Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाभारत काळात हनुमानने केलेल्या पराक्रमाबद्दल जाणून घ्या

महाभारत काळात हनुमानने केलेल्या पराक्रमाबद्दल जाणून घ्या
, मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (09:25 IST)
महाभारत काळात म्हणजेच द्वापर युगात हनुमानाचे अस्तित्व आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दलची वर्णने आढळतात. चला तर मग त्यांनी केलेल्या काही पराक्रमांची माहिती घेऊ या.
 
1 पौंड्रकच्या नगराला उद्ध्वस्त करणं - 
पौंड्र नगरीचा राजा स्वतःला भगवान वासुदेव समजत होता. तो श्रीकृष्णाला आपला शत्रू मानत होता. एकदा श्रीकृष्णाने माया रचून त्याच्या महालात कमळाचे फूल पाडले त्यांनी ते कमळाचे फूल बघून आपले मित्र काशीराज आणि वानर द्वितला विचारले की हे फूल कुठे सापडेल, 
 
काशीराज ने उत्तर दिले की गंधमादन पर्वतावर हे फूल सापडेल. वानर द्वित म्हणे की मी घेऊन येतो आपल्यासाठी. हनुमान त्याच दिव्य कमळाच्या तलावाजवळ राहायचे. श्रीकृष्णाच्या आदेशा वरून ते स्वतः वानर द्वितसह कैदी होऊन पौंड्र नगरीत जाऊन पोहोचतात आणि पौंड्रकला चेतावणी देतात की जर तुम्ही स्वतःला देव मानायचे थांबवले नाही आणि अधर्माचे मार्ग सोडले नाही तर प्रभू तुला ठार मारतील. नंतर हनुमान त्याच्या नगरीला उद्ध्वस्त करून पुन्हा गंधमादन पर्वतावर निघून जातात. नंतर बलराम वानर द्वितचे आणि श्रीकृष्ण पौंड्रकचे वध करतात.
 
2 भीमाचे गर्वहरण केले -
एकदा भीम द्रौपदीच्या सांगण्या वरून गंधमादन पर्वताच्या त्या कमळाच्या तलावाजवळ पोहोचतात जिथे हनुमानजी राहत होते. हनुमानजी वाटेत निजलेले होते तर भीमाने त्यांना वाटेतून बाजूस होण्याचे सांगितले. हनुमानजी म्हणाले की आपण तर सामर्थ्यवान आहात आपण स्वतः माझ्या शेपटीला बाजूला करून वाट काढून घ्या. पण भीम त्यांच्या शेपटीला हालवू देखील शकले नाही. नंतर भीमाला हे कळतातच की हेच पवनपुत्र हनुमान आहे तर त्यांनी त्यांच्या कडे माफी मागितली.
 
3 अर्जुनाचे गर्वहरण केले - 
त्याच प्रमाणे एकदा अर्जुनाला नदी पार करायची होती तर त्यांनी आपल्या धनुर्विद्येने बाणाचा एक पूल बनविला आणि रथासह ती नदी पार केली. नदी पार केल्यावर त्यांची भेट हनुमानाशी झाली. अर्जुनाने त्यांना म्हटले की भगवान राम तर माझ्या प्रमाणेच धनुर्धारी होते तर ते मी बनविल्या प्रमाणे बाणांचा पूल बनवू शकत होते. तेव्हा हनुमानजी म्हणाले की त्या काळात माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान वानर होते. हा असा बाणांचा सेतू त्यांच्या वजनानेच कोसळला असता आणि तुम्ही हा बांधलेला पूल तर माझेच वजन सहन करू शकणार नाही. अर्जुन गर्विष्ठ होऊन म्हणे की कोण म्हणत की मी बांधलेले हे पूल आपले वजन घेऊ शकणार नाही. जर आपल्या चालण्याने हे पूल कोसळले तर मी स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजणे सोडून देईन. तेव्हा हनुमानजी त्या पुलावर फक्त आपले एकच पाय ठेवतात आणि तो पूल कोसळतो.
 
4 बलरामचे गर्वहरण केले - 
बलराम आपल्या एकाच हाताच्या प्रहाराने वानर द्वितला ठार मारले. असे केल्यावर त्यांना गर्व झाले. तेव्हा श्रीकृष्णाच्या आदेशावरून हनुमान द्वारिकेच्या बागेत शिरले आणि फळे खाऊन त्यांनी नासधूस करण्यास सुरुवात केली. बलरामांना हे कळल्यावर त्यांनी स्वतः आपली गदा घेतली आणि 
 
त्यांना धडा शिकवायचे ठरविले. दोघांमध्ये गदायुद्ध होतो बलराम त्या युद्धात दमून जातात तेव्हा ते हनुमानाला विचारतात की आपण कोण आहात मला सांगा नाही तर मी नांगर काढेन. तेव्हा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तेथे प्रगट होऊन त्यांना सांगतात की हे स्वतः पवनपुत्र हनुमान आहेत. त्याच प्रमाणे हनुमानाने गरुडदेव आणि सुदर्शन चक्राचे देखील गर्व हरण केले.
 
5 महाभारताचे युद्ध आणि हनुमान -
श्रीकृष्णाच्या आदेशावरूनच हनुमान कुरुक्षेत्राच्या युद्धात सूक्ष्म रूपात त्यांच्या रथावर बसले होते. हेच कारण होते की प्रथम भीष्म आणि नंतर कर्णाच्या प्रहारा नंतर देखील त्यांचे रथ संरक्षित होते, अन्यथा कर्ण इतके सामर्थ्यवान होते की त्यांनी त्यांच्या रथाला कधीच उद्ध्वस्त केले असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा