या 8 वस्तूंचे दान करा आणि त्याचे शुभ परिणाम मिळवा

दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतो व कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. शास्त्रांमध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. येथे आम्ही दानाशी निगडित गोष्टी, ज्याचे लक्ष्य ठेवल्याने विशेष फळ मिळतात ...
 
1. अन्न, जल, अश्व, गाय, वस्त्र, शय्या, छत्र आणि आसन, या 8 वस्तूंचे दान केले तर, संपूर्ण जीवनभर त्याचे शुभ परिणाम मिळतात. शास्त्रात असे लिहिले आहे की जेव्हा आत्मा देह त्यागते तेव्हा आत्म्याला जीवनात त्याच्या हातून जे करण्यात आलेल्या पाप आणि पुण्याचे फल भोगावे लागतात. पाप कर्मांचे भयानक फळ आत्म्याला मिळतात. पण वर दिलेल्या या 8 वस्तूंचे दान मृत्यू नंतरच्या या कष्टांना दूर करू शकतात.  
2. जो व्यक्ती पत्नी, पुत्र आणि कुटुंबाला दुखीकरून दान करतो, ते दान पुण्य देत नाही. दान सर्वांना प्रसन्नतेने दिले पाहिजे.  
3. गरजू व्यक्तीच्या घरी जाऊन केलेले दान सर्वात उत्तम. तसेच गरजू व्यक्तीला घरी बोलावून त्याला दिलेले दानाचे परिणाम मध्यम मिळतात.  
4. जर एखादा व्यक्ती गाय, ब्राह्मण आणि रोग्याला दान करत असेल तर त्याला दान देण्यापासून रोखायला नाही पाहिजे. असे केल्याने तो व्यक्ती पापाचा भागीदार बनतो.  
5. तीळ, कुश, जल आणि तांदूळ या वस्तूंना हातात घेऊन दान केले पाहिजे. अन्यथा ते दान दानवांना प्राप्त होतात.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख वसंत पंचमी: या प्रकारे करा सरस्वती पूजन