Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

भूत पिशाच्च योनीपासून मुक्तीसाठी जया एकादशी

jaya ekadashi
एकादशी व्रत सर्वोत्तम मानले गेले आहे. चंद्र स्थितीमुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती वाईट आणि चांगली होत असते. अशात एकादशी व्रत केल्याने चंद्राचा वाईट प्रभाव कमी होतं तसेच इतर ग्रहांचा वाईट परिणाम देखील कमी होण्यात मदत मिळते. कारण एकादशी व्रताचा सरळ प्रभाव शरीर आणि मनावर पडत असतो. परंतू एकादशीला लाभ तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याचे नियम पाळले जातात.
 
महत्त्व
मन आणि शरीर एकाग्र होतं.
जया एकादशी व्रत केल्याने पाप नाहीसे होतात, पापांपासून मुक्ती मिळते.
भूत, पिशाच्च, वाईट योनीपासून मुक्ती मिळते.
व्यक्तीचे संस्कार शुद्ध करतं.
श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याप्रमाणे माघ मासातील एकादशी म्हणजे जया एकादशीला व्रत केल्याने नीच योनी तसेच भूत पिशाच्च योनीपासून मुक्ती मिळते. याने वैकुंठाची प्राप्ती होते.
 
 
नियम
हे व्रत दोन प्रकारे करता येतं. निर्जला व्रत, किंवा फलाहारी आणि जलीय व्रत.
निर्जला व्रत पूर्णपणे स्वस्थ व्यक्तीने करायला हवे.
शक्य नसल्यास फलाहारी व्रत करावे.
या दिवशी विष्णूंची पूजा, ध्यान करून व्रत संकल्प घ्यावा.
धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृताने प्रभू विष्णूंची पूजा करावी.
सकाळ-संध्याकाळ प्रभू विष्णू मंत्राचा जप करावा.
रात्री जागरण करावे.
द्वादशीला ब्राह्मण भोजन करवून त्यांना जानवे आणि सुपारी देऊन विदा करावे.
या प्रकारे नियम आणि निष्ठापूर्वक व्रत केल्याने पिशाच्च योनीपासून मुक्ती मिळते.
 
काय टाळावे
दशमीपासूनच तामसिक आहार सेवन करणे टाळावे.
वाईट व्यवहार आणि विचार करणे टाळावे.
आरोग्य परवानगी देत नसल्यास उपास करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराजांच्या इष्ट देवामुळे शत्रूची योजना ठरली निष्फळ