Publish Date: Sun, 26 Apr 2026 (08:29 IST)
Updated Date: Sat, 25 Apr 2026 (13:32 IST)
मोहिनी एकादशीच्या पवित्र दिनी,
भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या आयुष्यातील
सर्व दुःख दूर होऊन सुख-समृद्धी नांदो
मोहिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
ओम नमो भगवते वासुदेवाय!
मोहिनी एकादशीनिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा
श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो
मनातील सर्व वाईट विचारांचा नाश व्हावा
आणि जीवनात भक्तीचा सुगंध दरवळावा
हीच मोहिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ईश्वरचरणी प्रार्थना
विष्णूंचा मोहिनी अवतार
आपल्या जीवनातील मोह-माया दूर करून
आपल्याला सत्याच्या मार्गावर नेवो
मोहिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या
मोहिनी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
विठ्ठल नामाचा गजर आणि मनोभावे भक्ती,
मोहिनी एकादशीच्या दिवशी मिळो तुम्हास सुख-शांती आणि प्रगती
शुभ एकादशी!
ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे रक्षण केले,
त्याचप्रमाणे ते आपल्या आयुष्याचेही रक्षण करोत
मोहिनी एकादशीच्या शुभेच्छा!
शांतता, समाधान आणि भरभराट...
मोहिनी एकादशीच्या निमित्ताने
भगवान विष्णू आपल्या झोळीत सर्व काही देवोत
शुभेच्छा!
या पवित्र दिवशी श्रीहरींची आराधना करा
आणि जीवनातील सर्व संकटांतून मुक्त व्हा
तुम्हास मोहिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुखी विठ्ठल, हृदयी विठ्ठल...
मोहिनी एकादशीच्या या मंगल दिनी पांडुरंग आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत
About Writer
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते.....
आणखी वाचा