Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या ते कोणते 7 काम होते जे रावण करू इच्छित होता पण करू शकला नाही

जाणून घ्या ते कोणते 7 काम होते जे रावण करू इच्छित होता पण करू शकला नाही
, गुरूवार, 7 मार्च 2019 (08:38 IST)
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला विजयादशमीचा सण साजरा करण्यात येतो. हा सण अधर्मावर  धर्माच्या विजयस्वरूप साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार याच तिथीला श्रीरामाने रावणाचा वध केला होता. रावणाला, रामाची सत्ता मिटवायची होती पण त्यात तो यशस्वी झाला नाही कारण त्या गोष्टी प्रकृतीच्या विरुद्ध होत्या. त्याने अधर्म वाढला असता आणि राक्षस प्रवृत्ती अनियंत्रित होऊन गेली असती. हे आहे ते 7 कामं जे रावणाला करायचे होते, पण करू नाही शकला -
 
1- संसाराहून देवपूजा संपवायची होती   
रावणाची इच्छा होती की जगातून देवपूजेची परंपरा समाप्त व्हायला पाहिजे ज्याने संपूर्ण जग फक्त त्याचीच पूजा करेल.   
 
2- स्वर्गापर्यंत पायरा बनवायच्या होत्या  
देवाच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी रावणाला स्वर्गापर्यंत पायर्‍या बनवायच्या होत्या ज्याने जे लोक मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्यासाठी देवाची पूजा करतात, ते पूजा बंद करून फक्त रावणालाच देव मानतील.  
 
3- सोन्यात सुवर्णात सुगंध मिसळणे टाकणे 
रावणाची इच्छा होती की  सुवर्ण (स्वर्ण)मध्ये सुगंध असायला पाहिजे. रावणाला जगभरातील सोन्यावर कब्जा करायचा होता. सोने शोधण्यात कुठलेही त्रास नको म्हणून त्यात सुगंध टाकायचे होते.  
 
4- काळ्या रंगाला गोरे करणे  
रावण स्वत: फार काळा होता, म्हणून त्याची इच्छा होती मानव जातीत जेवढ्या लोकांचा रंग काळा आहे त्यांनी गोरे होऊन जायला पाहिजे, ज्याने एकही महिला त्यांचा अपमान करू शकणार नाही.  
 
5- दारूपासून दुर्गंध दूर करणे  
रावणाला दारूमधून दुर्गंध दूर करायचे होते. ज्याने जगातील लोक जगात दारूचे सेवन करून अधर्माला वाढवण्यास मदत करतील.    
 
6- रक्ताचा रंग पांढरा व्हायला पाहिजे  
रावणाची इच्छा होती की मनुष्याच्या रक्ताचे रंग लालहून पांढरे व्हायला पाहिजे. जेव्हा रावण विश्वविजयी यात्रेवर निघाला होता तेव्हा त्याने फार युद्ध केले. बर्‍याच लोकांचे रक्त पाण्यासारखे वाहू घातले. सर्व नद्या आणि तलाव लाल झाले होते. प्रकृतीचे संतुलन बिघडू लागले होते आणि सर्व देवता यासाठी रावणाला दोषी समजू लागले होते.  तेव्हा त्याने विचार केला की रक्ताचा रंग लालहून पांढरा झाला तर कोणालाही कळणार नाही की त्याने किती रक्त वाहू घातले आहे ते पाण्यात मिसळून पाण्यासारखे होऊन जाईल.  
 
7- समुद्राच्या पाण्याला गोड करणे 
रावणाला साती समुद्राच्या पाण्याला गोड करायचे होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपली रास आणि होळीचे रंग, जीवन करतील रंगीन