Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय अवलंबवा

shani pradosh
, शनिवार, 17 जून 2023 (08:17 IST)
शनी देव न्यायाचे देव आहे. आपल्यात हे उपाय केल्यास असे समजावे की शनी देव आपल्याला कधीच त्रास देणार नाही. आपल्यावर त्यांची कृपा नेहमीच राहणार. आयुष्यातील प्रत्येक संकटात ते आपले मित्र बनून आपल्याला मार्ग दाखवतील. जाणून घ्या हे उपाय कोणते आहेत.
 
1 नख कापणे
जे आपले नख वाढू देत नाहीत तसेच दररोज त्यांची स्वच्छता करतात, शनी अश्या लोकांची नेहमीच काळजी घेतात. जर आपण नख कापायला कंटाळा करत असाल किंवा आपले नख घाण राहत असतील तर समजावे की आपल्या शनीची दशा सुधारविण्यासाठी काही उपाय केले पाहिजे. 
 
2 देणगी देत राहा
आपले काळीज गोरं गरीब, गरजूंना बघून अस्वस्थ होत असेल आणि प्रत्येक सणासुदीला आपण गरजूंची मदत करीत असाल, तर समजावे की आपल्यावर शनी देवांचा विशेष आशीर्वाद आहे. जर आपण गरिबांना काळे हरभरे, काळे तीळ, उडीद डाळ, आणि कापडं चांगल्या हेतूने भेट स्वरूपात देत असल्यास खात्री बाळगा की शनी देव नेहमीच आपले कल्याण करतील.
 
3 छत्रीची भेट : 
ऊन आणि पाऊस याहून वाचण्यासाठी छत्री देणगी स्वरूपात देणार्‍यांवर शनी देवांचे छत्र नेहमी असते. आपल्याला आतापर्यंत ही सवय नसल्यास ताबडतोब या सवयीला अंगीकार करा. शेवटी शनी देवांचे आशीर्वाद कोणाला नको.
 
4 कुत्र्यांची सेवा
कुत्र्यांची सेवा करणाऱ्यांवर शनी देव नेहमी खूश असतात. कुत्र्यांना जेवायला देणाऱ्या आणि त्यांना त्रास न देणाऱ्यांचे कष्ट शनी देव दूर करतात. जर का आपण कुत्र्यांवर माया करीत असाल तर शनी देवांच्या क्रोधापासून नेहमीच वाचाल.
 
5 आंधळ्यांना मार्गदर्शन करा
कोणत्याही अंध व्यक्तीला मार्ग दाखवणे आणि त्याची मदत करणे शनी देवांना खूश करण्यास उपयुक्त आहे. जे लोकं आंधळ्यांची निस्वार्थपणे मदत करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत नाही, शनी देव नेहमीच त्यांच्यावर खूश राहतात आणि त्यांच्या यश आणि उन्नतीचा मार्ग मोकळा करतात. 
 
6 शनिवारचे उपास
शनिवारी उपास करून आपल्या वाट्याचे जेवण गरिबांना देण्याची सवय असल्यास समजावे की आपल्या घरात शनीच्या कृपेने अन्नधान्य भरपूर राहणार आहे. आपण हे नियम आयुष्यभर पाळल्यास आपल्याला कधीही धन संपत्तीची कमतरता भासणार नाही.
 
7 मासोळ्यांना जेवण देणे :
जे लोकं मासे खात नाही पण त्यांना खायला देतात त्यांचा वर शनी नेहमी खूश राहतात. जर आपल्याला देखील अशी सवय आहे तर आपण भाग्यवान आहात. आपल्या या सवयीला बदलू नका.
 
8 दररोज अंघोळ करून स्वच्छ राहणे
दररोज अंघोळ करून स्वच्छता बाळगणाऱ्यांवर शनीची कृपा राहते. जे पवित्र आहे त्यांना शनी नेहमीच मदत करतात.
 
9 स्वच्छता कामगारांची मदत करणे :
जे लोक स्वच्छता कामगारांचे आदर करतात. त्यांना आर्थिक मदत करतात, शनी देव त्यांचा साथ कधीही सोडत नाही. ही सवय बदलू नका. भाग्यवंत बनण्यासाठी ही सवयच आपले मार्ग उघडेल. शनी देव या सवयीने आनंदी असतात. 
 
