Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक पौर्णिमा : नदी स्नान आणि दीपदान करण्याचे 4 फायदे

कार्तिक पौर्णिमा : नदी स्नान आणि दीपदान करण्याचे 4 फायदे
, शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (09:00 IST)
कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी सण साजरा केला जातो. या दिवशी नदीत स्नान करणे तसेच दीपदान करण्याचे विशेष महत्तव आहे. तर जाणून घ्या स्नाननंतर 
 
दीपदान करण्याचे 4 फायदे- 
स्नानाचे महत्व ( Kartik Purnima Snan ) : देव उठनी एकादशीला देव जागृत होतात आणि कार्तिक पोर्णिमेला ते यमुना तटावर स्नान करुन दिवाळी साजरी करतात. कार्तिकच्या पूर्ण महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आणि विशेष महत्तव आहे. या महिन्यात श्री हरी पाण्यात निवास करतात. मदनपारिजात प्रमाणे कार्तिक महिन्यात इंद्रियांवर संयम ठेवून चंद्र-तारे यांच्या सान्निध्यात पुण्यप्राप्तीसाठी सूर्योदयापूर्वी नियमित स्नान करावे. विशेषत: पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे खूप चांगले मानले जाते. जेथे भक्त यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी येतात, ते गडगंगा, हरिद्वार, कुरुक्षेत्र, पुष्कर इत्यादी तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करण्यासाठी जातात. स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे.
 
दीपदान ( Kartik Purnima Deepdan ) : मान्यतेनुसार देव दीपावलीच्या दिवशी सर्व देवता गंगा नदीच्या घाटावर दिवा लावून आपला आनंद व्यक्त करतात. म्हणूनच दिव्याचं खूप महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ प्राप्त होते.
 
1. संकटापासून मुक्ती : नदी, तलाव इतर ठिकाणी दीपदान केल्याने सर्व प्रकाराचे संकट नाहीसे होतात आणि अकाली मृत्यू टळते. यम, शनी, राहु आणि केतु यांच्या वाईट प्रभावाने जातक भयमुक्त राहतात. सर्व प्रकाराचे अडथळे, वाईट शक्ती, गृहकलह आणि संकटांपासून वाचण्यासाठी दीपदान केलं जातं.
 
2. कर्जापासून मुक्ती : दीपदान केल्याने जातक कर्जापासून देखील मुक्त होतो.
 
3. पुनर्जन्माचा त्रास नाहीसा होतो : कार्तिकीला सायंकाळी त्रिपुरोत्सव केरत - 'कीटाः पतंगा मशकाश्च वृक्षे जले स्थले ये विचरन्ति जीवाः, दृष्ट्वा प्रदीपं नहि जन्मभागिनस्ते मुक्तरूपा हि भवति तत्र' याने दीपदान केल्याने पुनर्जन्माचा त्रास होत नाही. आपल्या कुटुंबांच्या मृतांच्या उद्धारासाठी देखील दीपदान केलं जातं.
 
4. मनोकामना होते पूर्ण : या दिवशी गंगेच्या घाटावर स्नान करुन दीप लावल्याने तसेच देवांना प्रार्थना केल्याने मनोकामाना पूर्ण होतात. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दीप दान केलं जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एक काम करा, पितृदोष आणि कर्जापासून मुक्ती मिळेल