मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचे कारण ।
ठेविले अनंती तैसेचि राहावे ।
चित्ती असुद्या समाधान ।
लहानपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ।।
बोले तैसा चाले ।
त्याची वंदावी पाऊले ।
जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ।
सुख पाहता जवापाडे ।
दुःख पर्वताएवढे ।।
दया, क्षमा, शांती ।
तेथे देवाची वस्ती ।
शुध्द बीजापोटी ।
फळे रसाळ गोमटी ।।
साधु-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा ।
अज्ञानाच्या पोटी ।
अवघीच फजिती ।
धर्माच्या नावाखाली अधर्म चालु असतो.
खरा ज्ञानी लोकांना तारतो.
दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये. उलट पद्धतशीरपणे अवमान करावा.
प्रस्थापित पढिक विद्वान हे ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत.
सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा.
बहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये.
चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण.
जे जाणुनबुजून चुकत असतील त्यांची फजिती करा.
अनाथ अपंगाची सेवा करा.
माणसाने थोडातरी परोपकार करावा.
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही.
तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता. पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला.
घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके, खमंग, खमके |
ठेवावे भान | देश, काळ, पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी, वाणी, नाणी | नासू नये