Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 14 January 2025
webdunia

गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व

गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व
, गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:37 IST)
गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. 
 
आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. 
 
गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्ये करणे शुभ असते. 
 
पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो. 
 
साधकासाठी फायदेशीर ''गुरुपुष्यामृत योग''
या दिवशी विद्वान लोकं देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात. या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते. 
या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. 
गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. 
व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांचा जीवनात वृद्धी होते. त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते. पण कधी कधी जीवनात दुर्भाग्यात येते अपयश येते. अश्या वेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात.
 
पुष्य नक्षत्र म्हणजे काय 
पुष्य चा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. 
 
विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांचा मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे. त्याच प्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधा सारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी, आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा. 
 
या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांती वर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असे ही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

द्रौपदी बनली सैरेंध्री, तिच्यावर पडली कीचकाची वाईट दृष्टी, जाणून घ्या महाभारतातील ही दुर्मिळ कथा