला त्यांचे भाऊ देव मानत असे तर दुसरी कडे रावणाचे भाऊ त्याला गुन्हेगार, गर्विष्ठ आणि अहंकारी मानत असे. हेच अंतर असे दोघांमध्ये. रावणाच्या सख्या भावांनी कुंभकर्ण आणि विभीषणाने रावणाला समजावले की जे आपण करीत आहात ते चुकीचे आहे. रावणाच्या सावत्र भावांमध्ये एक कुबेर होता ज्यांचा पासून रावणाने लंका हिसकावून घेतली. खरं, दूषण आणि अहिरावणाने रावणची मदत केली होती. तसेच रावणाला तिच्या सख्या बहिणीच्या व्यतिरिक्त त्याचा सावत्र बहीण कुंभिनीने सुद्धा मदत केली होती. रावणाचे आपल्या भावांशी संबंध शक्ती आणि सत्तेच्या बळावर होतं. तर रामाचे आपल्या भावांशी संबंध प्रेम आणि त्यागाच्या बळावर होय.
 
2 रावणाला समजावले : रावणाने जेव्हा सीताचे हरण केले, तेव्हा विभीषणाने परस्त्रीला हरण करून आणणे पाप असल्याचे सांगितले, आणि सीतेला परत रामाकडे पाठवून देण्याचा सल्लाही दिला. विभीषण रावणाला धर्म संगत शिक्षण देत होता. पण रावण त्याला काही जुमानतच नसे. विभीषणाचे रावणाला समजवले की हे कार्य काय धर्माविरुद्ध आहे. रावणाला त्याची बायको मंदोदरी, त्याचे आजोबा, माल्यवान आणि रावणाचे सासरे मयासुर पण तेच समजावत होते जे विभीषण म्हणायचे. खरं तर विभीषण आपल्या भावाला वाचवू इच्छित होते. 
 
3 विभीषणाला लंकेतून हाकलले : विभीषणाने रावणाला पदोपदी समजविण्याचा प्रयत्न करून धर्म संगत शिकवले. तरीही रावणाने शेवटी संतापून विभीषणाला लंकेतून हाकलले. त्यांना सीमेच्या हद्दीपार केले. जर त्याने असे केले नसते तर कदाचित विभीषणाला सुद्धा लंकेत राहून रामाशी युद्ध करावे लागले असते. 
 
4 रामाने विभीषणाला आश्रय दिलं : रावणाने घरातून तसेच सीमेतून बाहेर काढल्यावर विभीषणाकडे वास्तव्यास कोणताही पर्याय नव्हता. ते श्रीरामाच्या आश्रयास गेले. विभीषणाला वाटत असे की लंकेचे कोणतेही निष्पाप लोकं या युद्धात मारले जाऊ नये आणि लंकेत न्यायाचे राज्य स्थापन होवो. विभीषण श्रीरामाच्या चरणी या साठी गेले नव्हते की त्यांना श्रीरामाच्या मदतीने लंकेश बनायचे होते. त्यांचा हेतू वेगळाच होता. 
 
विभीषणाने शरणागत होण्याची विनवणी करीत असताना वानरराज सुग्रीवने त्याला शत्रूचा भाऊ आणि दुष्ट वृत्ती असे म्हणून भीती सांगितली. आणि त्याला बंदी करून शिक्षा देण्याची विनवणी केली. पण हनुमानाने त्यांना वाईट दुष्ट नसून शिष्ट सांगून त्यांना आश्रय देण्याची विनवणी केली. यावर श्रीरामाने सुग्रीवच्या आश्रय न देण्याचा 
 
विचाराच्या प्रस्तावाला अकारण समजले आणि हनुमानाचे आश्रय देण्याचे कारणाला योग्य सांगितले आणि हनुमानाला म्हणाले की विभीषणाला आश्रय देणे तर ठीक आहे पण त्यांना शिष्ट समजणे योग्य नाही. या वर हनुमानाने म्हटले की आपणं निव्वळ विभीषणाकडे बघून असा विचार करत आहात, माझ्याकडे ही बघा की मला का आणि काय हवं आहे. 
 
काही काळ ते थांबले आणि म्हणाले की जो कोणी माझ्या शरणी येतो आणि म्हणतो की "मी आपलाच आहे" त्याला मी अभय देतो. हा माझा दास आहे या साठी विभीषणाला आश्रय दिले पाहिजे.
 
5 धर्माला समर्थन करणे आवश्यक आहे : बरेच लोकं म्हणतात की कुंभकर्णाने आपल्या भावाचा समर्थन करून आपल्या भावाच्या धर्माचे पालन केले, मेघनादने आपल्या वडिलांना साथ देऊन आपल्या मुलाच्या धर्माचे पालन केले, म्हणून लोकांना त्याच्यांसाठी सहानुभूती दिसून आली. पण विभीषणाने रामाला साथ देऊन ईश्वरीय धर्माचे पालन केले. या आध्यात्मिक जगात न कोणी कोणाचा भाऊ असे, न मुलगा, न आई वडील. आध्यात्मिक जगात ईश्वरच आपले सर्व काही आहे. त्यांचा कडून युद्ध लढणे हाच आपला धर्म आहे. खरा युद्ध हाच खरा धर्म आहे. 
 
हेच कारण आहे की रावण, कुंभकर्ण, मेघनाद या सारखे अनेक योद्धा महान आणि सामर्थ्यवान होते. पण विभीषण काही नसून देखील सर्वकाही होते. कारण प्रभू श्रीरामाने विभीषणाला चिरंजीवी होण्याचे वर आणि आशीर्वाद दिले आहे. 
 
ते सात चिरंजीवी मधून एक आहे. जे अजून पण अस्तित्वात आहे. विभीषणाला देखील हनुमानासारखे चिरंजीवी आहे आणि आजतायगत शरीराने जिवंत आहे. विभीषण धर्मज्ञानी आणि दिव्यदृष्टीचे व्यक्ती होते. अशाने सिद्ध होते की विभीषण ना तर घराचे भेदी होते आणि न ते लंकेचे द्रोही होते. ते तर प्रभू श्रीरामाचे सेवक असे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

5 secrets of Shri Radha, आपल्याला माहीत नसलेले राधाचे आश्चर्यकारक गुपिते