धांवा
धांव रे रामराया।
किती अंत पाहसी ।।ध्रु।।
प्राणांत मांडला कीं ।
नये करुणा कैसी पाहीन धणीवरी ।
चरण झाडीन केशीं नयन शिणले बा ।
आतां केधवां येसी ।।धाव।। 1।।
मीपण अहंकारें अंगी भरला ताठा विषयकर्दमांत ।
लाज नाही लोळता चिळस उपजेना ।
ऐसे जालें बा आतां ।।धाव।।2 ।।
मारुतिस्कंधभागीं शीघ्र बैसोनी यावें । राघवें वैद्यराजे ।
कृपाऔषध द्यावें । दयेच्या पद्महस्ता ।
माझे शिरीं ठेवावें ।।धाव।। 3।। ।।
या भवीं रामदास । थोर पावतो व्यथा कौतुक पाहतोसी ।
काय जानकीकांता ।। दयाळा दीनबंधो भक्तवत्सला ताता ।। धाव.।।4।।।
भक्तवत्सला आतां