Publish Date: Sun, 30 Aug 2020 (10:16 IST)
Updated Date: Sat, 29 Aug 2020 (23:24 IST)
जय देव जय देव जय विठाबाई । पक्वान्नादीसिद्धी अर्पी तुज ठायी ।।धृ.।।
षड्रसपक्वान्नें ही अर्पित तुज माई । कृपा करुनी ती तूं मान्य करुनि घेई ।
तुप्ती सर्व जीवां जेवितां तू आई । जीवन सर्वांचे हें असे तव पायी ।।1।।
आनंदे भोजन करावें आता । यथेच्छ जेवूनी उच्छिष्ट उरतां ।
प्रसाद तो देई आपुल्या भक्ता । हेंचि मागें ठेवूनि तव चरणी माथा ।। जय... ।।2।।