Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अन्न दान का करावे, जाणून घ्या अन्न दानाचे महत्व

अन्न दान का करावे, जाणून घ्या अन्न दानाचे महत्व
, शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (16:19 IST)
अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. जो मनुष्य रोज नित्य अन्नदान करतो त्याला संसाराची सर्व फळे प्राप्त होतात. अन्नदान हे एखाद्याच्या कुवतीनुसार आणि सोयीनुसार केले पाहिजे. यामुळे परम कल्याणाची प्राप्ती होते. विशेषतः अन्नदान हा जीवनातील आदराचा घटक आहे. म्हणून गरजूंना अन्नदान केले पाहिजे, अन्नदान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि इहलोक आणि परलोकात सुख प्राप्त होते.
 
अन्न हा जीवनाचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते. धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत. अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा, असे सांगितले आहे. अन्नदान करण्याचे अनेक फायदे आहेत. आपण अन्नदान का करावे किंवा अन्नदानाच्या फायद्यांबद्दल जाणून घ्या-
 
दान नेहमी स्वतःच्या इच्छेने केले पाहिजे. कोणत्याही दबावाखाली केलेले दान कधीही शुभ फळ देत नाही.
 
धर्मादायासाठी दान केलेल्या कोणत्याही वस्तू, त्या नेहमी सर्वोत्तम दर्जाच्या किंवा तुम्ही स्वतः वापरता त्यासारख्याच असाव्यात. कमी दर्जाच्या वस्तू दान करू नयेत.
 
गरजू आणि पात्र व्यक्तीला नेहमी दान करा. दुष्ट आणि श्रीमंत व्यक्तीला दान करणे फलदायी नाही. 
 
ब्राह्मणाला दान द्यायचे असेल तर ब्राह्मण सात्विक, सदाचारी आणि ईश्वरभक्त असावा हे लक्षात ठेवा. दुष्ट ब्राह्मणाला दान करणे निष्फळ आहे. 
 
जर तुम्हाला ग्रहांसाठी दान करायचे असेल त्याच ग्रहासाठी दान करा जे त्रासदायक आहेत. अनुकूल ग्रहांचे दान तुम्हाला अडचणीत आणू शकते. 
 
बाहेरच्या व्यक्तीला दान करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबात काही कमतरता तर नाही याचा विचार करा. आधी तुमच्या आश्रितांची व्यवस्था करा, मग दान करा.
 
अन्नदान केल्याने 21 पिढ्यांचा उद्धार होतो.
 
जे अन्नदान करत नाही त्यांना परलोकात उपाशी राहावं लागतं.
 
अन्नदान करणारा शिवलोकात जातो.
 
अन्नदान हे असे दान आहे ज्यात दाता आणि भोक्ता दोघेही संतुष्ट होतात.
 
अन्न दानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही. ते नित्य वाढत असते.
 
योग्य मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग दानधर्माच्या कार्यासाठी उपयोगात आणावा.
 
भुकेलेल्याला अन्न देणे परलोकात उपयोगी पडतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pradakshina प्रदक्षिणा मंत्र आणि प्रदक्षिणा घालण्याचे महत्व आणि योग्य पद्धत