Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी, साहित्य आणि मंत्र

shani pradosh
, शनिवार, 28 डिसेंबर 2024 (06:43 IST)
Shani Trayodashi Puja Vidhi 2024 या वर्षी शनि त्रयोदशी व्रत शनिवार, 28 डिसेंबर रोजी होत आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाची आराधना केल्याने शनिदोष दूर होतो आणि साडेसाती आणि ढैयामध्येही आराम मिळतो, असे मानले जाते. अशात शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाची पूजा कशी करावी, या दिवशी कोणते मंत्र जपावेत आणि पूजेची संपूर्ण सामग्री कोणती आहे हे जाणून घेऊया-
 
शनि त्रयोदशी 2024 पूजा साहित्य Shani Trayodashi 2024 Puja Sahitya
शनि त्रयोदशीला पूजा साहित्य म्हणून पाणी, काळे तीळ, काळा कपडा, काळ्या मोहर्‍या, लोखंडी वस्तू जसे कडा, शिक्का, इतर धातू, नीलम रत्न किंवा त्याऐवजी गोकर्णाचे फुल, मध, आवळा, काळी मिरी, मोहरीचे तेल, गंगाजल, दिवा, कापसाची वात इतर वस्तू सामील करा.
शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी Shani Trayodashi 2024 Puja Vidhi
ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करावे. नंतर पूजा स्थळ स्वच्छ करुन त्यावर एक चौरंग मांडून गंगाजलने शुद्ध करावे. तथापि शनिदेवाची प्रतिमा घरात लावत नाही अशात त्यांचे चित्र देखील लावणे निष्द्धि मानले गेले आहे. अशात शनिदेवाचे ध्यान करताना सर्व पूजेचे साहित्य त्यांचे प्रतीक म्हणून चौरंगावर व्यवस्थित ठेवावे.
 
पूजेचे साहित्य चौरंगावर ठेवून शनिदेवाचे स्तोत्र आणि कवच पाठ करा. सर्व साहित्य ठेवल्यानंतर आणि पाठ संपल्यानंतर शनिदेवासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर शनिदेवाला मिठाई अर्पण करा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करा. शेवटी शनिदेवाची आरती म्हणत पूर्ण भक्तिभावाने त्यांची प्रार्थना करा.
शनि त्रयोदशी 2024 पूजा मंत्र Shani Trayodashi 2024 Puja Mantra
शनि त्रयोदशीला शनिदेवाची पूजा करताना 'ॐ शं शनैश्चराय नमः' आणि 'ॐ सूर्याय शनैश्चराय नमः' मंत्र जाप करा. शनि त्रयोदशीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने साडेसातीच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळते. ढैयाचा प्रभावही कमी होऊ लागतो आणि शनिदोषही दूर होतो. शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
ALSO READ: Shanivar Shani Puja चुकूनही पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यांमध्ये शनिदेवाची पूजा करू नये

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shani Trayodashi 2024 आज शनि त्रयोदशीला पिंपळाच्या झाडाजवळ या प्रकारे लावा दिवा