Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंघोळीच्या पाण्याचे हे प्राचीन उपाय केल्याने दूर होऊ शकते दरिद्रता

अंघोळीच्या पाण्याचे हे प्राचीन उपाय केल्याने दूर होऊ शकते दरिद्रता
, शुक्रवार, 15 मार्च 2019 (00:57 IST)
अंघोळ केल्याने आरोग्य लाभ आणि पवित्रता मिळते. सर्व प्रकारचे पूजा कर्म अंघोळीनंतर केले जातात, यामुळे अंघोळीला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. जुन्या काळात सर्व ऋषी मुनी नदीत अंघोळ करताना सूर्याला जल अर्पित करत होते आणि मंत्रांचा जप करायचे. या प्रकाराच्या उपायांनी अक्षय पुण्य प्राप्त होत आणि सर्व पाप नष्ट होऊन जातात.  
 
ज्योतिष्यात धन संबंधी त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बरेच उपाय सांगण्यात आले आहे, जे वेग वेगळे वेळेवर केले जातात. अंघोळ करताना एक उपाय सांगण्यात आला आहे. या उपायाला योग्य विधीने केले तर येणार्‍या काळात त्याचे सकारात्मक फल प्राप्त होऊ शकतात.  
 
जाणून घ्या उपाय विधी …
 
रोज अंघोळीआधी बाल्टीत पाणी भरा आणि त्यानंतर तर्जनी बोट (इंडेक्स फिंगर)ने पाण्यावर त्रिभुजाचे चिन्ह बनवा.  
 
त्रिभुज बनवल्यानंतर एक अक्षराचे बीज मंत्र ‘ह्रीं’ त्या चिन्हाच्या मधल्या जागेवर लिहा. तसेच आपल्या देवी देवतांना त्रास दूर करण्याची प्रार्थना करा.   
 
अंघोळ करताना करा मंत्रांचा जप  
 
शास्त्रात दिवसभराचे सर्व आवश्यक कामांसाठी वेग वेगळ्या कार्यांसाठी वेग वेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. अंघोळ करताना आम्हाला मंत्र जप करायला पाहिजे. अंघोळ करताना एखाद्या मंत्राचा पाठ केला जाऊ शकतो किंवा कीर्तन, भजन व देवाचा नाव घेऊ शकता. असे केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
 
अंघोळ करताना या मंत्राचा जप करणे श्रेष्ठ असत …
 
मंत्र: गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।
 
नदीत अंघोळ करताना पाण्यावर लिहा ॐ 
 
जर कोणी व्यक्ती एखाद्या नदीत स्नान करतो तर त्याला पाण्यावर ॐ लिहून पाण्यात लगेचच डुबकी मारायला पाहिजे. असे केल्याने नदी स्नानाचे पूर्ण पुण्य प्राप्त होत.  त्याशिवाय तुमच्या आजू बाजूची नकारात्मक ऊर्जा देखील संपुष्टात येते. हे उपाय केल्याने ग्रह दोष शांत होतात. जर तुमच्यावर एखादी वाईट दृष्टी असेल तर ती देखील उतरून जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय आहे होलाष्टक, का असतात हे दिवस अशुभ?