10 एकमेका साहाय्य करणे :
जे लोकं गरजू, त्रासलेले आणि मेहनती लोकांची नेहमी मदत करतात ते शनी देवांना लाडके असतात. शनी देव त्यांचे सर्व कष्ट आणि व्याधी दूर करतात. त्यामुळे मदत करण्याची सवय असू द्यावी. 
 
11 आदर करण्याची सवय
म्हातारे आई वडील आणि बायकांना आई सारखे मानून त्यांना आदर देणाऱ्यांना शनी देव नेहमीच साहाय्य करतात. 
 
12 झाडांची लागवणं आणि पिंपळ- वडाची पूजा
झाडांची लागवणं आणि त्याची पूजा शनी देवांना खूश करण्यासाठी आवश्यक असते. जे लोकं पिंपळ आणि वडाच्या झाडाची  पूजा करतात त्यांच्यावर शनी आपली कृपा ठेवतात.
 
13 शंकराची पूजा
शंकराची पूजा शनीला प्रसन्न करते. दररोज महादेवाला अभिषेक आणि पूजा केल्यास शनी आपल्या भक्तांचे नेहमी लक्ष ठेवतात.
 
14 पूर्वजांचे श्राद्ध
जे लोकं आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करतात त्यांच्यावर प्रसन्न होऊन शनी देव त्यांचे कष्ट दूर करतात. या सवयीला अंगीकार करा.
 
15 प्रामाणिकपणे कमाविणे :
असे लोकं जे कोणालाही इजा न होऊ देता, खरं आणि नीतीच्या मार्गावरून चालत पैसे कमावतात, त्यांना शनी देव लक्ष्मी मिळण्याचे आशीर्वाद देतात. जे लोकं व्याजखोरी करतात, त्यांच्यावर शनी रागावतात. 
 
16 मारुतीची पूजा करणे
ज्यांचे इष्टदेव मारुती आहेत शनी देव त्याचे रक्षक बनून नेहमीच त्याचे रक्षण करतात. 
 
17 कृष्णाचे सखा असे शनी :
जे श्रीकृष्णाला आपले इष्टदेव मानतात शनी त्यांचे सखा बनतात आणि त्यांच्यावर कोणतीही संकटे येऊ देत नाही.
 
18 अपंगांची मदत करणे
अपंग माणसांची मदत करणे शनी देवांना आनंदी करतं. अश्या माणसांचे शनी देव नेहमीच कल्याण करतात. शनी स्वतः एका पायाने हळू हळू चालतात. शक्य असल्यास शक्यतो तितकी अपंगांची मदत करण्याची सवय लावावी.
 
19 मद्यपानापासून अंतर ठेवणे
मद्यपानाचे सेवन शनी देवांना रागीट करतात. जे लोकं मद्यपानापासून दूर राहतात त्यांचा वर शनीची कृपादृष्टी नेहमीच राहते.
 
20 शाकाहारी असण्याची सवय :
जे लोक शाकाहाराचे सेवन करतात आणि मास, मासे, यापासून लांब राहतात त्यांच्यावर शनी देव प्रसन्न राहतात.
 
21 सातमुखी रुद्राक्ष
जे लोकं सातमुखी रुद्राक्ष धारण करतात. शनी देव त्यांचे भाग्य उघडतात म्हणून ज्यांना रुद्राक्ष आवडते किंवा रुद्राक्ष घालण्याची सवय असते. ते शनी देवांकडून शुभ फळे प्राप्त करतात.
 
22 कुष्ठरोगांच्या रुग्णांची मदत करणे
कुष्ठ रुग्णाची सेवा करणे हे पुण्याचे काम मानले गेले आहे. शनी देव देखील अश्या लोकांवर प्रसन्न असतात जे कुष्ठरोगाच्या रुग्णांची सेवा करतात. शनी देव अश्या लोकांचे सर्व त्रास व्याधी पासून वाचवतात.
 


Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा