Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरुवारी डोक्यावर पाणी न घेण्याचे मुख्य कारण

hindu dharma
कुटुंबातील मोठ्या लोकांकडून आपण नेहमी एकले असेल की आज डोकं धुऊ नका, गुरुवार आहे. वेळ बदलला, पद्धत बदलली पण आज देखील गुरुवारी केस धुवायच्या आधी एकदा मनात नक्की विचार येतोच. ह्या गोष्टी आमच्या पूर्वजांनी अशीच म्हटली नाही. 
 
किंवदंती : हिंदू धर्मात वृहस्‍पतिवाराला सर्वात पवित्र दिवस मानला जातो. हा दिवस विष्णूला समर्पित असतो. गुरुची आराधना केल्याने याला वृहस्‍पतिवार किंवा गुरुवार असे म्हणतात. या दिवशी पूजा करून लोक आपल्या लोकांच्या आरोग्याची आणि सुखाची कामना करतात. या दिवशी डोक्यावर पाणी न घेण्याबद्दल एक कथा आहे.   
 
एकदा, एक अमीर व्यवसायी आणि त्याची बायको राहत होते. ते दोघेही फार खूश होते आणि सुखात आपले जीवन जगत होते. बायको घरगुती आणि कंजूश होती. तिला दान द्यायला आवडत नव्हत. एकदा एका भिक्षुकाने तिचा पती घरी नव्हता तेव्हा तिला काही खायला मागितले. पण महिलेने उत्तर दिले की ती सध्या घरकामात व्यस्त आहे, तू नंतर ये.  
 
अशा प्रकारे तो भिक्षुक बर्‍याच दिवस वेग वेगळ्या वेळेवर येत राहिला, पण प्रत्येक वेळा ती स्त्री त्याला सांगत होती की मी घर कामात व्यस्त आहे. एक दिवशी भिकारीने महिलेला विचारले की ती केव्हा रिकामी असते, जेव्हा मला तुझ्याकडून भोजन मिळू शकेल. तर महिलेला राग आला आणि त्याला म्हटले की आधी स्वत:कडे बघ, मी कधीही रिकामी नसते. तेव्हा त्या भिकारीने म्हटले की वृहस्‍पतिवारी तू डोक्यापाणी घेतले तर नेहमीसाठी रिकामी होशील.  
 
त्या स्त्रीने भिकारीच्या गोष्टीला मनावर घेतले नाही आणि रोज डोक्यावरून अंघोळ करत राहिली. तसेच सवयीप्रमाणे तिने गुरुवारी देखील डोके धुतले. मग काय, त्या महिलेच्या सर्व धनाचे नाश झाले आणि सर्व सुख व आनंद ती गमावून बसली. नवर्‍या समेत ती रस्त्यावर आली. आता दोघेही अन्न पाण्यासाठी दर दर भटकू लागले. परत तो भिकारी त्या महिलेला मिळाला. तर महिलेने आपले हाल त्याला सांगितले.  
 
नंतर त्या दांपत्याला असा अनुभव झाला की तो भिकारी गुरूच्या रूपात आपल्याकडे आला असून त्याने भिकारीच वेष धारण केला होता व भिक्षा मागत होता. त्या दिवसापासून त्या महिलेने वृहस्‍पतिच्या दिवशी डोके धुने बंद केले आणि गुरुची पूजा करणे सुरू केले. त्यांना पिवळ्या रंगांचे फूल आणि भोजनाचा नैवेद्य दाखवायला लागली. हळू हळू ते लोक परत आनंदी जगू लागले.  
 
इतर विश्वास: इतर मान्यतेनुसार, वृहस्‍पतिवार, विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पवित्र दिवस होता. या दिवशी केस धुतल्याने त्यांचा आशीर्वाद मिळत नाही आणि घरात संपन्नता येत नाही.  
 
निष्कर्ष: गुरुवारी केस धुण्यासाठी सर्वांचीच मनाई असते. तसंही तुम्ही आठवड्याचे पूर्ण दिवस केसांवर पाणी घेत नाही, तर असे शेड्यूल तयार करा ज्याने तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाही. या प्रकारे तुमची गोष्टही राहून जाईल आणि तुमची श्रद्धा कायम राहील. हिंदू धर्मात केसांना धुण्यासाठी रविवार सर्वात उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी कुठल्याही प्रकारची कथा किंवा मान्यता नाही आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी केसांवर पाणी घेणे हिंदू धर्मात मान्य नाही आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांती: हे धान्य दान करा