Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मौनी अमावस्या, हा एक उपाय करा आणि कुटुंबातील लोकांची प्रगती बघा

मौनी अमावस्या, हा एक उपाय करा आणि कुटुंबातील लोकांची प्रगती बघा
आज मौनी अमावस्या आहे. आणि या दिवशी मौन राहण्याचे अत्यंत महत्त्व आहे. हे व्रत करणार्‍यांनी मौन धरून व्रत नियमांचे पालन करावे. तसेच अमावस्या असल्यामुळे या दिवशी काही उपाय, प्रयोग, टोटके देखील केले जातात. ज्याने जीवनात येत असलेल्या समस्या सुटतात. वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळे उपाय घेऊन आज आम्ही येथे आलो आहोत तर चला जाणून घ्या मौनी अमावास्येला कोणत्या समस्यांसाठी काय उपाय करणे योग्य ठरेल.
 
सूर्याला अर्घ्य : अमावस्या असो वा इतर कोणताही दिवस सूर्याला अर्घ्य दिल्याने दारिद्रय दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं. 
 
तुपाचा दिवा : मौनी अमावास्येला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्या. याने जीवनात सात्त्विकता येते आणि सर्व प्रकाराच्या संकट आपोआप दूर होतात.
 
गायीला दही- भात : जन्मकुंडलीत चंद्रमा कमजोर असल्यास अमावास्येला गायीला दही-भात खाऊ घालावा. याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्र संबंधित दोष नाहीसे होतात.
 
चांदीचे नाग-नागीण : मौनी अमावास्येला चांदीचे नाग-नागिणीची पूजा करावी आणि पांढर्‍या फुलांसह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. याने सर्प दोषापासून मुक्ती मिळते.
 
दक्षिणमुखी शंख : अमावास्येला जरासे तांदूळ केशरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा दक्षिण मुखी शंखात घालावे. तुपाच दिवा लावून कमलगट्टा माळेने महालक्ष्मी मंत्र अर्थातच ओम श्रीं मंत्राच्या 11 माळ जपाव्या. याने घरात भरभरून धन येईल.
 
मुंग्या, मासोळी किंवा पक्ष्यांना आहार : मौनी अमावास्येला मुंग्यांना साखर मिसळलेली कणीक खाऊ घालावी. मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या आणि पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवावं. असे केल्याने घरात पैशांची कमी जाणवतं नाही.
 
महामृत्युंजय मंत्र : मौनी अमावास्येला 1008 महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवाचे पंचामृताने अभिषेक करावे. याने सुख-सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर होतात. अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होता म्हणजे विवाहाचे योग प्रबळ होतात.
 
अपंग आणि अशक्त लोकांना भोजन : या अमावास्येला राहू, केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात. यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी, अपंग, अशक्त आणि गरिबांना वस्त्र, भोजन भेट करावे. याने दूषित ग्रहांची शांती होते.
 
तरपण, पिंडदान : आपल्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृ दोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडिताकडून पितरांनिमित्त तरपण, पिंडदान करवावं. दोष शांत होतं.
 
दिव्यात केशर : मौनी अमावास्येला संध्याकाळी घरातील ईशान कोपर्‍यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्यात कापसाच्या वात लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा. शक्य असल्यास दिव्यात जरासं केशर मिसळावं. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आगमन वाढतं.
 
सोमवती अमावस्या चा शुभ संयोग - या वेळी अमावस्या सोमवारी असल्यामुळे शुभ संयोग आहे. या दिवशी महादेवाला अभिषेक केल्याने विवाहाचे योग प्रबळ होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का ?