८ व्या शतकाच्या दरम्यान ६३ तामिळ-हिंदू संत ज्या शैव सिद्धांताच्या प्रचार-प्रसारात कार्यरथ होते, 'नयनार' म्हणून ओळखले जायचे. कन्नाप्पा नयनार ह्यांच्यामधूनच एक होते.
कन्नप्पा नयनार दक्षिण भारतेचे एक कट्टर शिवभक्त होते आणि त्यांचं श्रीकालहस्तीश्वर [आंध्रप्रदेश] मंदिराशी खूप जवळच नातं होतं. ह्यांना थिन्नप्पन, दीना, कन्नप्पा, तिन्नप्पन, धीरा, भक्त कन्नप्पा, थिन्नन, कन्नप्पन, दिनय्या, कन्नय्या, कन्नप्पा नयनार किंवा नयनमार, कन्नन, भक्त कन्नप्पन आणि धीरन नावानी पण ओळखलं जातं. कन्नाप्पा आंध्रप्रदेशेत जन्मेळे शिकारी सामुदायाशी संबंधित होते.
एक पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की अर्जुन कलयुगात सगळ्यात मोठा शिवभक्त म्हणून जन्मास येईल आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल असं शिव शंभू यांनी द्वापर युगामध्ये अर्जुनला वरदान दिलं होतं आणि हे शक्य झालं. कलयुगेत कन्नप्पा नयनार यांचा जन्म झालं.
शिकारी असल्यामुळे त्यांना भक्ती कशी करायची हे माहित नव्हतं. कन्नप्पा यांनी तोंडामध्ये भरलेल्या पाण्याने शिवलिंगावर जल अर्पित केलं होतं आणि शिकार केलेल्या जनावराचे मास देखील चढवले होते. शिव शंभूंनी हे सगळे काही स्वीकारले कारण की कन्नाप्पाचं हृद्य आणि भक्तीचा भाव खूप शुद्ध होता.
एके दिवशी शिव शंभूंनी भक्त कन्नप्पांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि मंदिरात कंपन पैदा करून मंदिराची छत पाडली, हा दृश्य बघून सगळे लोकं मंदिरातून पळून गेले पण कन्नप्पा यांनी शिवलिंग वाचवण्यासाठी आपल्या शरीराने शिवलिंगाला झाकून घेतलं, नंतर त्यांना शिव शंभूच्या डोळ्यांनी पडतं असलेलं रक्त दिसलं, हे बघून कन्नप्पा यांनी पटकण तीर काढून स्वतःचा एक डोळा काढला आणि शिव शंभूला लावून दिला.
परीक्षेला आणखीन अवघड बनवून शिवशंभूंनी दुसऱ्या डोळ्यातून पण रक्ताचा प्रवाह सुरु करून दिला. आता कन्नप्पा यांनी विचार केला की जर त्याने दुसरा डोळा पण काढलं तर त्याला कसं कळेल की हा डोळा नेमका लावायचा कुठे ? ह्यासाठी त्यांनी स्वतःचा एक पाय शिवलिंगाच्या डोळ्यावर ठेवला आणि दुसरा डोळा पण काढण्याच्या प्रयत्न करत असतानाच कन्नप्पांची ही भक्ती बघून शिव शंभू तिथे प्रकट झाले आणि कन्नाप्पांना त्यांचे दोन्ही डोळे प्रदान केले आणि त्यानंतर कन्नप्पांना मोक्ष प्राप्त झालं.
ह्यामुळे हिंदू संस्कृतीप्रमाणे कन्नप्पा यांना पहिला नेत्रदानी म्हटलं जातं.