Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

जीवनाची दिशा बदलून देतील सत्य साईबाबांचे 20 मौल्यवान विचार

सत्यसाईबाबा पुण्यदिन
सत्य साई बाबा सर्वधर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांचे विचार खूप प्रभावशाली होते. जाणून घ्या त्यांचे 20 मौल्यवान विचार:
 
* जर तुम्ही प्रभूमध्ये नेहमी पूर्ण विश्वास ठेवाल तर तुमच्यावर त्यांची कृपा अवश्य होईल. ईश्वराची कृपा असल्यास कर्माचे दुःख दूर होतात. प्रभू मनुष्याला कर्माने पूर्ण रूपाने वाचवू शकतात.
 
* कर्तव्य हेच देव आहे कर्मच पूजा आहे. किंचित कर्म देखील प्रभूंच्या चरणात टाकलेले फुलासमान आहे.
 
* सर्वांना प्रेम द्या. सर्वांची सेवा करा.
 
* मदत नेहमी करावी. दुःख कधी देऊ नये.
 
* देणे शिकावे, घेणे नव्हे. सेवा करणे शिका, राज्य करणे नव्हे.
 
* दिवसाची सुरुवात प्रेमाने करावी. प्रेमाने दिवस घालवावा. प्रेमाने दिवस भरून द्यावा. प्रेमाने दिवस संपवावा. हाच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे.
 
* या तीन गोष्टी नेहमी लक्षात असू द्या- जगावर विश्वास ठेवू नका. प्रभूला विसरू नका. मृत्यूला घाबरू नका.
 
* तुम्ही माझ्याकडे एक पाऊल टाका, मी तुमच्याकडे शंभर पाऊल टाकेन.
 
* सर्व कर्म विचारांमुळे उत्पन्न होतात. तर विचार ते आहेत ज्यांचा किंमत आहे.
 
* प्रभूसोबत जगणे शिक्षा आहे, प्रभूसाठी जगणे सेवा आहे. प्रभूमय जगणे बोध आहे.
 
* अहंकार घेण्यात आणि विसरण्यात जिंकतो. प्रेम देण्यात आणि क्षमा करण्यात जिंकतो.
 
* प्रेम रहित कर्तव्य निंदनीय आहे. प्रेम सहित कर्तव्य वांछनीय आहे. कर्तव्य रहित प्रेम दिव्य आहे.
 
* शिक्षा हृदयाला सौम्य बनवते. जर हृदय कठोर आहे तर शिक्षित होण्याचा हक्क मागितला जाऊ शकत नाही.
 
* विचार या रूपात प्रेम सत्य आहे. भावना या रूपात प्रेम अहिंसा आहे. कर्म रूपात प्रेम उचित आचरण आहे. समज या रूपात प्रेम शांती आहे.
 
* शिक्षेचा हेतू धनार्जन होऊ शकत नाही. चांगल्या मूल्यांचा विकास हाच एकमेव हेतू असू शकतो.
 
* वेळेपूर्वी आरंभ करा. हळू चाला. सुरक्षित पोहचा.
 
* अती उत्साह व्यर्थपणा देतं. व्यर्थपणा काळजी देते. म्हणून उत्तेजित होऊ नये.
 
* तुम्ही एक नाही तीन प्राणी आहात- एक जे तुम्ही विचार करता की तुम्ही आहात, दुसरा जे लोक विचार करतात आणि तिसरा जे तुम्ही यथार्थात आहात.
 
* धन येतं आणि जातं. नैतिकता येतं आणि वाढते.
 
* धनाची हानी झाल्यास कुठलीही हानी झालेली नाही. आरोग्याची हानी झाल्यास काही हानी होते. परंतू चरित्र हानी झाली तर सर्वकाही क्षीण झाले समजावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशा पद्धतीचा आहार देऊ शकतो गंभीर आजार किंवा मृत्यूला आमंत्रण