चरणामृत
मंदिरात किंवा घर/मंदिरात जेव्हा कुठलीही पूजा होते, तेव्हा चरणामृत किंवा पंचामृत दिले जाते. पण बर्याच लोकांना याचे महत्त्व आणि तयार करण्याची पद्धत माहीत नसते. चरणामृताचा अर्थ असतो देवाच्या चरणातील अमृत आणि पंचामृताचा अर्थ पाच अमृत अर्थात पाच पवित्र वस्तूंपासून निर्मित. दोघांचे सेवन केल्याने जेथे व्यक्तीत सकारात्मक भावांची उत्पत्ती होते, तसेच हे आरोग्याशी देखील निगडित असते.
चरणामृत
शास्त्रात म्हटले आहे की,
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्।
विष्णो पादोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते।।
अर्थात
विष्णूच्या चरणी अमृतरूपी जल सर्व प्रकाराच्या पापांना नष्ट करणारे आहे. हे औषधी समान आहे. जे चरणामृताचे सेवन करतो त्याचा पुनर्जन्म होत नाही.
कसे तयार होतं चरणामृत
तांब्याच्या भांड्यात चरणामृत रुपी जल ठेवल्याने त्यात तांब्याचे औषधी गुण येतात. चरणामृतात तुळशीचे पान, तीळ आणि दुसरे औषधी तत्त्व मिळाले असतात. मंदिर किंवा घरात नेहमी तांब्याच्या लोट्यात तुळशी असलेले जल ठेवायला पाहिजे.
चरणामृत घेण्याचे नियम
चरणामृत ग्रहण केल्यानंतर बरेच लोक डोक्यावरून हात फिरवतात, पण शास्त्रीय मत असे आहे की असे नाही केले पाहिजे. असे केल्याने नकारात्मक प्रभाव वाढतो. चरणामृत नेहमी उजव्या हातात घ्यायला पाहिजे आणि श्रद्घा भक्तिपूर्वक मनाला शांत ठेवून ग्रहण केल्याने चरणामृताचा उत्तम परिणाम मिळतो.
चरणामृताचे लाभ
आयुर्वेदाच्या दृष्टीने चरणामृत आरोग्यासाठी फारच उत्तम असत असे मानले जाते. आयुर्वेदानुसार तांब्यात बर्याच रोगांना नष्ट करण्याची क्षमता असते. हे पौरूषत्व वाढवण्यासाठी देखील गुणकारी असत. तुळशीच्या रसाने बरेच रोग दूर होतात आणि याच जल मस्तिष्काला शांती आणि निश्चिंतता प्रदान करत. आरोग्य लाभासोबत चरणामृत बुद्धी, स्मरण शक्ती वाढवण्यास देखील प्रभावी असतो.
जाणून घ्या काय असत पंचामृत
पंचामृत
'पाच अमृत'. दूध, दही, तूप, मध, साखरेला एकत्र करून पंचामृत तयार केलं जात. यानेच देवाचा अभिषेक देखील जातो. पाची प्रकारांच्या मिश्रणाने तयार झालेले पंचामृत बर्याच रोगांमध्ये लाभदायक आणि मनाला शांती देणारे असत. याचा एक आध्यात्मिक पैलू देखील आहे. ते असे की पंचामृत आत्मोन्नतिचे 5 प्रतीक आहे. जसे :
दूध : दूध पंचामृताचा पहिला भाग आहे. हा शुभ्रताच प्रतीक आहे, अर्थात आमचे जीवन दुधासारखे निष्कलंक असायला पाहिजे.
दही : दहीचे गुण आहे की ते दुसर्याला आपल्यासारखे बनवत. दही अर्पित करण्याचा अर्थ असा आहे की आधी आम्ही निष्कलंक होऊन सद्गुणाचा वापर करून दुसर्यांना देखील आपल्या सारखे बनवण्याचा प्रयत्न करू.
तूप : तूप स्निग्धता आणि स्नेहाचा प्रतीक आहे. सर्वांशी आमचे स्नेहयुक्त संबंध असो, हीच भावना असायला पाहिजे.
मध : मध गोड असून शक्तिशाली देखील असत. दुर्बल मनुष्य जीवनात काही करू शकत नाही, तन आणि मनाने शक्तिशाली व्यक्तीच यशस्वी होतो.
साखर : साखरेचा गुण आहे गोडवा अर्थात जीवनात गोडवा असावा. गोड बोलणे सर्वांनाच आवडते आणि याने मधुर व्यवहार बनतो.
उपरोक्त गुणांमुळे आमच्या जीवनात यश आमच्या पदरी पडतो.
पंचामृताचे लाभ
पंचामृताचे सेवन केल्याने शरीर पुष्ट आणि रोगमुक्त राहत. पंचामृतामुळे ज्या प्रकारे आम्ही देवाला स्नान घालतो, असेच स्वत: स्नान केल्याने शरीरातील कांती वाढते. पंचामृत त्याच मात्रेत सेवन केले पाहिजे, ज्या मात्रेत केले जाते त्यापेक्षा अधिक नाही.