Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खंडोबाचीं पदें

khandoba
, शुक्रवार, 3 मे 2024 (12:17 IST)
श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.
 
खंडोबाचीं पदें - गण १
श्रीरंग झाले प्रसन्न, गणपती सभेसी येऊन ॥
गण सभेमध्यें कांही आले, बादशाही मुजरे केले ।
येऊन सभेमध्ये बसले, रंगराज बहु लोटले ॥श्रीरंग॥
तूं गजानन गणपती, कैलास तुमच्या हातीं ॥
बैठक दरवाज्यावरती, कै काळ तुला कापती ॥
वंदितों तुमचें चरण, गणपती सभेसी येऊन ॥श्री॥
 
खंडोबाचीं पदें - गण २
महाराजा मल्हारीरे, तुझ्यावीण कोण तारी जीरंग ॥
आदी ठिकाण पेंबररे, देवा धरला अवतार ॥
देव नंदीवर स्वार, संगें दिवटयाचा भार जी ॥
वर उधळे भंडाररे, मुखें एळकोट मल्हार जी ॥
महाराजा मल्हारीरे, तुजवीण कोण तारी जी ॥
 
खंडोबाचीं पदें - गण ३
प्रथम घंटा घेतला हातीं, प्रथम घंटा जी ॥
प्रथम घंटा घेतला हातीं, नमूं गणरायाला जी ॥
नमूं गणरायाला विनविती संगें सारजा जी ॥
सारजा कीं ज्याची होती जी रे जी, पायीं पैंजण रे रे ॥
पायीं पैंजणरजाजीन घागर्‍या वाजती ॥मिळवणी॥
अहो नमी नमले देव महाराज म्हाळसापती, जी ॥
गणराज आले तेव्हां धाऊन, गणराज आले धाऊन ॥
युद्धा मांडिला जी, महा दारुण दैत्य कापीले जी ॥
दैत्य कापीले ज्यांनी मर्दून आरे जी र जी ॥
धावा करती रे रे, धावा करती विघ्न हारती ॥
नमी नमले देव महाराज म्हाळसापती ॥२॥
 
खंडोबाचीं पदें - झेंडा पद
येशाचा झेंडा देरे मलुराया मारतंडा, जो ॥चाल॥
नको रे नको मला देऊं अभिमान तुला हांसल जन ॥
एवढयासाठीं मी तुजला शरण जी ॥
कांहीं शरण मरण तुझा नीत्य नामीझ ऐकतो झेंडा ॥१॥
नकोरे सातारा देऊं मला इतका, मी तुज मागता ॥
पंगती प्रपंच नको भगवंता जी, तुम्ही कसे वाढता ॥
एकाला चौरी एकाला हांडा येशाचा ॥२॥
देरे गणगोत कुटुंब कराया, वंश वाढायाला ॥
नको रे नको धाडु कुठें हिंडाया, जीवन लागले तुजला
तुझा नित्य नामी झडकतो झेंडा येसाचा ॥३॥
करारे करा शिव जीवा ध्या वर छाया ॥
कृपेची माया, जोडी रामचंद्र खाली बसाया ॥
जन येईल पाया नित्य नवरा हातामदी खंडाजी ॥येसाचा॥

खंडोबाचीं पदें - पद १
जोत खडे मलुखान, पहाडपर जोत खडे मलुखान ॥
लगे दख्खनका मैदान, पहाडपर जोत खडे मलुखान ॥चाल॥
नीले जर्दपर कडक सवारी, भडक पीले निशाण ॥
मनी मल्लेकु धडक लगाये, घेर लिया आस्मान ॥पहाडपर॥
राव होळकरने किल्ला बनाया, महल जडित हिरखाण ॥
नऊ लक्ष पायरी बनाया, कळस झडके दिनमान ॥पहाडपर॥
किल्ले अंदरसे निकला भुंगा मोगल कहे मलुखान ॥
कहे कुत्तेकु हाड ना बोले, चारि कोट सन्मान ॥पहाडपर॥
कहे मुकुंद गिर चाकर बोले रखो चरणपर ध्यान ॥
बापु वाघास सन्मुख गावे, सिद्ध करी अनुमान ॥पहाडपर॥
 
खंडोबाचीं पदें - पद २
सैनापतिसी दतयार, पालखीत श्रीमल्हार ॥
अर्धांगी म्हाळसानार आधि माया जुदाकार ॥
भालदार, चोपदार कालु करणे जयजयकार ॥मिळवणी॥
भूक देत वाघा दरबारी, मुखी येळकोट ललकारी ॥
आमवशा सोमवारी, कडे प्रति निघाली स्वारी ॥आम॥
लखलखाट मुरळया सजल्या चमचमाट जैशा बिजल्या ॥
मल्हारचरणी रिजल्या संसारगोष्टी त्यजल्या ॥
नामुगूस भजनी भजल्या, संसारगोष्टी सजल्या ॥
मानकरी गडे सैना सारी, मोरचेल चौरग वारी ॥आम॥२॥
कोतवाल तुरंग वढले, मंडळांत तेजी सुटले ॥
ठाई ठाई लंगर तुटले, भंडार पोती लुटले ॥
स्नानाला स्वामी उठले, दर्शनास जन हे तटले ॥
दहिदूध पंचामृत झारी, न्हानिवले देव मल्हारी ॥३॥
पोशाख करुनिया देव, रंभाईच्या महाली आले राया ॥
रंभाईचा पाहुनिया भाव, झाले प्रसन्ना खंडेराव ॥
उद्धरुनि सत्वर भाव, दिला चरणी तिजला ठाव ॥मिळवणी॥
गाय धोंडु ग्यानु दरबारी, द्या सुवर्ण मजला वारी ॥आमवाशा॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३
मल्हारी किती तुजे गुण गाऊं, तुझ्या चरणीं लपट होऊं ॥चाल॥
नऊ लक्ष पायरी जेजुरगडाला, दीपमाळ हारोहारि दोहि बाजुला ॥
देव दवणा भंडार वाहूं, तुझ्या चरणी लपट होऊं ॥मिळवणी॥
बाणु म्हाळसा दोघी या नारी, पाठी भैरवनाथ आहे जोगेश्वरी ॥
दर्शन तें घेऊं तुझ्या चरणीं लपट होऊं ॥मिळवणी॥
रंभाई शिंपिण, पुढें फुलाई माळीण हार घालिती परोपरीन ॥
मल्हारी देव पाहूं, तुझ्या चरणीं लपट होऊं ॥मिळवणी॥
 
खंडोबाचीं पदें - पद ४
मल्हारी तुझ्या चरणीं हा लीन झालों मी ॥चाल॥
रात्र न दिवस देवा तुझा ध्यास नाहीं आसरा कोण तारी हा देवा तुझ्यावीण ॥धृ०॥मल्हारी॥१॥
तुझें नांव घेतां तुझे गुण गातां भूक गेली माझी तहान, हा हरपला शीण ॥२॥
तुझा वेढा त्रिभुवनीं डौल पठानि वाळू साज करुनि हा मोतियाचा जीन ॥३॥
शंकर वाघ नित्य कवन करि, नित्य गाई नव्या चाली हा देवा तुझ्यावीण ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद ५
धनी मारतंड मल्हारीरे धनी ॥चाल॥
त्रिशूळ डौर हातीं स्वर्ग विलासी घोडयावर केली स्वारी ॥
वाघा मुरळें गायन करतीग मधी देव मल्हारी ॥धनी॥मल्हारी मल्हारी मल्हारी॥
गुणी बाबाजी गोकुळ गातो ग नवे छंद ललकारी ॥धनी॥
 
खंडोबाचीं पदें - पद ६
म्हाळसा म्हणे देवाला । करावा ग मान ॥अहो मान॥
मी नाहीं बोलले तुमच्या गळ्याची आण ॥
मी हो लग्नाची अस्तुरी म्हाळसा ग राणी ॥अहो राणी॥
कसा काय झाला अन्याय सांगा मजला कोणी जी ॥
हें बावन घरचें सोनें तरा तोलोनी ।
का उदास केलें, चित्त उरलें मन जी ।
जाई जुई आणि शेवंती शेष भरोनि ।
या उदाच्या उदबत्त्या, दिल्या लावोनि जी ॥
तुम्ही त्रिलोक्याचे धनी बसावें येऊनी ॥
मी नाहीं बोलले तुमच्या गळयाची आण ।
म्हाळसा म्हणे देवाला करावा ग मान ॥अहो मान॥१॥
तुम्ही उठा किं भोजनाला स्वामी हो राया ॥
हंडयामध्यें पाणी ठेविलें तुम्हाला न्हाया जी ॥
म्या वेळीलेत बोटावे, आणिक शेवया ॥
पांच ग्रास बसून जेवा स्वामी राया ।
या धरितवारि हिरा कशाचि ग छाया ॥अहो छाया॥
तुम्हावांचुनी माझी कोण धरील आज माया ।
तुम्ही दुसर्‍याचे ऐकुनि घेतले हो रान ।
मी नाही बोलले तुमच्या गळ्याची आण ॥२॥
बाणुचा कोठे ठिकाणा आणा हो ध्यानात ।
काळी काठी बाग लहान, खाण देशांत ।
आले बाणुला घेऊन पुरविला ग हेत ।
काय बाणुला आणून ठेविलें रंगमहालांत ।
डोईस मुदरा घडी झाली गावांत ।
बाळा कृष्ण करी जोडनी बहुत गंमत ।
चोहोकुन झाली दाटी लाग चालेना ।
मी नाही बोलले तुमच्या गळ्याची आण ॥३॥
 
खंडोबाचीं पदें - पद ७
म्हाळसा बोले बाणुला कसा मल्हारी वेडा केला ॥चाल॥
कसे भुलले मल्हारी वारी धारि पदरि यानी गवर आणली ॥
घरीं शेळ्या मेंढया धुवाकरी येती घुरट घाण मजला ॥म्हाळसा बोले बाणुला ॥१॥
बाणु बोले म्हाळसाला, नको टाकून बोलूं मला देव माझ्या महाली आला
म्हणे चाकर ठेव मला हा नांवाचा धनगर झाला॥म्हाळसा॥२॥
गबर पार्वती होती, जेजूर गगवरी राहती राम हाळकर लागे चरणाला ॥३॥
 
