Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंदू धर्मात हत्ती पूजनीय का? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

हिंदू धर्मात हत्ती पूजनीय का? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
, शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (16:39 IST)
भारतीय धर्मात आणि संस्कृतीत हत्तीला खूप महत्त्व आहे. हत्तीची पूजा केली जाते. हत्तीशी संबंधित बऱ्याच गोष्टी आणि पौराणिक कथा भारतात प्रख्यात आहे. चला जाणून घेऊ या की हत्तीची पूजा का केली जाते.

1 गायी प्रमाणे हत्ती देखील प्राचीन भारतातील पाळीव प्राणी आहेत, विशेषतः दक्षिण भारतात प्राचीन काळात हत्ती अधिक प्रमाणात असायचे. हे त्याच प्रकारे की ज्या देशात घोडे अधिक प्रमाणात होते त्यांच्यासाठी घोडे महत्त्वाचे असायचे. प्राचीन काळापासून लोक आपल्या सैन्यात हत्तींचा समावेश करायचे. प्राचीन काळात राजांकडे हत्तीचे भलेमोठे सैन्य असायचे जे शत्रूंना ठार मारून राजाला जिंकवायचे. म्हणून देखील हत्तीची पूजा केली जात होती.

2 भारतातील बहुतेक देऊळाच्या बाहेर हत्तीची मूर्ती लावतात. वास्तु आणि ज्योतिषानुसार भारताच्या घरांमध्ये देखील चांदी, पितळ आणि लाकडाचे हत्ती ठेवण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की ज्या घरात हत्तीची मूर्ती असते तेथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते. हत्ती घरात, देऊळात आणि महालाच्या वास्तु दोषाला कमी करून त्या ठिकाणचे सौंदर्य वाढवतं.

3 हिंदू पौराणिक मान्यतेनुसार हत्तींचे जन्म चार दात असणाऱ्या ऐरावत नावाच्या पांढऱ्या हत्ती पासून झालेले आहे. म्हणजे ज्या प्रकारे माणसाचे पूर्वज बाबा आदम किंवा स्वयंभू मनू आहेत, त्याचप्रमाणे हत्तीचे पूर्वज ऐरावत आहे. ऐरावताची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली होती तेव्हा इंद्राने त्याला आपल्या जवळ ठेवून घेतले होते. ऐरावत हा पांढऱ्या हत्तींचा राजा आहे. इराचा अर्थ पाणी आहे, म्हणूनच 'इरावत (समुद्र) पासून उत्पन्न झालेल्या या हत्तीचे नाव 'ऐरावत' ठेवले. म्हणूनच त्याचे 'इंद्रहस्ती' किंवा 'इंद्रकुंजर' हे नाव देखील पडले. गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुन, हत्तींमध्ये मीच ऐरावत आहे.

4 या प्राण्याचा संबंध विघ्नहर्ता गणपतीशी आहे. गणेशाचे तोंड हत्तीचे असल्यामुळे त्यांचे नाव गजतुंड, गजानन इत्यादी आहेत. म्हणून देखील हत्ती हिंदू धर्मात पूजनीय प्राणी आहे. हिंदू धर्मात हत्तीची पूजा करण्यासाठी गज पूजाविधी करतात. घरात सौख्य आणि समृद्धी यावी या साठी हत्तीची पूजा केली जाते. हत्तीला पुजणे म्हणजे गणपतीची पूजा करण्यासारखे आहेत. हत्ती शुभ शकुनाचा आणि लक्ष्मी देणारा मानला जातो.

5 श्रीमद्भागवत पुराणानुसार हत्तीने केलेल्या विष्णू स्तुतीचे वर्णन आढळतात. असे म्हणतात की क्षीरसागरात त्रिकुट डोंगराच्या घनदाट अरण्यात अनेक हत्तींसह त्या हत्तींचा प्रमुख गजेंद्र हत्ती राहत होता. याचे वर्णन आपल्याला गजेंद्र मोक्ष कथेत देखील आढळतं. गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय एका नदीकाठी एका मगराने आपल्या जबड्यात धरला. त्यांनी आपला पाय त्या मगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्री विष्णूची स्तुती केली. श्री विष्णूनी त्या मगराच्या जबड्यातून त्याला सोडवले होते. असे म्हणतात की हा गजेंद्र पूर्व जन्मी इंद्रद्युम्न नावाचा द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळ कार्यात पंच देवाच्या पूजेचे महत्त्व