ज्योतिष शास्त्रात शनीची चाल सर्वात धोक्याची मानली गेली आहे. शास्त्रांनुसार शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती करणे सर्वश्रेष्ठ आहे. कर्मफलदाता शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनी मंत्र सर्वात प्रभावी असल्याचे मानले गेले आहे. शनीच्या साडेसाती किंवा ढय्यावर शनी मंत्र रामबाण उपाय असल्याचे सांगितले गेले आहे.
शनिवारचा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस असतो. शनी दोषापासून मुक्तीसाठी शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. परंतू जी शक्ती शनी मंत्रात आहे तेवढी शक्ती कुठल्याही उपायात नाही.
शनि स्तोत्र
नमस्ते कोणसंस्थाय पिडगलाय नमोस्तुते। नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तु ते।।
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च। नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो।।
नमस्ते यंमदसंज्ञाय शनैश्वर नमोस्तुते। प्रसादं कुरू देवेश दीनस्य प्रणतस्य च।।
वैदिक शनि मंत्र
"ऊँ शन्नोदेवीर भिष्टयऽआपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तुनः"
पौराणिक शनि मंत्र
"ऊँ ह्रिं नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छाया मार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।
तांत्रिक शनि मंत्र
"ऊँ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः"
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी सूर्योदयापूर्वी उठून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. शनिवारी पिंपळाच्या झाडाला मोहरीचे तेल अर्पित केल्याने देखील शनि देव
प्रसन्न होतात. या व्यतिरिक्त शनिवारी संध्याकाळी या मंत्रांचे जप केल्याने शनीचा प्रकोप नाहीसा होतो. सोबतच शनीची महादशा नाहीशी होते.