खंडोबाचीं पदें - पद ८
खंडे राया देवा मल्हार तुला दोघीया नारी,
एका परीस एक आहेत दोघी सुंदरी
जसी रे ज्योतीमध्ये ज्योत म्हाळसा आहे ग रत्‍न,
जशी हिर्‍याची ग खाण बानुबाई आहे सुज्ञान ।
सुवर्ण केश कुरळे शोभे तुमच्या या कारण ॥
घेऊनी हातामध्यें ऐना बाणु कुंकू लावुन ॥चाल॥
भांग मोत्यानी शिरी भरुन जी कपाळी कुंकू लावून जी
बाणुचे रुप दारुन जी खंडेराव आले लुवदुन जी ॥मिळवणी॥
अहो जसा दिसे हिल्लाळ अमृत ढाळ बिनीपरी
धनगराच्या घरीं जन्मली बानुबाई खरी जी खंडेराया॥
रंगमहालमधीं पलंग टाकिला दोहीची खुण उंच शाल नेसून बनली पद्‌मीण जी ॥चाल॥
मुद राखडी आहे शिरी चारी बोरवेणी वरि जी, चंद्रकोर शोभे त्यावरी जी,
घोस वाळ्याचे कापावरी जी गळा गरसुळी
पेंड मोत्याचें चित्त पेत्यावरी आणिक माळ चमकती माळ हार त्याच्यावरी ॥२॥
पृथिवीचा धनी दक्षणि जागा आहे थोर आखंड गर्जे पृथिवीवरती राजा मल्हार जी ।
मोठे मोठे उमराव येती लेवून भंडार बगाडे लावितो,
त्याचे सत्व आहे थोर जी ॥चाल॥
मुखी येळकोट बोलती, पाप दोष भंग जाती देव खंडु विनविती,
स्वामीराया हैबती असुनी द्यावी दया कृपेची छाया मल्हारी,
सदा भाव अंतरी आले विघ्न दूर करी ॥खंडेराया॥३॥
 
खंडोबाचीं पदें - पद ९
केले सुख सोहोळे मायबापानी लग्नाचे ।
तुमच्या पदरी मल्हारे बांधिले राज हौश्याचें जी ।
घेऊनी आली जेजुरी चौघडे वाजती सोन्याचे ।
नऊ रे लक्ष पायरे, दख्खन आहे जडावाचे जी ।
दासी बटके व धरिल्या खरी नेल्या मंदिरी ।
विडे हो घेतले जी । विडे हो घेतले जी ।
हार गजरे गुंफुनी अंतरी पलंगावरी देवाला बसविले जी ।
आपल्या नांवाचा पिवळा झेंडा, भडके देवाचा झेंडा ॥१॥
म्हणे म्हाळसा देवाजीला ऐकावे अर्जी महाराज ।
उमर माझी लहान तुमचे रक्षणचे मर्जी ।
सासबाईनें ग वावर जत्राग नेले शांभाला ।
भुलेश्वर पुजून स्वारी आली जेजुरीला ।
नाहाणाचे सुख सोहाळे मोती ग खिळले मखराला ।
मग फुलांची जाळी घातली गांठ शेलेला ।
दोघे बसून चौकावरी तुम्हां शेजारी हळद लाविली जी ।
आल्या अवघ्या नगराच्या नारी राजमंदिरी ओटी ग भरली ।
वाट पाहात बैसली कचेरी गेले देवाचे ।
उमर माजी लहान तुमचे रक्षणचे मर्जी ॥
 
खंडोबाचीं पदें - पद १०
गड जेजुरीला चला जाऊं या आतां धनी म्हाळसाकांत पाहु डोळा ॥चाल॥
बेल दवणा भंडार वाहूं शिरी, देवा तुझ्यावीण कोण नित्य तारी ॥धृ॥१॥
आम्ही हीन दीन तारी तूं दयाळा, आलों शरण तुम्हां करा प्रतिपाळा ॥चाल॥
कवि शंकर वाघा उभा दरबारी देवा तुझ्यावीण नित्य कोण तारी ॥२॥

खंडोबाचीं पदें - पद ११
जेजूर नगरी आजाव गुजरी नांदे मारतंड मल्हारी ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
सभेसी बैसला कैलासराणा म्हाळसा बाणु दोघी या ललना ।
दोही बाजूला शोभे देवांगना ॥मिळवणी॥
भक्त येती नवस करिती प्रसन्न होती शिव हार हार हार ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापिती थार्‌थार् थार् ।
जेजुर नगरी अजाब गुजरी ॥१॥
नाम शोभले तुला मारतंडा त्रिलोकांमध्यें
शोभतो खंडा पिवळे निशाण झळकतो झेंडा ।
स्वर्ग घेतले, दैत्य मर्दिले, भक्त तारिले फार् फार् फार् ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
नऊ लक्ष पायरी शोभे गडाला, दीपमाळा हारोहारी दोहि बाजूला ।
भक्तांची दाटी झाली दरवाज्याला, छंद देवाचा,
नाद घोळाचा, भंडाराचा होतो भडिमार ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार थार थार ।
चैत्र पौर्णिमेसी आनंद फार, भक्त मिळूनी करिती जयजयकार ।
विठु वाघा उभा जोडुनी कर, मनी भाव, चरणी ठाव,
देवा पाव हे मज फार् फार् फार् ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
 
खंडोबाचीं पदें - पद १२
मलुखान मौला धनी, वखत पर आन बनी ।
कमन चडे मली मलपर झेंडा, आत्म मचिले हातमो खंडा,
ज्याके मिला है उत्तरो लोंढा घेरलिया दैत्योका तंडा ॥मालुखान॥
यशवंतरावकी पहिली गुजरि तेत्तीस कोट देवत हजरी ।
शब्द ऋषीके कुइ दिन गुदरी ।
शाही होळकर की घेरी घेरी मदत मल्हारी गंगा उत्तरी मलुखान॥
व्हा नारत की स्वारी आई उत्‍ने कैलास की राहा बताई ।
गो ब्राह्मण सब दुनिया सताई मलुखान ॥
जुलुम जुलुम मोंगल का दंगा ।
किल्ले अंदरसे निकला भुंगा ।
शरण शरण है पठार लिंगा कवि मुकुंद गिर बापुजी वाघा ॥मलुखान॥
 
खंडोबाचीं पदें - पद १३
मुजे छोड मलुखान क्या हुवा दिवानजी ॥चाल॥
तुम बडे तीर्थवासी पेंबरके रहिवासी ।
मलुखान राजबनसी त्रिलोकमोवासी ॥मिळवणी॥
आवेरी तरा बाना क्या हुवा दिवानजी ॥१॥
मुजे आब जाती पेंबरकु कयले सर बेचनेकु ॥
मेरी सास बुरी घरकु मज हटकावे मुजकु ॥मिळवणी॥
मेरा तुट पडे दैना क्या हुवा दिवानजी ॥२॥
मेरी छोड दिया साडी रे बारीक चुनडी फाडी ।
नऊ लडया हार तोडी रे हात क्या चुडा फोडी ॥मिळवणी॥
मोती चुपे आंगणा क्या हुवा दिवानजी ॥३॥
महिपति कुला ऐका शिरमाज बडा बाका नाम
मलुखान उनका ठाणेदार दख्खन का ॥मिळवणी॥
बाजे ताण नगरखाना क्या हुवा दिवाना ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद १४
आम्ही गडे लिंगाईत वानी जी जी जी । जी ग आम्ही गडे ॥चाल॥
शिवधर्म आमचा अग नारी शिवधर्म आमचा
सदोदित शिवाच्या ध्यानीं झांकुनी घेतो अन्नपाणी जी जी जी जी ग ॥झांकुनी॥१॥
काची बंद आगणी हिरे खडे घेतो लोखरणी स्नान गंगेचे करोनि जी जी जी जीग ॥
स्नान गंगेचें करुन तुलसी पूजन कपाळीं विभुत लावुनी
धर बाटविलें येऊनी जी जी जी ग जी घर बाटविलें ॥धृ०॥
कसा भुलविला देव अग नारी कसा भुलविला देव
वेडा केला मल्हारी म्हाळसा बोले बाणु नारी ग जी जी जी जीग ॥
म्हाळसा बोले बानु नारी जी ॥२॥
म्हाळसा बोले झिडकारुन जी जी जी म्हाळसा ॥
तुम्ही धनगरणी आरवट येती अंगाची घाण ।
तुमचे रानामधी राहाणे ग जी जी जी । तुमचे ।
नाहीं महाल मंदीर तुम्ही तर दैवाचे हीन ।
देवाचें स्वरुप पाहून जी जी जी देवाचें ।
तीस झाले लंपट लागले देवाच्या चरणीं लागले मातुच्या चरणीं जी ॥धृ०॥
कसा भुलविला देव अग नारी कसा भुलविला देव,
वेडा केलास मल्हारी म्हाळसा बोले बानु नारी जी ॥
 
खंडोबाचीं पदें - पद १५
मुख दावुन बानु ग गेली स्वारी देवाची ग वेडी झाली ।जी।
एकदा मधानीच्या आमलांत देव मल्हारी निदरागत ।
बानु नार आली स्वशनारत हिने उशाला मांडी ग दिली ।
स्वारी देवाची ग वेडी झाली । जी । मिळवणी ॥
ह्याग बानु नारीचे आंग जसे चमके ऐनेच भिंग ।
देव मल्हारी झाले दंग गोष्ट देवाच्या मनीं ग ठसली ।
स्वारी देवाची ग वेडी झाली मुख दावुन बानु ग गेली ।
स्वारी देवाची ग वेडी झाली मुख दावुन ॥२॥
 
खंडोबाचीं पदें - पद १६
गिरीवरले गिरीवर जायक पठार लिंगा आदिशक्ति म्हाळसा बानु शोभती गंगा ।जी।
शिव शिव नामामृतरससार श्रवण करावें वारंवार जावें बहुसागर उतरुन फार ।मिळवणी ।
भक्तिमुक्तिच्या दरबारी रंगले रंगा । आदिशक्ति म्हाळसा बानु शोभती गंगा ॥१॥
पति घालुनिया बळकट मिठी पाहावे शोधून
अंतर दृष्टी प्रभुनें रचना रचली सृष्टी त्यामधी भक्तजनाच्या भेटी होती प्रसंगा आदिशक्ति ॥२॥
करुनिया कर्माचा नाश जावे बहुबंदन तोडून पाश,
जगदीश पुरविल आस मिषशील दंगा आदिशक्ति ।
रामभाऊ सदा सेवक भिकारी गळ्यामध्ये घालुनिया भंडारी
उभे सद्‌गुरुना याच्या द्वारीं कर जोडून मागतो वारी मिळून सत्संग ॥मिळवणी॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद १७
मल्हार मल्हार वाचे घोका, पुढें पाऊल टाका ।
मल्हार मल्हार वाचे धोका ॥चाल॥
मल्हार धोकीता । चुकेल चौर्‍याऐशी यमाची फाशी ।
मल्हार मार्तंड तीर्थ काशी, ही घडेल कैशी ।
येऊन सार्थक करा जन्माशी जा भेटा त्याशी एवढा सांगतो मंत्र तुम्ही ऐका ।
पुढे पाऊल टाका ॥ मल्हार ॥१॥
मल्हार माझा गुणाचा मोठा हार घालूं कंठा याचें नांव घेतां सुचतील वाटा काय
पुजुनी गोटा शोधा मनीं अंतरीं ओळखा । पुढें पाऊल टाका ॥मल्हार॥२॥
मल्हार शिव शंकर भोळा भक्तिचा डोळा याला ओळखील,
तो एक विरळा त्याला लागल जिव्हाळा मोठा कनवाळु
मनाचा कवळा फार करील सोहोळा शोधा मनीं अंतरी ओळखा पुढें पाऊल टाका ॥मल्हार॥३॥
 
