Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार

या प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार
हिंदू शास्त्रात आणि आयुर्वेदात भोजन संबंधी काही माहिती देण्यात आली आहे. जसे कोणत्या वारी काय खावे आणि काय नाही, कोणत्या तिथीला खावे. तसेच कोणत्या महिन्यात काय खाणे टाळावे हे देखील विस्तारपूर्वक सांगण्यात आले आहे. खरं तर या मागे वैज्ञानिक कारण आहेत. प्रत्येक वार, तिथी किंवा महिन्यात हवामान बदलत असतं ज्यामुळे बदल जाणून घेता आहार बदल करणे गरजेचे आहे.
 
जसे की आपल्याला माहीतच असेल की रात्री दही खाणे टाळावे किंवा दुधासोबत मीठ खाणे टाळावे. कारण खाण्यात मेळ असणे गरजेचे आहे. तर जाणून घ्या कोणत्या महिन्यात काय खावे आणि काय नाही. 
 
या संबंधित काही दोहे देखील प्रसिद्ध आहे--
 
कोणत्या महिन्यात काय खाणे टाळावे- 
।।चौते गुड़, वैशाखे तेल, जेठ के पंथ, अषाढ़े बेल।
सावन साग, भादो मही, कुवांर करेला, कार्तिक दही।
अगहन जीरा, पूसै धना, माघै मिश्री, फाल्गुन चना।
जो कोई इतने परिहरै, ता घर बैद पैर नहिं धरै।।।
 
 
कोणत्या महिन्यात काय खावे- 
।।चैत चना, बैसाखे बेल, जैठे शयन, आषाढ़े खेल, सावन हर्रे, भादो तिल।
कुवार मास गुड़ सेवै नित, कार्तिक मूल, अगहन तेल, पूस करे दूध से मेल।
माघ मास घी-खिचड़ी खाय, फागुन उठ नित प्रात नहाय।।
 
 
1. चैत्र मास
हा महिना इंग्रजी कॅलेंडरानुसार मार्च-एप्रिल दरम्यान येतो. या महिन्यात चैत्र नवरात्री प्रारंभ होते. या महिन्यात गूळ खाणे टाळावे. चणे खाऊ शकतात. 
 
2. वैशाख
हा महिना इंग्रजी महिन्यानुसार एप्रिल- मे दरम्यान येतो. वैशाख महिन्यात तेल लावण्यावर मनाही आहे. या महिन्यात तेलकट पदार्थ खाण्यास मनाही आहे. 
 
3. ज्येष्ठ
मे-जून दरम्यान येणार्‍या या महिन्यात दुपारी खेळण्यास मनाही केली आहे. या दरम्यान आपल्या देशात उन्हाची दाहकता चांगलीच जाणवते त्यामुळे बाहेर अती फिरणे आरोग्यासाठी हानिकारक 
 
ठरतं. या काळात आराम करणे योग्य ठरतं. या महिन्यात बेल खाऊ शकता.
 
4. आषाढ
जून-जुलै दरम्यान येणार्‍या या महिन्यात पकलेलं बेल खाणे टाळावे. या महिन्यात हिरव्या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. या महिन्यात जोरदार व्यायाम करावा.
 
5. श्रावण
जुलै- ऑगस्ट दरम्यान येणार्‍या श्रावण महिन्यात पालेभाजी खाणे टाळावे. हिरव्या भाज्या, दूध आणि दुधाने निर्मित वस्तू खाणे टाळावे. या महिन्यात हर्रे खाणे योग्य ठरेल. याला हरिद्रा किंवा हरडा देखील म्हणतात.
 
6. भाद्रपद
ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान येणार्‍या भाद्रपद महिन्यात दही खाणे टाळावे. या दोन महिन्यात ताक, किंवा दह्याने निर्मित खाद्य पदार्थ खाणे टाळावे. या महिन्यात तीळ वापरावे.
 
7. आश्विन
सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात येणार्‍या या महिन्यात कारली खाणे टाळावे. या महिन्यात दररोज गूळ खाणे योग्य ठरेल.
 
8. कार्तिक
हा महिना ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान येतो. कार्तिक महिन्यात वांगी, दही आणि जिरं मुळीच खाऊ नये. या महिन्यात मुळा खावा.
 
9. मार्गशीर्ष
नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान येणार्‍या या महिन्यात जेवणात जिरे वापरू नये. तेल वापरू शकता.
 
10. पौष
डिसेंबर- जानेवारी दरम्यान येणार्‍या या महिन्यात दूध पिऊ शकता परंतू कोथिंबीर खाणे टाळावे.
 
11. माघ
जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान येणार्‍या या महिन्यात मुळा आणि कोथिंबीर खाणे टाळावे. या दरम्यान मिश्री देखील खाऊ नये. या महिन्यात खिचडीत तूप घालून खावे.
 
12. फाल्गुन
फेब्रुवारी- मार्च दरम्यान पडणार्‍या या महिन्यात सकाळी लवकर उठावे. या महिन्यात चणे खाणे टाळावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनी जयंती पौराणिक कथा