Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का?

gurucharitra rules for women
, शुक्रवार, 5 मे 2023 (15:25 IST)
दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ ग्रंथ लिहिले गेले. श्री गुरुचरित्र ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. गुरुचरित्रामध्ये 35 व्या अध्यायात सांगितले आहे की - 
 
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले॥८॥
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी। करुणावचनेकरोनिया ॥९॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ॥
 
स्त्रियांनी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे असे प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) ह्यांनी सांगितले आहे. पारायणासाठी असलेले नियम व अटी पालनात पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते.
 
स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार तसेच शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. स्त्रियांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्र उच्चारण केल्याने व मंत्राच्या सामर्थ्याने आघात होण्याची शक्यता असते. स्त्रियांना मंत्राधिकार, संध्या वंदनाचा अधिकार नसल्याने संकल्प कसा सोडता येणार. अशात स्त्रियांनी गुरुचरित्र ऐकावे मात्र वाचू नये. स्त्रियांनी सप्तशती देखील वाचू नये असे सांगण्यात येतं. या शिवाय स्त्रियांनी गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) ऐकू देखील नये. कारण त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आहेत.
 
स्त्रियांना बीज मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार व सामर्थ्य नसून त्यांनी पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे उदाहरण देता कामा नये कारण त्या स्त्रियांनी स्वत:ला सिद्ध केले होते.
 
हरित संहिताप्रमाणे स्त्रियांचे दोन प्रकार म्हणजे ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. ब्रह्मवादिनी स्त्रियांनी शास्त्रानुसार सर्व संस्कार करवून वेदाध्ययन करण्यास पात्र होत्या तर त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. तर सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहत असे.
 
अर्थातच शास्त्रसंमत अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास व गुरुचरित्र तसेच सप्तशती पाठ करण्यास हरकत नाही. तसेच रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया ज्यांना विटाळ नसेल त्याही पारायण करू शकतात.
 
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही या बाबतीत अनेकांचे मतभेद असले तरी श्री टेंबे स्वामींनी स्पष्ट पणे नमूद केल्याप्रमाणे स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. स्त्रियांनी गुरुचरित्र ऐकावे. 
 
Disclaimer : हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. या लेखाच्या माध्यमतून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसून आपण अधिक माहितीसाठी विद्वान व ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Significance of Buddha Purnima बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व काय आहे?