खंडोबाचीं पदें - पद १८
मल्हार नाम बहु गोड भला । मल्हार नाम बहु गोड ।
त्यापुढे काय साखर पेढा आरे हो जी ।
अंजीर द्राक्षाचे घड काय करावे आंबे पाड आरे हो जी ।
देव कल्पद्रुमाचे झाड । कल्पिता जन्माची जोड जारे हो जी ।
आली बनून सुंदर घटका, घ्या अमृताचा घुटका आरे हो जी ।
गातो मल्हारी नामी चुटका । घ्या अमृताचा घुटका आरे हो जी ॥२॥
मल्हार नम गुण धैना । भला । पहा शोधून अंतःकरणा आरे हो जी ।
जे असतील ब्रह्मज्ञानी । भला । ते पाहातील वेदवाणी आरे हो जी ॥
ह्यांत एक शब्द नाहीं लटका ।भला।घ्या अमृताचा घुटका ।आरे हो जी ॥मिळवणी॥
गाती मल्हार नामी चुटका । घ्या अमृताचा घुटका ।
घ्या अमृताचा घुटका । आरे हो जी ॥३॥
 
खंडोबाचीं पदें - पद १९
भरगच्ची पायजमा अंगामधि झगा बांधला चिरा ।
लिंगकार गळ्यामधी डौल पठार लिग मोहरा ॥
बिगबाळी कानी चौकडा, मुदीवर खडा चमकतो हिरा ।
लालीलाल अंगावर शाल, मोत्याचा तुरा ।
घोडयानीं धरते मंडळ अष्ट कमळ फिरतो वारा ॥
स्वरुपाच्या फाकल्या प्रभा जशा काय तारा ॥चाल॥
देखली नाम नगरी आरे मालु निळ्या घोडयावर आहे
स्वारी आरे मालु तेथें उतरले मल्हारी अरे मालु॥मिळवणी॥
नगर नारी सांगती तिला रंभाई शिंपिणीला मुशाकर गुंडाजी
जी आम्हा वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा
मन पवन वारु तो रंग नाम फीरंग हातामध्ये खंडा जी ।
आम्हा वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ॥१॥
बोली बोलतो कानडा पुसतो बागा चालला नीट जी जी ।
रंभाईने पाहिला देव राजे निळकट पांची प्राणांची आरती घेऊन
राव हातीं सोन्याचें ताट अभिमान रांगोळ्यावर योगाचे पाट जी ॥चाल॥
लावी उटने नानापरी आरे मालु तेल अत्तरमय लावी गिरी आरे मालु ॥
उंच आबीर विज्यापुरी आरे मालु प्रेमळ सुगंधी कस्तुरी आरे मालु । मिळवणी ।
घंगाळी पाणी चौरंग न्हाती श्रीरंग चांदीचा हांडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ।
मन पाहून वारु तो रंग नाम फी रंग हातामध्ये खंडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ॥२॥
सुकुमार वस्त्र अंग पुसा पितांबर नेसा भडक जरी काठीं
अंगीं भंडाराचें भूषण टिळा ललाटी जी हा आत्म निषद हारु
हार नाजुक प्रकार भरीत तूप रोटी
आहो रोटी तूप पोळ्या साळीचा भात सुगंधीक आमटी जी ॥चाल॥
साठ भाज्या कोशींबरी आरे मालु लोण्याच्या चटण्या हारो हारी ।
आरे मालु घारगे वडे अरे कुरकुरीत अरे मालू ॥मिळवणी॥
परोपरी वाढिल्या खिरी साखर नाहीं पुरी दुधामधि मांडा
आम्हां वाघ्यापुढें गरजतो भडकतो झेंडा मन पावन वारु
तो रंग फी रंग हातामध्यें खंडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा
अचवून घेतला विडा तबकामध्यें पुडा फुलांचा हार पोशाख केला
देवाला जडित सिनगार लालीलाल चमकतो माहाल कोंदणें लाल
हिरे कंकर आंत टाकला पलंग समया चार रंभाईच्या पाहुनी भाव प्रसन्न झाले देव ।
आवई दिलीवर देव भक्ताचा कनवाळू कृपासागर ॥चाल॥
घेऊन आला सुन्दरी आरे मालू ठेवली करेच्या तिरीं
आरे मालू सहा महिन्या सोमवारीं आरे मालू देव जाती तिच्या मंदिरी आरे मालू ॥मिळवणी॥
गुरु मुकींद मनामध्यें धाले सागरी न्हाले प्रेमपुरी लोंढा बाणु
वाघा चरणीं स्थरी पायरीचा धोंडा मन पावन वारु तो रंग फी रंग
हातामध्ये खंडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद २०
मलु नाम मुखी सदा बडबडबड मलु नाम मुखी ॥चाल॥
कठोर पठारी कडेलोट झाला मग बसविले जेजूर गड गड गड मलुनाम मुखी ॥
सूर सनया प्रेम ढोल वाजे गणु गंगाराम मधीं लड लड लड मलुनाम मुखीं.

खंडोबाचीं पदें - पद २१
चला जाऊं पाहूं जेजुरी, मल्हारी मल्हारी मल्हारी
पेट दिसे पिवळी सारी भक्त उभे दरबारी ।
घालुन गळ्यांत व्याघ्रावरी भंडारी भंडारी भंडारी चाला जाऊं ॥१॥
दिवट्याचा जाळ मोठा घोळ वाजे आणु हात ।
साक्षात उभी मूर्त पठारी पेंबरी मयलारी जेजुरी चला जाऊं पाहूं जेजुरी ॥२॥
 
खंडोबाचीं पदें - पद २२
नागडधीम नागडधीम चौघडे वाजती ।
कातु करणे शेडे गरजती ॥
बहिरव पाठीसी प्रधान सारिती ।
पालखींत म्हाळसापती ॥
वर छत्री अबदागिरी चवरी ढळती ।
दोही बाजु डंके वाजती ॥
खूप जाळी झालर गोडे की व शोभती ।
हिरे कोंदणांत चमकती ॥
अंबारी सहीत भजन खर्‍यानें चालती ।
घोडे कोतवाल चालती ॥
जसी लाट समुद्र थाट यात्रा दाटली ।
स्वारी कर्‍हे जाता पाहिली ॥
सुखी यात्रा जेजूरी जागा चांगली ।
स्वारी कर्‍हे जाता पाहिली ॥
सुखी यात्रा जेजूरी जागा चांगली ।
स्वारी कर्‍हे जाता पाहिली ॥१॥
आघाडी चमकली बुधवार पेठला ।
जाती होळकराच्या भेटीला ॥
धाव चाल धुमाळी रीघ नाहीं वाटला ।
थवे गरदी थाट दाटला ॥
सडी स्वारि चमकली ठरुन कला वादीला ।
चकविले घोडेस्वाराला ॥
रोहिचित्त सांवरे पळ सुटला हरणाला ।
शिकारखाना सोडला ॥
आसी खेळत खेळत स्वारी कर्‍हेवर आली ।
स्वारि करे जातां पाहिली ।
सुखी श्री जेजुरी साधन साधती मोजी घटका पळ ।
दुधी स्नान होती आंघोळ ।
जसे सूर्याचे तेज कर्‍हे जप शुद्ध भागिरथी केवळ ।
एकवीस स्वर्गावर कर्‍हेचे मूळ शुद्ध सतरावीचे जळ,
दिले पिवळे डेरे असंख्यात देवळ ऋषि मंडळ रम्य स्थळ
चौफेर दुकान नदर पेट रोखली पहा तहान भूक हारपली बरे सुखी यात्रा ॥२॥
रंभाईच्या महालीं देवाची बैठक । सभा बस इंद्रादिक ।
सख्या नावी ऐना घेऊन । उभा सन्मुख करी सूर्यबिंब लखलख ।
अंगी चंदन मैलागिरी सुवास सुरेख ।
कस्तुरी भाळी टिळक घाली पाट रांगोळ्या ताट ।
जडले माणिक आंत चांदीच्या वाटया चक्क
ऋद्धिसिद्धि वाढिती खीर साखर स्वयंपाक ऋषि जेवती आंबोलीक ।
आंचुनी पानाची पट्टी रमाईनें दिली । सुखी यात्रा स्वारी कर्‍हे जाता पाहिली ।
कुच केले कर्‍हेचे चपळ चाल स्वारीची पुढे बैठक
घालवडीची घेती ल्हेज कलावे हारजित घोडेस्वाराची रानोमाळ
दवड फौजेची रवि अस्तमान काळोखी रात्र आवसाची पाहा ।
दिवटया हावई दारुची, पुढें चंद्रज्योत महीताप प्रभा फाकली ।
स्वारी रस्त्यानें चालली अशी मिरवत मिरवत
स्वारी किल्ल्यावर आली सभा बारव्हारी बैसली
गुरु मुकुंद गिर बोलले गोडी लागलि स्वारी वापुनी गारिली बरे सुखी ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद २३
अश्विन महिना प्रातःकाळीं नहाती कर्‍हेच्या तिरीं, फुले पुष्पातें ओटया भरी,
भरुनि कर्‍हेचे पाणी कळस चंबू चांदिचा शिरी,
दाट कांसडया सोनेरी मिळुनी सर्वांचा थाट,
चालला वाट धरोनी हारोहारी, एका मागें एक सुंदरी,
सतरावीचा घाट चढता वाट जाती पठारी,
उंच मेरुच्या शिखरी, घालूनि कर्‍हेचे स्नान देवाला बाणु
म्हळसा सुंदरी, उभे भैरव जोगेश्वरी, आश्विन महिना यात्रा भरति
आनंद होतो जाग्रणी चला जेजुरी साजणीला
रात्रन् दिवस माझ्या नयनी बसतो दिसतो
माझ्या मनी चल जेजुरीला साजणी ॥१॥
पहिल्या प्रहरी निघतो छबिना उजवे मानेवरी वाघा गरजतो
दरबारी गर गर गर गर गिरक्या मारितो
नानापरि ढोल सनया नाद किलकारी मधे मुरळ्यांचा थाट
भोंवताली दिव दिवटया हारोहारी एका चढीत एक सुंदरी
उंच पैठणीचा शालू नेसाया काठ पदराला जरी खुप श्रृंगार बनला
परी तीन प्रहर मग जागरण झाले चौथ्या प्रहरी तोंड धुन चल जेंजुरीला साजणी ॥२॥
विजय दशमीला स्वारी शिलांगण हुकुम प्रधान प्रति कुंचाजीले
डंके वाजती मानकर्‍याचा थाट बरोबर गोपाळ आरती पालखीत म्हाळसापती ।
गिरीकंदराच्या चार रस्त्याकडून स्वारी पहाडाहून केवढी मौज दिसती बाणामागे बाण सोडिती ।
एका बाणाचा घा उभयता आंत त्याने भेटती होती आवाज पहाड गरजती होती
आपटयाची पूजा ब्रह्मदेव सांगती नारदमुनी चला जेजुरीला साजणी ॥३॥
थेट रमण्यामध्ये स्वारी चमकती उत्तरे समोर जे जे
वाडी मूळ पाठार उजवी घेऊनी मारुति वेशीमध्ये येशवंत मल्हार बाजूला
भाक होळकर चंदी चंदवडजे राजे अक्कलकोट, भरतपूर, जाकपूर,
शाहु राजे सातारकर, शुष्क रंगाचे हत्ती सजविले,
हौद अंबारीवर लखलख कळस झालर नदर पेटमध्यें
स्वारी थोपली खुली रात्र चांदणी चला जेजुरी साजणी ॥४॥
झोकनोक स्वारी चाक लावा उजवी घेऊनी मारुती रस्त्यानें
स्वारि मिरविती दो रस्त्यावर सावकार मंडळी दीप दिवटया घेऊन हाती ।
भर ओंजळ भंडार उधळती । अपार पेटल्या दिवटया हारोहारी दीपमाळ जळती स्वारी चढतां,
मौज दिसती आली किल्ल्यामध्यें स्वारी चौघडे गंगनाम गर्जती नानापरी वाद्ये वाजति मुकिदेगिर
प्रसन्न बापुचे चित्त त्याच्या चरणी कडे पठारआमचे धनी रात्रन दिवस माझ्या नयनी,
दिसतो बसतो माझ्या मनीं चल जेजुरीला ॥५॥
 
