आज शरद पौर्णिमा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांचे प्रदर्शन करताना दिसतो. शरद पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा किंवा कोजागरीच्या नावाने देखील ओळखले जाते. अशी मान्यता आहे की या रात्री लक्ष्मी स्वर्ग लोकातून पृथ्वीवर प्रकट होते. या रात्री लक्ष्मीची जो व्यक्ती पूजा करतो त्यावर ती नक्कीच प्रसन्न होते.
1. शरद पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचा प्रकाश सर्वदूर पसरलेला असतो तेव्हा लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला धनलाभ होतो.
2. लक्ष्मीला सुपारी फार आवडते. म्हणून सुपारीचा वापर पूजेत करावा. पूजा केल्यानंतर सुपारीला लाल दोरा, अक्षता, कुंकू, पुष्प इत्यादीने पूजा करून त्याला तिजोरीत ठेवल्याने तुम्हाला कधीपण पैशांची चण चण राहणार नाही.
3.शरद पूर्णिमेच्या रात्री महादेवाला खिरेचा प्रसाद दाखवावा. खिरीला पौर्णिमेच्या रात्री गच्चीवर वर ठेवावे. नवैद्य लावल्यानंतर त्या खिरीच्या प्रसादाला ग्रहण करावे. हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही धनाभाव राहणार नाही.
4. शरद पौर्णिमेच्या रात्री मारुतीसमोर चारमुखी दिवा लावायला पाहिजे. यामुळे तुमच्या घरात सदैव सुख शांती कायम राहते