Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी ते कार्तिकी एकादशी,कसा काळ सरला

ekadashi
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (19:31 IST)
आषाढी ते कार्तिकी एकादशी,कसा काळ सरला,
विठुरायाच्या नामानं अवघा काळच व्यापला,
 तुझ्या साठी रे विठू कुणी गेले पायी वारीत, 
कुणी देवळात बसून ऐकले भागवत,
कुणी रंगले देवा, भजन कीर्तनात,
एकच द्यास होता देवा, रममाण तुझ्या नावात,
नेम केले कैक जणांनी, तुझ्याच नावाने,
दान धर्म बहु केला, कोण्या कोण्या रूपाने,
चातुर्मासा चा हा काळ, पवित्र-पावन,
रंगू तुझ्या नामात, धन्य होईल रे जीवन!
..अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shani Pradosh Vrat कधी आहे शनि प्रदोष व्रत? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह 5 अचूक उपाय