खंडोबाचीं पदें - पद २४
नित्य देव मल्हारी ग ॥ मस्तकी शोभतो तुरा, बेंबीमधें हिरा ॥
नवरा रंग दीसे सीरा शंभाचे अवतार, ठान तयाचें मैराळ ॥
काय सांगु देवाची मात, आलीस भरांत बसुनी दिनरात,
खेळती चवसर, तिसरे ठाणें नलदुर्ग खरं, देवपाल पेंबरी आले,
लग्न लागले, वाद्या वाजले, मनी खुश जहाले, शंभाचे अवतार,
केवळ कैलास जेजुरी ॥१॥चाल॥१॥
हा त्रिलोकयाचा धनी, नांदतो गुणी, भाव धर मणी,
पावला मल्हारी केवळ कैलास जेजुरी ॥२॥
जर ह्या वारु वरती स्वार गं. आदी शक्ति अवतार,
स्वरुप शकुमार, माहाळसा नार, घेतली घोडयावर,
कवटाल्या देव मल्हारी, ज्यानें मेघ बोलाविले वरह वर बिलें,
आंगणी नाहाले, माणिक मोती कंकर, वाण्यानी भरले घर,
ज्यानें आनंद केला फार, चालला भार, कडे पठार,
देवाची आली स्वारि केवळ कैलास जेजुरी ॥
हा त्रिलोकयाचा धनी, नांदतो गुणी, भाव धर मणीं,
पावला मल्हारी केवळ कैलास जेजुरी ॥३॥
कुरुम कासवाच्यावर, वाहा मुरळी नाचती फार,
मिळुनी हारु हार, दिवटयांचा भार, लावती भंडार,
वाघापुधें तोडी लंगर जनभक्त येती, नवस करिती,
बगाड घेती मोठे मोठे सरदार, चंपा शेष्टीचा गजर,
काय लवाण आले, तेल लागलें, नवरे झाले,
हाती शोभतों खंजीर, मानकरी थाट बरोबर,
ढोल करणीं, सनया वाजती कीं, सोले होती बापु गुण गाती,
लोळती चरनावरी, केवळ कैलास जेजुरी,
हा त्रिलोकयाचा धनी ॥ अहो कडेपठार, लिंग अवतार,
जनभक्तासाठीं देव जगजेठी बैसले निराकार, प्रकट केला आकार,
दोही बाहुस दोघी नारी मधीं मल्हारी अस्ट आधिकारी बैसले चातुर मोर चेला उडती
वर पाठीशी भैरवनाथ, बसून दिल रात, काय सांगू मात,
बाळ ही जोगेश्वरी, केवळ कैलास जेजुरी, हा त्रिलोकयाचा धनी,
नांदतो गुणी, भाव धर मणी, पावला मल्हारी, केवळ कैलास जेजुरी ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद २६
अरे देवा त्वा मसी बोलावें गोड ॥ तुला बाणुचें भरलें वेड ॥मल्लारी॥
मौजा केल्या रे बहु प्रीतीन ॥ कुथें नाही पडलें ऊणं रे ॥मल्लारी॥
एकाएकीं झालास रे बैमान फार मन केलें कठीण रे ॥मल्लारी॥
कसें रे लाविलें बाणुने वेड सोडले गड जेजुरी ॥मल्लारी॥अरे देवा० ॥१॥
बानु बोले रे देवा मल्लारी ॥ कां आलास रे माझ्या घरीं ॥मल्लारी ॥
गरजेसाठी मेंढरें चारी ॥ धाऊनि धाऊनि वडा झाडी ॥ मल्लारी ॥
ताकघाटयाचे फुरके मारी ॥ दोन्ही हातांनी मिशा वरी रे ॥ मल्लारी ॥
कसें रे लाविले बानुने वेड ॥ ही आपल्या मध्ये जोड रे ॥मल्लारी॥अरे देवा० ॥२॥
 
खंडोबाचीं पदें - पद २७
बोला बोला हो तुम्ही बोला वाचे येळकोट तुम्ही बोला भंडार वाहूं मल्लारीला,
बाणूम्हाळसा नारीला, श्रावणमासी, भक्त येती, करेचें पाणी स्नानासी घेती ॥
उठा उठा व जलदी करा, खंडेरायाचें नाम स्मरा, अक्षी मनामध्ये भाव धरा
आदितवार दिवस आला ॥ कडे पठारी तुम्ही चला ॥
चुकेल चौर्‍याऐशींचा फेरा ॥ बोला हो बोला० ॥१॥
सोन्याची जेजुरी, तिथें नांदे मल्लारी,
तो आमुचा कैवारी, गळा घालूं भंडारी,
नवलक्ष पायरी दीपमाला हारोहारी तूं आमुचा कैवारी,
गळा घालून भंडारी, उभा होय सामोरी ॥
सभा शोभे महाद्वारी ॥ बोला बोला० ॥२॥
 
खंडोबाचीं पदें - पद २८
मूळ सांबीं पाहा दाखला भोळा शंकर,
दैत्यासाठी खंडेरायांनी धरला अवतार,
दैत्य मर्दून ठार केले धन्य तूं मल्लार आसक्तीने असुर पेऊन
तूं लिंगकार काढून अंगाची ज्योत भस्म केले
भंडाराची पाहा रोकडी प्रतीती मल्लारी देवाची ॥१॥
धनी मैराळ हा घातविला तुझ्याच नामाची पाहा रोकडी
प्रतीती ऐका मल्लारी देवाची ॥
ह्याचा बंधु भैरवनाथ हातांत त्रिशूळ करी डौराचावाजा नाथ
उठला आंबर, गळ्यांत शैलीसिंगी जोगी आहे
शिरजोर जोगीश्वरी शेषाची कन्या हिचाच भ्रतार,
घेऊनि विषाचा पेला काळुकी बैसली झैर्‍यांची, पाहा रोकडी प्रतीती० ॥२॥
एक लाख ऐंशीं हजार चारपटया गबर,
इतक्यांमधी दावल मलिंग पावा
सरदार भल्या भल्याला देतो झोळे करितो बेजार,
हातामध्ये घेऊन झोळी गदा घरोघरी
रामरहीम ऐकून काळ राक्षा, पाहा रोकडी प्रतीती० ॥३॥
आदीशक्ती अंबिकाभवानी तुळजापुरात,
हिचे झपाटे पाहा नाइटे अवघ्या मुलखांत
नवरात करिती गोंधळ घालिती पाहा त्या दसर्‍यांत
तवा देवीचा करडा अंमल अवघ्या मुलुखांत
हातामध्ये माळ परडी कैक जोगव्याची, पहा रोकडी प्रतीती० ॥३॥
हरीहरा तूं महादेवा ईश्वर पार्वती भोळा शंकर
स्वयंभू ज्योत लागून गेली आपण निरहंकार
पंढरीनाथ द्वारकानाथ नाही तुला आकार,
जोत लागून गेली आपण निराकार कर जोडूनि ग्यानु
महिपती लोळे चरणांसी ॥ पहा रोकडी प्रतीती० ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद २९
बाणु म्हाळसाच्या छंदा लागला कसा,
देव झाला कीं वेडा पिसा बाई देव झाला कीं वेडा पिसा ।
बाणु देव गेले कीं चंदन पुरी, वाहवा गे बाणु वाहवा
करुं लागला चाकरी, शेळ्या मेंढयाचा बनला खिल्लारी,
देख देवराया पडतो पाया आलो गाया,
देव झाला कीं वेडा पिसा ॥१॥
बाणु नार दिसे अनिवार, वाहवा गे बाणु वाहवा,
स्वरुप दिसे चंद्राची कोर, वेडा झाला देव मल्हार,
देख देवराया पडतो पाया, आलो गाया
देव झाला कीं वेडा पिसा ॥२॥
देव झाले कीं घोडयावर स्वार, अगे वाहवा गे वाहवा बाणु वाहवा
संगे घेऊन बाणु सुंदर, आणुनि ठेविली अर्ध्या गडावर चोरुन भंडार पडती तिजवर
देख देवराया पडतो पाया, आलो गाया,
देव झाला कीं वेडा पिसा ॥३॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३०
बाणुनि करुनिया ग थाट, शिरी ग दुधाचे भरुन माठ जी ।
जात होति बाजाराच्या वाट, पडली देवाची गांठ जी ।
पद धरिलास बळकट, बाणु म्हणे सोड माझी वाटं जी ।
धनगर आहेत आरबट, तुशी ते करतील खटपट । चाल ।
बाणु झिडकारी महाराज, बाणु झिडकारी मल्लारी ।
सोड पद्र जाऊं दे घरी जी ॥१॥
ऐकुन बाणुचे उत्तर, बोलले देव मल्हार
भारुन टाकूं भंडार, उचलून घेऊं वारुवर जी ।
तवा ती बाणु सुंदर, कापु लागली थरथर जी ।
सख्या सांगते येऊन घरीं,
सोड पद्र जाऊं दे घरी जी ॥२॥

