Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Narsingh Jayanti 2023 नृसिंह जयंती विशेष : या दिवशी काय करावे जाणून घ्या

narsingh jayanti
, बुधवार, 3 मे 2023 (10:35 IST)
वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. या दिवशी प्रभू श्री नृसिंह यांनी खांब चिरून भक्त प्रह्लादाची रक्षा करण्यासाठी अवतार घेतला होता. म्हणून हा दिवस त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.
 
या प्रकारे करा नृसिंह जयंती व्रत
 
1. या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठावे.
 
2. संपूर्ण घराची स्वच्छता करावी. 
 
3. नंतर गंगा जल किंवा गोमूत्र शिंपडावे आणि घर पवित्र करावे. 
 
4. तत्पश्चात निम्न मंत्र उच्चारण करावे :-
 
भगवान नृसिंह पूजन मंत्र -
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे।
उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जितः॥
 
5. या मंत्रासह दुपारी क्रमशः तीळ, गोमूत्र, मृत्तिका आणि आवळा मिसळून पृथक-पृथक चारवेळा स्नान करावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे.
 
6. पूजा स्थळी शेणाने सारवून कळश्यात तांबा व इतर वस्तू घाउून त्यात अष्टदल कमळ तयार करावे. 
 
7. अष्टदल कमळावर सिंह, भगवान नृसिंह आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. तत्पश्चात वेदमंत्रांनी प्राण-प्रतिष्ठा करुन षोडशोपचार पूजन करावे.
 
8. रात्री गायन, वादन, पुराण श्रवण किंवा हरि संकीर्तनने जागरण करावे. दुसर्‍या दिवशी पुन्हा पूजन करुन ब्राह्मणांना भोजन घालावे.
 
9. या दिवशी व्रत करावा.
 
10. सामर्थ्यनुसार भू, गौ, तीळ, स्वर्ण व वस्त्रादि दान करावे.
 
11. क्रोध, लोभ, मोह, झूठ, कुसंग आणि पापाचाराचा त्याग करावा.
 
12. या दिवशी व्रताने ब्रह्मचर्य पाळावे.
 
13. व्रत पाळणारा व्यक्ती सांसारिक दु:खापासून मुक्त होतो.
 
14. भगवान नरसिंह आपल्या भक्ताचे रक्षण करतात.
 
15. व्रतीला त्याच्या इच्छेनुसार धन-धान्य मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या