निर्गुण निराकार निर्विचार अवस्था केव्हा प्राप्त होते ? जेव्हा तनाने,मनाने एकचित्त होवून गुरुचरणी लीन होवून स्मरण केल्यानंतर आलेली प्रचिती !
त्याकरिता आपलाची वाद आपणासि व्ह्यायला हवा. मनाची नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे सांसारिक मोठ्या वाटणार्या समस्या अगदी य:कश्चीत होवून त्याचा विसर पडतो. त्यासाठी चिंतन, मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे स्वतःचे असे छोटे - मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची !
म्हणूनच 'मनाचीये द्वारी उभा क्षणभरी' अनूभवून तर बघा !
आपणास सर्व दिवस आरोग्य सम्पन्न तथा मंगल जावो ! शुभम भवतू !