खंडोबाचीं पदें - पद ३१
सण दिपवाळीचा आला, देवानें प्रधान बोलाविला
ज्यानें वारु तयार केला, वारुवरति ग स्वार झाला
निघून गेले चंदनपूराला सण दिपवाळीचा आला
देवानें प्रधान बोलाविला ॥१॥
ज्यानें सभेंत मुजरा केला, साडीचोळी आणली बाणुला
सण दिपावाळीचा आला, देवानें प्रधान बोलाविला ॥२॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३२
आलम देख झूल रही, भंडारकी लूट भई ॥चाल॥
मेहेरबान मलुखान, लुटाये पाहाड सोनेकी खाण ।
आलम देख झूल रही, भंडारकी लूट भई ॥१॥
रात्रन्‌दिन पर गुजरी, वाघा मुरळोके लिई हाजरी ।
आलम देख झूल रही, भंडारकी लूट भई ॥२॥
बडे तु शालु शाल, दिनकु दरबारमे लगे मशाल ।
आलम देख झूल रही, भंडारकी लूट भई ॥३॥
कवी मुकींद गीर शाई, बापु बोलले मेरे भाई ।
आलम देख झूल रही, भंडारकी लूट भई ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३३
रागकुरध बोलली म्हाळसाबाई, तुमची चोरी
मलुराया केली काई ।जी।
म्हाळसा बोले नेवास माझं माहेर, तमसेर पीता
राव पीता माझे सावकार जी ।
आपल्या उमतीचा सोयिरा न बरोबर, नऊ लख तांगड
आणुन केला गजर जी ।
मांडिले लग्न बसविले भवल्यावर, पाची ब्राह्मण
बोलाविले परमेश्वर जी
मला परतूनी आणिले जेजूरा ठाया, नऊ खंडात मालुची
फिरती धोई जी ।
॥मिळवणी॥रागकुरध बोलली म्हाळसाबाई ॥१॥
आदले जलमीची काय होती तुझी वादीण मजवर सवत
बाणुला आला घेऊन जी ।
दुःख सवतीचे महा दारुण, सगळी भाकर अर्धाल्या
केल्या दोन जी ।
तापल पाणी ह्याला चव येईना परतून, भोळ्या देवा
तूला कसा घ्यावा वाढून जी ।
सवत लोण्याची दृष्टी नसावी, हीचेकडे पाहाता शरीराची
होती लाही जी ।
॥मिळवणी॥राग कुरध बोलली ॥२॥
एक्या हाडाला दोन सुर्‍या कश्या करवत, कुठवर शिकवू
कांहीं उमज धरा मनात ।जी।
दोहीचा झगडा जाईल जनलोकांत, खाली बसाल बसाल
माती उकरीत जी ।
हेगडी बोले बोले रे देवा कांहीं, लिंब घोटावा बाणुच्या पायीं
जी ॥ मिळवणी ॥ रागकुरध बोलली ॥३॥
चारी समया जळती पलंगा शेजारी, तुमच्या स्वपनी
देखली बानु धनगरणी ।जी।
उठून बैसले देव मल्हारी, बाणुला आणुन ठेवली तळ
भोयेरी ।जी।
चैत्री पौर्णिमेचा हा गजर होतो भारी चोरुन भंडार लोटतो
बानुवरी ।जी।
मल्लवाघा चरणावर लोट मारी, पाहिले चरण गळ्यांत
लींग भंडार जी ।
राग कुरध बोलली ॥४॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३४
पाहिला धनी म्हाळसाकांत जेजुरीं, नवलक्ष पायर्‍या गडकळस सोनेरी ॥
मातला मल्ल कर जोडी पादुका शिरी, मनी होय मणि हर्षला भडक शेंदरी ॥
ध्वजा निशाण फडके थडकत किल्ल्यावरी ॥
हय कूर्म वृषभ गण येळकोट शृंगारी ॥
चौफळ राजा पाजळे खडगधारी ॥१॥
मधु दुग्ध दधि स्वाराज्या पचर नाही ॥
अभिषिक्त तृप्तगण देवदेव नैवेद्यीं ॥
शिवपंचलिंग पाठीशी पृथक शिकर भांडार घरी ॥
होतसे डासवी तिकर भवपाप खोबरे करी ॥
खोबरेचूर भंडार भरील भंडार काळ करी दूर ॥
घृत मारी दीपमाळा बहु बरी वदी घृत दीप वरती ॥
काला ग प्रती घरी मल्लारी नाम उच्चारी ॥
वैखरी कुळधर्म कर्म आधार सौख्य करी ॥२॥
नवलक्ष हत्ती दरबारींत कानडा मल्लारी पेवरांत हत्ती आहे
दरबारांत कानडा जरतारी, देवान पोषाख केला दरबारी ॥
फुलाच्या आस्मान गिरी देवाचे आसन घातले शेषावरी,
कानडाची मल्लारी ॥ असता.
डावी म्हाळसा हो सुंदरी उजवी बाणू धनगिरीण उजव्या बाजून ॥
थोर प्रताप खंडेरायाचा नव दिवस नवचंडीचा आनंद होतो
पाल लिंगाचा हत्ती आहे दरबारी शनिवार दिवस मोठा गजर ॥धृ॥
धुपारती बहार रवीवार दिवस सोमवार दिवस तर दिवस मिळाल्या चौफेर ॥
नित देवाचे वर्‍हाड खंडेराज मैराळ प्रभो म्हाळसापती ।
त्रिजगत्या करुणाकर देव भूपति ॥ सुमनाचे बाशिंग शिरीं ॥
परशु शूळ खडग करी ॥ वामांगी वसे कुमारी आदी शक्ती मूर्ति ॥
विश्वंभर जाश्वनीळ भक्तप्रीति ॥ दानशीळ लिंगरत्‍नराव फाकतसे कांती ॥
खंड दैदीप्यमान दैत्य मणीक लंबमान रुंडमाळ विराजमान शोभतसे ॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३५
देव धनी मल्लारी, म्हाळसाकांत धनी भूपाळ,
देव धनी मार्तंड कानडा देव धनी मैराळ ॥
तेतीस कोटी देव वर्‍हाडी गाठ मारुनी शेल्याला ॥
वधुवरांसह आपआपल्या येती पेंबरी लग्नाला ॥देव०॥
लेवती भूषणें कनकाभरणें नवरदेव महीपती ल्याला ॥
उधळुनीया भंडार खोबरें यळकोटी मुखी गाजविला ॥देव०॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३६
ढोल वाजतो तर्‍हेदार ॥ वाघे देती हुंकार ॥ढोल० ॥
मुरळ्या नाचती होती तुर देवाची समोर ॥मुरळ्या॥
गजर झाला अवघ्या भक्ताचा, मानवरायाची न्हाणी
होत माशाची घोडे दोहो बाजूस, देवाची न्हाणी॥
चितो काढली हो माजेची ॥ गाय मुख देवाचे चित्ते ॥
तेथें सकळीक हो तीर्था घेता हत्ती ॥
आहे दरबारांत शिव बाणा चालिले रुमाल चवर्‍या उडवीत
आबदागिर्‍या साहित्य चालले ॥
 
खंडोबाचीं पदें - पद ३७
चला जाउ कडेपठारी गः गः चला जाऊ कडेपठारी ।
गडे जेजुरी पाहूं मल्हारी । बेल दवणा रोडे भंडार वहा देवाच्या शिरी जीः
बाणु म्हाळसा दोघे वारीग ।ग। भैरव जोगेश्वरी प्रधान कारभारी ।
नंदी कासव त्या समोरी दिपमाळ । चारी जीः नवलक्ष गडा पायरी ।
गगनी विशाल किल्ल्यावरी । कळस सोनेरी ।
हमेशी जडे चौघडा जडे बार द्वारीः मणी दैत्यपती न्हाणिला भडक शेंदुरी ॥जी॥
भंडार भरील भंडार काव्हवर कर जीः देव भक्तांचा कैवारी देवः गः शंकर कवन करी
येळ कोट जेजुरी बोला भक्तांनो हर्षें अंतरीं जी ।
चला जाऊं कडेपठारीं देवाला चंदनपुरासी जानः संगे घेतला प्रधान ।
उन्हाळा कडकडीतः प्रधानानें धरली छत्री केली छायाः
आरे मालू केली छायाः लाविले काम करायाः
अरे मालू । बानुबाई जातीची धनगरीणि ।
तिचे नऊ लक्ष कोकरी : पाणी न पीयाः आरे मालू पाणी न पियाः
लाविले काम करायाः आले । बाणुनी तुम्हा देवराया ।
लाविले वाडा झाडाया । आरे मालूः बाणासी राग आला मोठाः
लेंडयालोकरीचा कुटाः चाटु देऊनि केला गरगटाः बाणु बोलली घाटा खायाः
आरेः लाविले काम कराया । आरे मालु । म्हाळसा देवा मल्हारीः
नदर कराती दूरवरी । गडाला नऊ लक्ष पायरी ।
भिकाजी वाघा ऊभा दरबारीः मती दे गाया । लाविले काम कराया
 
खंडोबाचीं पदें - पद ३८
शंकर पार्वती अवतार ज्याचा । धनी मैराळ नांवाचा ।
कानडया कौंस आहे जातीचा । जावई धनगराचाः याच्या घरीं म्हाळसा सुंदरीः
नादे धनी मैराळ भीमाभागीर्तीः भीमाभागिर्तीली गायनगरी ।
देवळा तैताळीः देवळाभौंवताली बबळीस खोड ।
चीचा लागले दाट । साकर लिंबे लागले अचाट
देवळावर घुमट तीममधून दिसती गड जेजुरीः नांदे धनी.
चारी दीप माळः चारी दीप माळ राव हारोहारोः
दरवाज्याच्या बाहेईः पांचवी दीपमाळ कडेपठारींः
भडके देऊळ च्यारीः भंडार उधळतो देवावरीः नांदे धनी.
बगाड फिरत राव तुम्ही ऐकाः पहिला मान पावुतकर ।
लीमगांव कर्‍हेचे राव पद ऐकाः सवाई वाजत डंका ॥
भामा लोळतो चरणावरी । नांदे धनी.
 
