Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गायत्री मंत्र म्हणण्याचे नियम

गायत्री मंत्र म्हणण्याचे नियम
गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर म्हणू नये.
मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य आणि स्वरांसहित असेल, तरच मंत्र म्हणण्याचा उद्देश साध्य होतो. मंत्रांचा चुकीचा उच्चार आणि त्यातून निर्माण झालेल्या अयोग्य स्पंदनांमुळे संबंधित व्यक्तीला त्रास होतो.
सकाळच्या वेळी स्नान झाल्यावर मंत्रपठण केल्यास या मंत्राचा जास्त लाभ होतो.
सोयर आणि सूतक यांच्या कालावधीत मंत्रपठण करू नये.
मंत्रपठण करताना आहार आणि आचार यांचे नियम पाळणे आवश्यक आहे.

गायत्री मंत्र अर्थासहित
 
ॐ भूर्भुवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यम्। भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात्।।
 
ॐ : परब्रह्मा
भूः : भूलोक
भुवः : अंतरिक्ष लोक
स्वः : स्वर्गलोक
त : परमात्मा किंवा ब्रह्म
सवितुः : ईश्वर किंवा सृष्टि कर्ता
वरेण्यम : पूजनीय
भर्गः: अज्ञान व पाप निवारक
देवस्य : ज्ञान स्वरुप प्रभूचे
धीमहि : आम्ही ध्यान करत आहे
धियो : बुद्धि प्रज्ञा
योः : जे
नः : आम्हाला
प्रचोदयात् : प्रकाशित करा.
 
अर्थ: विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.
 
या मंत्रात इतकी शक्ती आहे की केवळ तीनदा देखील या मंत्राचा जप केल्यास नकारात्मकता किंवा भूत-प्रेताची बाधा जवळपास भरकटतं नाही.
 
गायत्री सद्बुद्धीचं मंत्र आहे, म्हणून या मंत्रांचा मुकुटमणी असे देखील म्हटले गेले आहे. न‌ियम‌ित 108 वेळा गायत्री मंत्र जप केल्याने बुद्ध‌ि प्रखर आणि कोणताही विषय अधिक काळ स्मरण ठेवण्याची क्षमता वाढते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वटपौर्णिमा: आरोग्यासाठी वटाची पूजा