Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कणकेचे दिवे लावण्यामागील शास्त्रोक्त कारणे

diva
, शनिवार, 3 डिसेंबर 2022 (07:07 IST)
आपण देऊळात कणकेचे दिवे लावलेले बघितलेच असणार, पण आपल्याला हे माहीत नसतं की हे दिवे का लावतात? चला तर मग जाणून घ्या शास्त्राशी निगडित काही गोष्टी.
 
1 खरं तर कणकेचे दिवे एखाद्या मोठ्या इच्छापूर्तीसाठी लावतात.
2 नवस फेडण्यासाठी कणकेचे दिवे बनवतात.
3 इतर दिव्यांच्या अपेक्षा कणकेचे दिवे शुभ आणि पवित्र मानले गेले आहे. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपसूकच या दिव्यांना मिळतो.
4 देवी आई दुर्गा, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान श्री विष्णूंचे अवतार असलेले श्रीराम आणि श्री कृष्णाच्या देऊळात कणकेचे दिवे इच्छापूर्तीसाठी लावतात.
5 एखाद्या तांत्रिक क्रियेत कणकेचे दिवे लावतात.
6 कर्जापासून सुटका, लवकर लग्न, नोकरी, आजारपण, अपत्य प्राप्ती, स्वतःचे घर, घरातील वाद, पती-पत्नींमध्ये मतभेद, मालमत्ता, न्यायालयात विजय, खोटे खटके आणि गंभीर आर्थिक संकट या सर्वांच्या निवारणासाठी कणकेचे दिवे संकल्प घेऊन लावले जातात.
7 हे दिवे वाढत्या आणि कमी होत्या क्रमात लावतात. एका दिव्या पासून सुरुवात करून 11 दिव्यांपर्यंत नेतात. जसे की संकल्पाच्या पहिल्या दिवशी 1 नंतर 2, 3, 4, 5 आणि 11 पर्यंत दिवे लावल्यावर 10, 9, 8, 7 अश्या घटत्या क्रमात लावतात.
8 कणकेत हळद मिसळून मळतात आणि त्या गोळ्याला हाताने दिव्याचा आकार दिला जातो. नंतर त्यात तेल किंवा तूप घालून वात तेवतात.
9 नवस पूर्ण झाल्यावर एकत्ररीत्या कणकेचे सर्व संकल्प घेतलेले दिवे देऊळात जाऊन लावतात.
10 जर का दिव्यांची संख्या पूर्ण होण्याचा पूर्वीच आपली इच्छा पूर्ण झाल्यास तर या क्रमाला मोडू नये. संकल्प घेतलेले सर्व दिवे लावावे. एखाद्या चांगल्या दिवशी, चांगल्या वारी, शुभ मुहूर्त आणि चौघडा बघून दिवे लावण्याचा संकल्प घेऊ शकता. प्रत्येक दिवा तेवताना आपली इच्छा आवर्जून सांगावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवळात जाताना काय करावे ?