Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

guru grah
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला जातो. पत्रिकेत गुरुची स्थितीचा प्रभाव वैवाहिक जीवनावर देखील होतो. गुरु जर शुभ स्थितीत असेल तर भाग्याचा साथ मिळतो आणि नवरा बायकोत प्रेम सदैव कायम राहत. 
 
पत्रिकेत गुरुशी संबंधित एखादा दोष असेल तर त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. गुरु ग्रहाचे शुभ फल मिळवण्यासाठी गुरुवारी कोणते उपाय केले पाहिजे हे पुढे बघा....
 
webdunia
गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करा. पिवळ्या वस्तू म्हणजे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबे (फळ) इत्यादी. 
 
प्रत्येक गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडवांचा प्रसाद दाखवल्याने गुरु ग्रहाचे दोष दूर होतात. गुरुवारी गुरु ग्रहासाठी व्रत ठेवायला पाहिजे. 
 
बृहस्पतीच्या प्रतिमेला पिवळ्या वस्त्रावर विराजीत करा आणि त्याची पूजा करा. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल आणि प्रसादासाठी पिळवे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे. 
 
गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे. अळणी भोजन करावे. भोजनात पिवळ्या रंगाचे पक्वान्न जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळी इत्यादी सामील करावे.  
 
गुरु मंत्राचा जप करावे. मंत्र - ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या किमान 108 असायला पाहिजे. 
 
गुरुवारी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे. स्नानादी करून विष्णूच्या समोर दिवा लावायला पाहिजे. 
 
गुरुवारी संध्याकाळी केळीच्या वृक्षाखाली दिवा लावायला पाहिजे. गरीब मुलांना केळीचे दान करावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरती साईबाबाची