Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र

Ganesh Chaturthi 2021
, मंगळवार, 2 मार्च 2021 (10:02 IST)
1. गणपती बीज मंत्र 'गं' आहे.
 
2. युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
3. षडाक्षर मंत्र जपल्याने आर्थिक प्रगती होते व समृद्धी लाभते.
- ॐ वक्रतुंडाय हुम्‌
एखाद्याने नेष्टासाठी केलेली क्रिया नष्ट करण्यासाठी, विविध कामनापूर्तीसाठी उच्छिष्ट गणपतीची साधना केली पाहिजे. याचे जप करताना मुखात गूळ, लवंग, वेलची, पताशा, ताम्बुल, सुपारी असावी. ही साधना अक्षय भंडार प्रदान करणारी आहे. यात पावित्र्य किंवा अपवित्र असे विशेष बंधन नसतं.
 
4. उच्छिष्ट गणपती मंत्र
- ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा
 
5. आळस, निराशा, कलह, विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराज रूपाची आराधना या मंत्राने करावी-
- गं क्षिप्रप्रसादनाय नम:
 
6. विघ्न दूर करुन धन व आत्मबल प्राप्तीसाठी हेरम्ब गणपती मंत्र जपावे-
- 'ॐ गं नमः'
 
7. रोजगार प्राप्ती व आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी विनायक मंत्र जपावे-
- ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
 
8. विवाहात येणार्‍या दोषांना दूर करण्यांना त्रैलोक्य मोहन गणेश मंत्र जपून शीघ्र विवाह व अनुकूल जीवनसाथीची प्राप्ती होते-
- ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्रीं गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
 
या मंत्रांना व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतान गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसा पाठ केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंगारकी चतुर्थी कथा