Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दत्त उपासना कशी करावी

दत्त उपासना कशी करावी
, मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (09:40 IST)
प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. अशात दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या कशा पद्धतीने करावी या विषयी माहिती जाणून घ्या.
 
* दत्त पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे.
दत्ताच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने गंध लावावे.
* दत्ताला जाई आणि निशिगंधाची फुले ही सात किंवा सातच्या पटीत अर्पित करावीत. फुलांचे देठ देवाकडे करत वाहावीत.
* दत्ताला चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर हीना सुंगधी असलेली उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळावी.
* दत्ताला वाळा हे गंध अर्पण करावे. 
* गुरुवार हा दत्तांचा वार असल्याचे मानले जातं. या दिवशी दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते.
 
दत्त नामजप फायदे
* दत्ताच्या नामजपामुळे शक्ती मिळते. अशात दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास नाहीसा होतो.
* नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी रहाण्यास मदत होते.
* नामजप केल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होतात आणि त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.
* नामजप केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते आणि त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
* नामजप केल्याने वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास मदत होते आणि अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाणे शक्य होते.
* दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होते.
 
* दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व. औदुंबरतळी वस्ती, जवळ धेनु व श्र्वान हे दत्तावताराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. भूत, प्रेतल पिशाच दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत. यांची उपासना केल्याने पूर्वजांचे त्रास नाहीसे होतात. 
 
* समंधबाधांना अर्थात वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्यांना ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नाही अर्थात कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने त्यांना पाताळवास प्राप्त होतो. तेव्हा पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्यांना भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो. अशात कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना त्रास देत राहतात. अशात समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. मात्र दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्त महाराज योगसामर्थ्याने सातत्याने ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात.
 
'दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा' या महामंत्राचा अर्थ
या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी. मी देह नाही, मी आत्मा म्हणजे शुद्ध अहम्. तो साक्षी आहे, निर्विकार आहे, अनंदरूप आहे.
 
दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रम्हाचे अनुसंधान करत दर्शवले आहे की आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे. ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रम्हच आहे.
 
श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत.
 
चौथ्या दिगंबरा या शब्दात प्रार्थना आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, मला आपल्या जवळ न्या, आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया, माझा देहरुपी भ्रम नाहीसा करा. 
 
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा ।।  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रुद्रावतार हनुमानाची पूजा करताना हा उपाय इच्छित फळ प्रदान करेल, सर्व कष्ट दूर होतील