खंडोबाचीं पदें - पद ३९
देवरायाच्या घरीं गडे बानु म्हाळसा भांडतीः
काय बाई सांगूं नवल एकमेकी झीपर्‍या हातीं :
हाटकला प्रधान म्हाळसा देवापासी सांगती
हिचे माझें नाहीं पटायच हीला ठेवा सवती ः
हिला नाही मुरवत मुरवत भांडतीः काय सांगूं देवराया ।
राजामधीं संसार केला । भीकाच्या ऊतपतीः
तीन चवला तुझा संसार ठेवा किती दावितीः
लाख रुपयांची माझी हवेलीः जनदुनया सांगती ।
चौऊ बहुताली ऐने लाऊन आंत समया जळती ।
या देवाच्या घरी गडे बाणु म्हाळसा भांडती.
 
खंडोबाचीं पदें - पद ४०
वृक्ष कुळीवरती पक्षी रावे गजबजती ।
कागाचा कलकलाट दारी चिमण्या चिवचिवती ।
बक ते तळ्यापाशी कोकिळ आंबेबनी रहातीः
तास पिंगळे उंच वृक्षावर मोर ठाव करती ।
कुंभ घेऊनिया देवांगना पाण्याला जाती ।
कागापुर जेजुरी शुद्ध सतरावी कर्‍हा वाही ।
चाल । सुगंधी उटणे बानु म्हाळसा लाविती ग जी ।
घंगाळा उष्ण देव चौरंगा हाती ग जी ।
पिवळें पितांबर कस्तुरी टीळा लेती ग जी ।
उभी फुलाई माळीण गळा हार घाली ती ग जी ।
रंभाई सिंपीण शेल्याला दोरा भरती ग जी ।
एक महालाम्ध्यें मुरळी गुण आवडीने गाती गजी ।
मिळवणी । आलंकार पिवळे आंगावर शालजोडी पिवळी ।
दिले चंदनाचे पाट बसाया घालिती रांगोळी जी ।
उठ लवकरी मलुराया म्हाळसा बोले प्रातःकाळीः
उठ नेत्री लाविते तुम्हाला सण आज दीपवाळी जी ॥१॥
छंद मंडप झालरी फुलाचे फुलाचे पडदे मंदेरी
ठाईं ठाईं उदबत्या झाले सुगंधिक झारी ।
घ्या दिवसा जळे मशाल पडला प्रकाश महाद्वारी ।
सडे सुगंदीक आंगणेवर रांगुळ्या पाट ।
हारोहार समई जळती ऋषीपंगतीचा थाट ।
बाणु म्हाळसा लाविती । हाती सोन्याचें ताट ।
मिळवणी । अमृतफळ नारंगी गोड द्राक्षें आरे केळी ।
पुढें तबकामध्यें ठेविती महालामध्यें मुरळी ।
ऊठ लवकरी । चाल । सुगंधीक मुखीं विडे रत्‍नलालाची प्रभा दिसती ।
भरगच्ची पोशाख अंगामधीं ना माव गणदस्ती ।
चुन्या करुन पोशाक पुढें तबकांत आणुन ठेविती ।
जोमदार करी हार हरोहर हुकूमामरहाती ।
करुन सर्व शृंगार म्हाळसा पदद्यांतून पाहाती ।
डुबदागिने बाणाई शृंगार लेती । लखलखत बीजल्याचे तारे तुटती ।चाल।
लाग जर चरणी नाद डिंडिम हे उठती ।
ऐकून नाद वरवार वेधु मती । मिळवणी ।
जरी पदराचा झोक शेलारी निरगुची पिवळी ।
केळ कर्दळीचा गाभा म्हाळसा फुलाची पाकळी ः
उठ लवकरी । त्रिगुण सभा घनदाट बैसली देव तेतीस कोटी ।
आले नारद तुंबर सभेमंदी सांगती गोष्टी ।
वाघे मुरळ्या गजर हजर पुढें वाजती घाटी ।
अनुहत गगनांत गरजती या भेटीची दाटी ।
मुखीं दगीर प्रसन्न गोड नाम बापुच्या कंठी ।
हरि भाऊची जोडी रीण । नभत्तन्नर गाटी ।
चाल । पूर्वीचें सुकुरितः फळ आले शेवटी ।
मलुनाम अक्षर वर लिहिलें लल्लाटीं ।
माझे सहस्त्र अपराध । देवा घाला ते पोटी ।
मिळवणी । करा कृपेची छाया बा गा द्या मला चरणजवळी ।
हेंच मागणे तुम्हा मागतो नाम त्रिकाळी । उठ लवकरी.
 

खंडोबाचीं पदें - पद ४१
आठ दिवसा आईतवारी जी मागल तुमची वारी जी ॥
तुझ्या भंडार्‍याचा भडीमार मल्ली तुझ्या दरबारी ॥
वाजल्या शंख बहीरी जी ॥
काठया कावडयाचा भार नगारे निशाण लावीत जोड ॥
मल्हारी नाम तुझें गोड जी ॥
धरीन आपल्या हृदयीं करीन स्मरण लावीन जोड ॥
मल्हारी नाम तुझें बहु गोड । पूजा होती या देवाची जी ॥
जाई मोगर्‍याच्या कळया हार वाहीला देवासी ।
तयारी सोमवतीची मूर्ति काढल्या बाहेरी पालखी दिसे मोत्याची जोड ।
मल्हारी नाम तुझे बहु गोड ॥
स्वारी निघाली देवाची जी ॥
या कर्‍हेबाईच्या तिरी गरदी राव झाली भंडाराची ।
होती आंघोळ देधाची । पंच अमृताची गरदी ।
लंगर तुटती ताडताड । मल्हारी नाम तुझें बहु गोड जी ।
स्वारी आली जेजुरीला जी । रस्त्याने धनी मिरवत सखा मल्हारी ।
चालला सदरेला देव बसला जी ॥
मानकरी उजव्या बाजूला ।
रोज मारा ज्याचा त्याला । भवानी दासाचा छेला जी ।
छंद त्यानी देवाचा केला जी ।
माग तो सर्व तुजला तुझ्या रे पायाची केली जोड । मल्हारी नाम तुझें बहु गोड.
 
खंडोबाचीं पदें - पद ४२
सांबाचे जसें कैलासगिरीवर शिखर जी ।
जडाचे सिंहासन सोनेरी मखर जी ।
वर चतुर्भुज महाराज पद्मधारी चक्र जी ।
शीव तोडी कानी कुंडल शोभती मखर ।
जसा सूर्य मूर्य कांतीचा ।
गाभा झळकती तेज जी ।
दैत्यास्तव औतार मारली पैज जी ।
कडेपठारचे महाराज कानडे राज जी ।
आचानागउदीम नागधीम नीत चौघडे वाज जी ।
पाहाडाचे पायी आकृती जैसे शिवपिंड जी ।
चौकुनी तुटले कडे घडे आथंड जी ।
कर्‍हा नीरा वाहे दोही थडया गंगेची लोंड जी ।
असे नीत कर्‍हेचे स्नान करी मार्तंड जी ।
आंगीं भंडार्‍याचें भूषण टिळक शीरी साजे जी ।
शनवारी आमची पूजा फुलांची शेज जी ।
कडेपठारचे । पितांबर कसली कास शिरी मुकुट जी ।
आंगामदी लाया पीवळे बर्‍हानपुरी सीट जी ।
लालीलाल अंगावर शाल रुईफुल काठ जी ।
हातामदीं खंडा डौल पठाण थाट जी ।
आदी मावा म्हाळसा गंगा नाव साजे जी ।
बाजुला प्रधान हे गडी सवाई शिर ताजे जी ।
कडेपठारचे । शनिवारीं सायंकाळीं सभा घनदाट जी ।
देवलोकीं पिवळा वाना वाजती घांट जी ।
सोन्याची गड जेजुरी जगीं बोभाट जी ।
नवमीला भंडार तोल तो नीट जी ।
वर गिरीवर झेंडा भडकती ध्वज ।
आछा नागधीम नागधीम नीत चौघडे वाज जी ।
नऊ दिवसाचा नऊ माळासन औवधारी जी ।
दाव्या दिवसीं शिलंगण आलें निघाली स्वारी जी ।
वरसाचिक भाविक भक्त मिळाले पठारी जी ।
अपार पेटल्या दिवटया रात्र आंधारी जी ।
या गड जेजुरीची स्वारी आली सामोरी जी ।
या दोहींच्या भेटी रमणीय महाद्वारीं जी ।
दणदणा सुटती तोफा मिळाली फौज पुढें चंद्रजोत महीताप बाणाची मौज जी ।
कडेपठारचे । त्रीकुरघटपर आसन संगम त्रिवेणी जी ।
हा टपर गोलाट गुंफा भिकोनी जी ।
रोईरा कपाकमोच्या कजला हारी धुनी जी ।
कुई बीरल पछाना आलक चुरश निरवानी जी ।
कडेपठारचे महाराज उनकी बाजी जी ।
बापुने कनाया पदलंपट हारी चरणी जी ।
श्रीभगवान गिरीचा मठ शंखधुनी वाजे जी ।
मल्हारी वाघासी सात याला साजे जी । कडेपठारचे ।
 
खंडोबाचीं पदें - पद ४३
सेज केली महाली जी । लाविल्या समया सात आरे हो वाट पाहेली सार्‍या रात्रीं जी ।
देवा माझी त्रासली नेत्र । आरे हो ।
कोठे गेली होती स्वारी जी ॥ चाल ॥
कोणाच्या मंदिरीं जी । खरें सांगा मल्हारी जी ।
मला कळले आंतरी जी । लुब्ध तुम्ही जाला बाणुला आरे हो ।
म्हाळसा म्हणे देवाला । कां मशीं धरला अबोला रे
आरे हो म्हाळसा म्हणे देवाला । कोणा यातीची बाणाई जी ।
आपला लक्ष तिच्या ठाईं अरे हो । मशीं बोलत कां नाही जी ।
घातली तिनें तुम्हा द्धाहीर आरे हो । धनगरीन आरबट जी ।
आंगाची घाण घुरंट जी । चल देवा घरी उठ जी ।
धरी देवाचें मनगट जी । घेऊन गेली महालाला रे अरे हो ।
म्हाळसा म्हणे देवाला जी कां मशीं धरला अबोला जी ।
लिंगाईत म्हणवितासी । आवघा भ्रष्टाकार करतां अरे हो ।
शिवधर्म बुडविता जी । डोळे असतां आडात पडतां रे अहो ।
असे काय मल्हारीजी । सोन्याचा सुरी जी ।
मारुनि घेवा उरी जी । जिवाची यादगिरी जी ।
सांगतां जीव माझा दमला रे आरे हो ।
म्हाळसा म्हणे देवाला । कां मजशी धरला अबोला ।
सगु म्हणे देवा जी । सदोदित घडो तुमची सेवा अरे हो जी ।
असे आषईवर देवा जी । लक्ष चरणापासी ठेवा रे अरे हो मल्हासुर मर्दिला जी ।
त्रिभुवनी आनंद झाला जी । देव पावतो भक्ताला जी ।
खंडु वाघ्या गुरगुरला जी । धासत पडली काळा रे आरे हो ।
म्हाळसा म्हणे । कां मशीं धरला अबोला ।
 
खंडोबाचीं पदें - पद ४४
बणु बसली डुई घालून जी । भांग भरला भंडारानी शिनगारला नाहीरुन ।
बालुबाल मोती खेळून जी । वेणीला गुंफूनशानी मुदराखडी ग लाऊन ।
वेणीला गोंडे तीन जी । चाल ।
वेणी बिंदली माथ्यावरुन जी । बाणु स्त्रीरुप संगीन जी ।
हैती ऐना घेउनी जी । मुख न्हाळी कामीन जी ।
करकर करबीडे चावले तांबुळ रंगले लाल ।
देव बाणुवर खुश्याल जी । सीता राहिली उभी सारंग पाजळल्या दीपमाळ ।
देव बाणूवर खुश्याल जी । पातळ जरी ढवळे जी ।
कपाळी ल्याली कुंकु केश कुरळे । लावण्यरुप पिवळे जी ।
सैतावर जडली मिठी वट कवळे । गळ्यामंदी नवरसहार जी ।
मल्हारी हिचा भरतार जी । झाला वारुवर तीर तार जी ।
आगडधिम चौघडे वाजती पुढेंच पिवळी ढाल ।
देव बाणूवर खुश्याल जी । शीता राहिली ।
बाणुने करुनि शिनगार जी । लखलखलख दिवटया जळती ।
होतो जयजयकार । फक्तासि आनंद फार जी ।
मलु सायबाचे लडीबाळ जी थरथरा कापती काळ जीं
बोले भिका खंडुबाळ भड भड भड भड निशाण भड लाल
देव बाणुवर खुश्‍शाल जी
 
खंडोबाचीं पदें - पद ४५
मोठा देव कोटवळ्या मल्लारी काठी कांबळा घेऊन करी गेला
चंदनपूर नागरी बानुच्या महाला ग बाई महाला होते धनगर पारा.
वर रामराम केला जी ग जी ॥१॥
धनगर उठले तेव्हा लौकरी हात धरुन देव मल्लारी गेले
घेऊन पारावरी पुसती त्याला ग बाई त्याला ॥
सांगा नांव गांव ठिकाणा अन्‌ कोठून आला जी ग जी ॥२॥
आम्ही गडे राहतो पाल तें बरीन सोडून आलों गड ॥
जेजुरीचा खंडु गावडे ग म्हणती तरी दे ग आम्हाला ।
देव बाणाईच्या घरीं चाकरी ठेविला जी ग जी ॥३॥
मग बाणाईच्या घरीं नित्य कामाचा अधिकारी ॥
नवलाख मेंढरें चारी खिलारी झाला ग बाई झाला ।
शेळ्या मेंढयाचे कोकरु पाजुं लागला जी ग जी ॥४॥
ताक घाटांत लोकरी वाडी बाणाई सुंदरी आवडी ते भोजन करी ।
देव बइसले बईसले कसे प्रधानाने मल्लुराज बरोबर नेले जी ग जी ॥५॥
काळी गाठी बागला न कठीन मी सांगते तुम्हाला नको जाऊ ॥
ह्या वाटेनी म्हाळसा बोले ग बाई बोले कसे प्रधानाने मल्लुराज बरोबर नेले जी ग जी ॥
 
खंडोबाचीं पदें - पद ४६
नागपूजाया जातो म्हाळसा नगर नारींचा थाट
बरोबर नगर नारींचा थाट जी
देवांगना गजघाट हातामंदी तबकें सोन्याचे ताट जी
अलंकार पिवळे अंगावर शालू पीतांबर पिवळे
आंत डोईस मुदराखडी सेस फुलें चंद्रकोर मोर आवळा
जी साचवगी साजणे मिळाल्या ग आणिक वारा सोळा
जी जसी रे म्हाळसा देवांगनामदी जोत चमकली चपला जी
जसा आकाशीं चद्र चांदण्या ग नक्षत्राचा मेळा
मिळाल्या ग नक्षत्र मेळा चौघीचे चौघडे पांचवी ग मुज्रावीण एक बाळा
जी एकच गरदी झाली मिळे ना ग वर जाण्या वाट
जी देवांगना गजघाट हातामंदी तबकें सोन्याचें ताट जी
नागपूजाया चाल. दोर धरुन गुण गाती नाचती करकर लवती आंकडा
नाचती नाचवती कोंबडा घालिती पिंगा पकवा झगडा जी
शिरींचा पल्लव टाकून खांद्यावर भुजाबावटे उघडे
खांद्यावर कुणी इकडून तिकडे उभयता भार घालिती झगडा जी
चक्रावाणी गरगर फिरती एक हाताच्या फुगडया खेळती
चंद्रहार लखलखती गळ्यामधी करंडफुल कानीं बुगडया जी
पायीं पैंजण तोरडें हातामधीं कंकण पाटल्या गोट जीदेवांगना गजघाट हातामधीं कंकण पाटल्या गोट नागपूजाया
 
खंडोबाचीं पदें - पद ४७
सण दसर्‍याचे दिवशीं शिलांगण खेळावया निघाले मलुराज मोकाशी
जी झेंडें आडीशी पिवळे गे नानापरीचे वाद्य वाजती
किती बरव तयासी ग (चाल) शोभती हत्तीवरती अंबारी
कोतवाल घोडे थरथर करी वाजती झांज तुतारी
आघाडी चोपदार ललकारी. भंडाराची गरदी भारी
मोरचेल उडती देवावरी. मिळवणी.
कडेपठारचें राजे आले आशी
कोंश्याच्या राहती टप्यावर लखलखाट दिवट्या साजे
घणघण घंटा वाजें गे मानकर्‍याचा थाट बरोबर पालखींत मलुराजे जी०॥
स्वारी कर्‍हेला जाती गे० आली किल्ल्यांतून स्वारी
बाहेर केवढी मौज पाहा दिसती जी
चवरी मोरचेल ढळती गे सडे स्वारीचा थाट
समुद्र भरती जी० ॥ (चाल) स्वारी काय उतरली शहरांत
आघाडी गेली बुधवारांत मिळाली अठरा प्रगट जात
गरदी भंडाराची मात क्रिया भाक हातावर हात
मिळवणी पहिला मान त्याचा देती जी० ॥
सवाई मल्हारराव अहल्याबाई तयाची भक्ती जी० ॥
नागड धिम नागडधीम जशी काय चपळा सुटती गें ० ॥
आली शहरांतून बाहेंर स्वारी दुसरा मान कडी तुटती जी० ॥
कडक धुमाळी सुटती० गे० गर्गकलावे घेत चालली शेतकर्‍याचे लुटले जी० ॥
(चाल) देव काय खेळती शिकार हो ती सावदोचें बार०
दौडती बैल घोडे सरदार होती बंदुकीचे बार
चमकती तलवारीचे वार मिळवणी ।
कैक तयामधें पडती जी फौजा दाणोंदाणु चौकडे रानुरानु
दवडती जी नागड धिमा ॥३॥
मिळाले रुषीचें भाट कर्‍हाबाई भरली दोई काठ
उसळती जशी समुद्र लाट प्रेमाचि टाळी वाजती दाट ।
गरजती वाघे पुढें गोंगाट ॥ (मिळवणी) स्वर्गलोकीं देव करिती जयजयकार ।
भंडारा पुष्पें वरषती जी० ॥ नागडधिमा ॥४॥
परत निघाली स्वारी जी० ॥ दिनकर चौथेप्रहरी गे.
रवि अस्तमान झाला मशाल दिवटया रात्र आंधारी जी० ॥
(चाल) । गरदी आदितवारामधी दाट स्वारी चढती
किल्ल्याचा घाट दुहेरी दिपमाळ लखलखाट
कचेरी किल्ल्यामध्यें घनदाट होती हाजेरी
वाजती घाट पुकारती भालदार चोपदार वाणी भाट
मिळवणी बत्तीस भंडार लुटती गे
मुकुंदगिर प्रसन्न० बापुचा मलबा सवाई गुण गाती जी० ॥
नागडधिम नागडधिम झडती गे०
मानकर्‍याचा थट बरोबर० पालखींत सवाई मलुराज ॥जी॥०
 
खंडोबाचीं पदें - पद ४८
कडेपठारचे महाराज सवाई मलुखान = देव गेले शिकारी स्वारी वनाकारण = जी =
झाली अश्वावरती स्वार बाजू प्रधान संगे मानकर्‍याचा थाट वीर बळीवान = जी =
आघाडी येशवंतराव भडक निशाण - रणबाजे वाजे चौघडा राव शिकारखान = जी =
(चाल) देव खेळतो शिकार = ग = सा = गिरिकंदर भयासुर = सा =
धुंडती नद्या सरोवर = सा = झाले तृषागत मल्हार = सा =
नऊलक्ष मेंढया धनगर = सा =
एक चंनापुर नगर = सा =
ध्रु. = पाणी मागतां बाहेर आली बाणाई =
बाणु पाहता सुदबुद हारली सुचेना कांही = जी =
बोले म्हळसा सुंदरी ऐकर भाई =
देव गेले शिकारी अजून येत का नाहीं = जी = १ =
झाला प्रधानासी हुकूम परत रवाना तेदर कुच मजली आले जेजुरी भवना = जी=
रुप पालटले देव नटले धनगर बाना =
हाती काठी कांबळा चरणीं वाहाणा = जी =
थरथरा कांपती मान पायीं चालवेना =
हातपाई वाकडा आसाच केविलवाणा जी =
(चाल) गेले धनगराच्या घरी = सा =
नऊलक्ष बैसले पहारी गावडे लोक कारभारी = सा =
बोले रामराम मल्हारी सा आम्हा ठेवावें चाकरी
सा मी राहीन पोटावरी सा ।मिळवणी।
ठेविले बाणु घरी करवीली सोईआणि त्यांनी वळाव्या मेंढया ताककण्या खाई धृ०
बोले म्हाळसा २ बाणू बोले ऐक सेवक बाणू बोलत
न्हेवुन मेंढ्या धुवा पंचगंगेंत जी
कुणी एक खिलारी नको आमच्या संगत
तुम्ही घेऊन भाकरी यावे दोन प्रहरांत जी
नऊ लक्ष केले हवाली मेंढयाची गणीत
मानुन बाणूचे शब्द देव अज्ञात जी
नऊ लक्ष मेंढया न्हेवून बुडविली काळ्या डोहांत
दहापांच धरीन गडीला आपटी खडकांत जी ।
चाल । लालीलाल गंगातीर रक्तपूर वाहाती सा
जशी कमळिणीचीं फुलें शीरावर तरती सा
गंगेने सोडले तास लाट ऊसळती सा
घडाघडा वाहती कडे आसुद कोसळती सा
चरमाचे पडले ढीग पर्वत दिसती सा । मिळवणी ।
देवाने केलें गारुड ऐका गुण ग्राही
नऊलक्ष मारली मेंढी जिवंत एक नाही जी घृ०
बोले म्हाळसा० ३ बाणूने करुनि सैपाक भरली पाटी
हाती अमृताचे घट तुपाची वाटी जी
आली चंनापूर सोडून गंगेच्या काठीं
आसुदाचे वाहती पुर पाहेना दृष्टीजी
ढगांतील चांदणी गगनीं सांगतील गोष्टी
ही निरंकारामदी जोतरत्‍न गोमती जी ।
स्वरुपाचे तुटती तारे पाहेना दृष्टी ।
जैसे पुनवेचे चांदणें प्रभा लल्लाटीं ।जी।
(चाल) बाणूनें मांडिला शोक रणी घैवती ।जी।
सावळे संतापून देती शिव्या हात आपटीती ।सा।
बाणू गडबडा लोळती केस तोडीती ।सा।
नऊ लक्ष मारिल्या मेंढया कपाळ बडवीती ।सा।
वृक्षावरुन पक्षी येऊन तिला समजवती ।सा। (मिळवणी)
बाणू रडता कशासाठीं झालें तुम्हा कांही ।
मला भूक लागलि थोर वाड लवलाही जी ।धृ०।बोले म्हाळसा० ॥४॥
आधीं उठवाल माझ्या मेंढया तेवां वाढील जे लागल ते जेवा इच्छा भोजन । जी।
असे उत्तर बाणूचे शब्द देव ऐकून ।
मूठ भरली भंडाराची नी दिली झोकून ।जी।
येती थव्यावरती थवे दिसती दुरुन ।
जशा मेघाच्या गडे धारा आल्या चोहोंकडून ।जी।
(चाल) अनुहात वाजवी घोळ देव गारुडी । सा।
येती थव्यावरती थवे मेंढ्याच्या झुंडी । सा।
गंगेवर पीती पाणी पडल्या मुरकुंडी ।सा।
लाल हीरवी पिवळी कबरी बांडी ।सा।
पाहून मनामधें दंग झाली बाणाई ।
गेली वैकुंठाला खबर खळली लवलाही । बोले म्हाळसा०॥५॥
बाणूने वाढिल्या कण्याताक परळांत ।
त्याची केली खीर पात्र करुनि अद्‌भूत ।जी।
खीर साखरेची वगवाही अमृत ।
साक्षात छत्रभुज जेवती मूर्त ।जी।
त्यावेळीं उतला वास आकाशमात ।
तेव्हां कडकडले आकाशमात गगन गडगडत ॥
वर कलाबतुचा जीन तुरंग नाचत ।
माथ्यावर कलकी सूर्यपान लवलवत जी ।
(चाल) देवानी केला डौलवान पठाणी । सा ।
बाणूने वळखला देव लागली चरणी । सा।
धन्य धन्य देवा अगाध तुमची करणी ।सा।
मजसाठी झाडिला वाडा वाहिलें पाणी ।सा।
मजसाठी झाला श्रमी हिंडतां वनीं ।सा।
झाले वारुवरती स्वार देवबाणाई ।
घरीं धनगराला कळली खबर लवलाही ।जी। बोले म्हाळसा ॥६॥
बाणू नेली शिपायांनी आयकली मात ।
तवां गजबजले धनगर मिळाले समस्त ।जी।
यानी परतल्या गोफण्या काठया हातांत ।
भीरभीरा मारती धोंडे जे गवसत ।जी।
देवानी झोंकली म्हवणी पाडली भ्रांत ।
एकमेकां मारिती आणून आपल्यांत ।जी।
(चाल) बाप ओळखना लेकाला काठया मारीत । सा।
भाऊ ओळखिना भावाला मान मोडीत ।
सा कुणी गडबडया लोळीतो आरोळ्या देत । सा।
कुणी बोबडा बोलतो चाचर्‍या जात ।सा।
पुरी करावी शिक्षा आता कृपा करावी ।या।
वनच्या पाखराला जात असावी ।जी।बोले म्हाळसा० ॥७॥
सावध केले धनगर जवळ बोलविले ।
साक्षात छत्रभुज रुप दाखविले ।जी।
मुखी देव आम्हाला बाणू रत्‍न सांपडले .
यामुळें देवाजी तुमचें दर्शन घडले ।जी।
अनंत जन्मीचे दोष पातक हरलें ।
गंगेसी मिळाले व्होळ गंगाजळ जहालें ।
(चाल) सारे चन्नापूर लोटले नगरनरनारी । सा।
नटथाट करुनि शिनगार आरत्या करीं ।सा।
हाती कणेराची फुलें एका झारी ।सा।
भजतात देव पुजतात भाव अंतरीं ।सा।
घाली देवाजीच्या गळां माळ बाणाई ।
स्वर्गींचा वाजला घंटा असल कोण ठाईं । बोले म्हाळसा० ॥८॥
संगत घेऊनी धनगर देव निघाला ।
दरकुच मजली मुक्काम भुलेश्वरी केला ।जी।
देवानें पत्र लिहिलें प्रधानाला ।
लाकुटयांत होती पत्र चिटी म्हाळसाला ।जी।
आणीक वरदी द्यावी बाल किल्ल्याला ।
आणिक वरदी द्यावी सकळ सैन्याला ।जी।
(चाल) धांवचालत जासुद आले ग जेजुरी ।सा।
प्रधान बसला होता भरुन कचेरी ।सा।
जासुद बोलती जोहार उभे दरबारी सा ।
प्रधान वाचितो पत्र घेऊन करी ।सा।
हालकरी फिरे सेनेंत जदल कारभारी
सुत भुलेश्वरा उपर स्वारी देख आई जी बोले म्हाळसा० ॥९॥
मोरेश्वरापासून दिव्याचा घाट जशी समुद्राला आली भरती
फौजेचा लोट जी दोहीतर्फे जोडिले कुंजर आटोकाट
ह्या भुलेश्वरापासून जेजुरी थेट जी
सुमर येती प्रधान चारी कडीकोट मुंगीसी होईना मिळेना वाट जी
(चाल) रथांत बैसले देव प्रधान सारथी सा
वर छत्री नि अबदागिरी चवर्‍या ढळती सा
चौघडे वाजती गती नव्वद झाई झाई
कर्‍हेवर ती आली स्वारी निशाण ओळखावी जी बोले म्हाळसा० ॥१०॥
आली पाऊतकावर स्वारी बाणू संगती
ऋषीमंडळ बोलती वेदसंकल्प देती जी
दुधीस्नान करुनिया गंगा थैयथैयती
चारी वरसत जळ उपर गिरत ऐय मोती.
स्वारीची करवलि कुचडंके वाजती
रथामागे धावती रथ कलाव घेती जी
तोफखाना करवला सुरु हुकूम सरबत्ती ॥
शहरांत पोंचली स्वार भारी मिरवती जी
म्हाळसा चढुनिया सज्जा किल्ल्यातून पाहाती
बाणूचीहि हिरवी गाडी रथामागें येती जी
नगरच्या नारि आरत्या ओवाळती
दोहीतर्फे सावकारमंडळी खुर्मुशा देती ॥जी॥
मनशाचे जुंपले वारु स्वारी वर चढती ॥
रंगमहाल प्रधानाच्या बैठका होती जी
(चाल) आणली बाणू ठेविली गुप्त मंदिरीं सा
रंगमहाल प्रधानाचा माडी शेजारीं सा
देव बैसले सद्रेवर भरुन कचेरी सा
ओंवाळूं म्हाळसा देव हरुष अंतरींसा
सभा तेहतीस कोटी इंद्राच्या ठाई
आले सुरनर नारद तुंबरु किन्नर गाईजी बोले म्हाळसा० ॥११॥
म्हाळसाने घेतला छंद गोष्ट ऐकावी
कशी आणली देवागना बाणूदा बाई जी
येवढी पंचायत तुला कशाला व्हावी
बाणू जातीची धनगरीण हिला काय पाहावी जी
सकळी मिळाल्या दवांगना त्या ठाईं
सर्वांची इच्छा बाणू दृष्टीने पाहावी जी
(चाल) केला प्रधानासी हुकूम बाणू बोलाविली सा
कर जोडोनिया बाणाऊची पुढें ठाकली सा
जसी पुनवेचि चंद्रप्रभा फांकली सा
म्हाळसानं पाहून बाणू कट्यार लागली सा
गुरु मुकुंदराव प्रसन्न बाणू गुण गाई यलबानी घडला घाट लक्ष सवाई
ह्या हरीभाऊची जो परीक्षा घ्यावी बापूने बसवला रंग सभा दंग व्हावी म्हाळसा ॥१२॥
 
खंडोबाचीं पदें - पद ४९
सिनगार बाणूचा - पांच रंगाचा पांच रंगाचा -
दाही भिंगाचा पहिला रंग बाणूचा झळाळी -
साडी नेसली - काळी - साडी चोळी वर बाजुबंद -
दांत काळे - निबंदकाळे काजळ लेलीहो नयनी -
काळे केसाची वेणी - काळी पोत गळ्यामधी बानूचा शिनगार ॥१॥
दुसरा रंग बाणूचा सफेत सफेत शालुची -
बुत सफेत - पायीं विरुध्या जोडवी -
सफेत हाताच्या मुदी सफेत - हार गळ्यामध्ये मोत्याचा - शिनगार ॥२॥
तिसरा र्म्ग बाणूचा बरवा - शालू नेसली हिरवा -
मुखीं घेतला विडा - हिरवें गोदण गोंदण कपाळीं -
दापाची जाळी हिरवी - आंगठीवर पाचुचा खडा - शिनगार ॥३॥
चवथा रंग बाणूचा - सोनकळा नेसली पीतांबर पिवळा पिवळा चितंगत्रपट्ट मोहनमाळा -
पिवळा चितंग गळ्यामधे सोन्याचा - शिनगार ॥४॥
पांचवा रंग बाणूचा - कोणहवा - लाल पीतांबर लाल -
मुकूट बराची - कोण वालाल कुंकवाचे लेणे लालीलाल -
बाई आय्या लाल - विष्णुस्वाल गुण घ्यायाचा - शिनगार ॥५॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Akshaya Tritiya 2024 Daan या 14 पैकी कोणत्याही एक वस्तूचे दान करा