Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खंडोबाचा अभंग आणि गोंधळ

खंडोबाचा अभंग आणि गोंधळ
, शनिवार, 7 डिसेंबर 2024 (06:00 IST)
॥ खंडोबाचा अभंग ॥
देव खंडेराय महालसाधव । जेजोरीचा देव भावलभ्य ॥१॥
लभ्य नसे योगा तो हा भक्ती योगा । गम्य घे अभंगा अंगादेव ॥२॥
देव दु:खहारी मणि मल्लारी । निजभक्ता तारी वारी क्लेश ॥३॥
म्हाळसाकांत हरमूर्तिमंत । खंडोबा महर्त ख्यात दैवी ॥४॥
कैवारी प्रार्थितो तो त्रिपुरारी सुरवरी । अवतार जो प्रसिध्द मल्लारी क्षितिवरी ॥ध्रु॥
सरदारी घेई बाणा शाहाणा जो सुरवरी । श्रुतिमय हो अश्व ज्याचा प्रभु बैसे त्यावरी ।
उपनिषद्वाक्यशास्त्रे तरवांरी घे करी । मारी क्रोध हेचि मणिमल्लादिक अरी ॥१॥
जो दैवा सुरसंपदामिध सेना आंसुर संपद्रिपुद्रिशी रण करी जो दारुण ।
औषनिषद्वाक्यशस्त्रे मारुनिया अरिगण । लिंगाख्या सुरपुरीचे चूर्ण करी निजकरी ॥२॥
मारुनिया सर्व शत्रू, वश करुनि सुरगण । श्वानभूति म्हाळसे जो निज अंकी घेऊन ।
साम्राज्य करुनी राहे निजछंदे अनुदिन । वंदु तया खंडेराया जो भजका उध्दरी कैवारी ॥३॥
ALSO READ: खंडोबा भंडार मंत्र आणि भूपाळी
गोंधळ
वहिली आरती गोंधळाला, गोंधळाला जेजुरी गडच्या खंडेरायाला भंडारा उधळा ॥ध्रु॥
नऊ लाख पायरी गडा । मगच वर चढा । मंदिरी दिवटी पेटवा । भंडारा खोबरं उधळा ॥१॥
अशी गोंधळ्यांची गर्दी । भक्त चढतात वरती । म्हाळसाकांत अवतारी । दिवटीशी तेल जाळी ॥२॥
आलो तुझिया मंदिरा । पावशी आम्हा लवकरा । भक्त लागे पाया । आवाज घुमविशी सुबकाला ॥३॥
या आरतीच्या सुरावरी । वाघ्या-मुरळी चाल धरी । जीव फुले आमुचा । पाहूनी घंटीला ॥४॥


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Champa Shashthi 2024 चंपाषष्ठी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी