Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगळवारी मारुती स्त्रोत पाठ करा, संकट नाहीसे होतील

maruti stotra
, मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (07:38 IST)
Maruti stotra मंगळवारी हनुमानाची पूजा करुन मारुती स्त्रोत पाठ केल्याने सर्व संकट नाहीसे होतात. या‍ दिवशी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन लाभ घ्यावा. हनुमानासमोर तेलाचा दिवा लावावा. मंदिर जाणे शक्य नसल्यास घरी हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसून स्त्रोत पाठ करावं. या दरम्यान कोणाशाही बोलू नये. नंतर आरती करावी व नैवेद्य दाखवावा.
 
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥
महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें । कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥
ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती । नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी । सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू । चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे । मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं । मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे । ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥
तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे । तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली । दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू । रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥
 
॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥१॥
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या