गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021 रोजी मौनी अमावस्या आहे. हिन्दू मान्यतेनुसार या दिवशी पवित्र संगममध्ये देवतांचा निवास असतो म्हणून या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र तीर्थस्थळी स्नान केल्याचे विशेष महत्व असल्याचे सांगितले गेले आहे. मौनी अमावस्येचा दिवस खूप पवित्र असतो. या दिवशी मौन व्रत धारण केल्याचे अधिक महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. पौष महिन्यात येणार्या या अमावस्येला मौनी अमावस्या, पौष अमावस्या किंवा दर्श अमावस्या देखील म्हणतात.
प्राचीन ग्रंथात नारायण प्रभूची प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणून या दिवशी पुण्य स्नान असल्याचे मानले जाते. विशेष करुन मौनी अमावस्येला गंगा स्नानाचे विशेष महत्त्व आहे. अमावस्येला कुंभ किंवा नदी, तलावाच्या काठी जाऊन स्नान करणे शक्य नसल्यास घरातील पाण्यात गंगा जल मिसळून अंघोळ केल्याने देखील अनंत फलाची प्राप्ती होते.
मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे-
* शास्त्राप्रमाणे पौष महिन्यात पवित्र नदीत स्नान, पूजा- अर्चना केल्याने भगवान नारायण प्राप्ती संभव आहे. या दिवसांमध्ये नदी स्नान केल्याने स्वर्ग प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.
* मौनी अमावस्येच्या दिवशी मौन राहून स्नान-दान केल्याचे विशेष महत्व आहे.
* पौष महिन्यात पवित्र नदीत स्नान केल्याने एका विशेष प्रकाराची ऊर्जा प्राप्त होते.
* या दिवशी सूर्य नारायणाला अर्घ्य देण्याने गरीबी व दारिद्रय दूर होतं.
* अमावस्येला दिवसातून 108 वेळा तुळशी परिक्रमा करावी.
* याव्यतिरिक्त मंत्र जाप, सिद्धि साधना व दान दिल्याने तसेच मौन व्रत धारण केल्याने पुण्य प्राप्ती होते व देवाचा आशीर्वाद मिळतो.
* ज्यांचा चंद्र कमजोर आहे त्यांनी गायीला दही- भात खाऊ घालावा, याने मानसिक शांती मिळते.
* जी लोकं घरी स्नान करुन अनुष्ठान करु इच्छित असतील त्यांनी पाण्यात जरासं गंगा जल मिसळून तीर्थाचे आह्वान करत अंघोळ केली पाहिजे.
* मौनी अमावस्येच्या दिवशी जप-तप, ध्यान-पूजन केल्याने विशेष धर्म-लाभ प्राप्ती होते.