Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..

देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..
, गुरूवार, 17 जानेवारी 2019 (00:19 IST)
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी.
शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस पुजू नयेत.
गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपू नये.
शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास हरकत नाही.
देवापुढे श्रीफळ (नारळ) वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये.
देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी वाजू नये.
द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी, दुर्वा तोडू नयेत.
आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास देवू नये.
देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावे.
देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न पसरविता पंख्याने पसरावा.
समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती असाव्यात, सम असू नयेत.
अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
निजलेल्या माणसास कधीही ओलांडून जावू नये.
मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.
दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत. कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
एका हाताने देवाला नमस्कार करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Swapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न