Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कापल्यानंतर येथे पडले होते गणपतीचे शीर, आजपण आहे हे 'कलंकित' !

ganapati
गणपतीचे सर्वाधिक प्रिय नाव गजानन आहे. गजानन अर्थात हत्तीप्रमाणे मुख असणारे. गणपतीला गजानन बनण्याचा प्रसंग सर्वांनाच माहीत आहे पण तुम्हाला माहीत आहे का गणपतीचे मस्तक कुठे पडले होते, किंवा त्या डोक्याचे काय झाले. याच्याशी निगडित एक प्रसंग आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  
 
गणपतीच्या डोक्याशी निगडित बर्‍याच किदवंति आहेत. पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा पार्वतीने गणेशाला जन्म दिला, तेव्हा सर्व देवी देवता त्याच्या दर्शनाला कैलास पोहोचले. दर्शन घेण्यासाठी शनी देखील तेथे पोहोचले, ज्यांना श्राप मिळाला होता की ज्यांची क्रूर दृष्टी जेथे पडेल, तेथे नुकसान होईल. म्हणून जसेच शनीची दृष्टी गणेशावर पडली त्याचे मस्तक वेगळे होऊन चंद्रमंडळात पोहोचले.  
 
एक सर्वाधिक प्रचलित मान्यता अशी देखील आहे की माता पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून श्रीगणेशाचा स्वरूप तैयार केला आणि  अंघोळ होण्यापर्यंत गणेशाला दारावर उभे राहिला सांगितले आणि आदेश दिले की कोणालाही आत प्रवेश करू देऊ नको.  
 
या दरम्यान तेथे महादेव आले व गणेशाने त्यांना आता जाण्यास रोखले तर नकळत त्यांच्या हातून गणपतीचे मस्तक कापण्यात आले, जे चंद्रलोकात पोहोचले. नंतर महादेवाने रुष्ट पार्वतीला मानवण्यासाठी कापलेल्या मस्तकाच्या जागेवर गजमुख अर्थात हत्तीच्या मस्तकाला जोडले.  
 
चंद्रमा आजपण आहे कलंकित!
मान्यतेनुसार, गणपतीचे शिर चंद्रलोकात आहे. अशी मान्यता आहे की गणेश चतुर्थीच्या चंद्र दर्शन नाही केले पाहिजे कारण चंद्र दर्शन केल्याने मिथ्याच आरोप लागतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा मंगल आणि उत्कृष्ट सण-भाऊबीज