Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री भक्तविजय अध्याय ५३

श्री भक्तविजय अध्याय ५३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीत्रिलोक्यनाथाय नमः ॥    
जय विश्वभूषणा विश्वंभरा ॥ मायातीता जगदुद्धारा ॥ सगुणस्वरूपा निर्विकारा ॥ सायुज्यउदारा जगद्गुरो ॥१॥
जय जय मायाचक्रचाळका ॥ पीतांबरधारी वैकुंठनायका प्रजापतीचे निजजनका ॥ वेदोद्धारका पांडुरंगा ॥२॥
वारण आणि अणुरेणूंत ॥ तूं सारिखाचि अससी जगन्नाथ ॥ सुरगण पुरंदर निश्चित ॥ सत्तेनें वर्तती तुझिया ॥३॥
चंद्रसूर्य आकाशीं धांवती ॥ त्यांची सूत्रदोरी तुझिया हातीं ॥ जैसा जळमंडपी बाहुल्यांप्रती ॥ नाचवितो युक्तीं निजबळें ॥४॥
कां एकलाचि प्रभंजन केवळ ॥ हालवितसे तरुवर सकळ ॥ तैसा लाघवी तूं गोपाळ ॥ ब्रह्मांडगोळ हालविसी ॥५॥
जें जें चराचर दिसतें दृष्टीं ॥ तें तुझ्या रोमरंध्रीं जगजेठी ॥ तो तूं पुंडलिकाचे पाठीं ॥ दोनही कर कटीं ठेविले ॥६॥
ब्रह्मादिकां पार न कळे जाण ॥ तो तूं निजभक्तांचें पाळिसी वचन ॥ नानापरीचें संकट दाखवून ॥ मग निजांगें धांवणें करिसी तूं ॥७॥
शेषशायी तूं गरुडध्वजा ॥ लक्ष्मी इच्छी तुझिया चरणरजा ॥ तो तूं उभा राहूनि अधोक्षजा ॥ घेसील पूजा दासांची ॥८॥
योगी बैसले वज्रासनीं ॥ तरी लवकरी न येसी त्यांचे ध्यानीं ॥ तो तूं प्रेमळ भक्तांचें कीर्तनीं ॥ निर्लज्ज होऊनि नाचसी ॥९॥
त्या निजभक्तांचीं अघटित चरित्रें ॥ तूंच वदविसी राजीवनेत्र ॥ येरवीं मी मतिमंद करावया स्तोत्र ॥ बुद्धि स्वतंत्र असेना ॥१०॥
मागील अध्यायीं कथा अद्भुत ॥ तुकयासी पावले पंढरीनाथ ॥ कोरडे कागद उदकांत ॥ तेरा दिवस राखिले ॥११॥
आतां सावध होऊनि श्रोतीं ॥ कथा रसाळ परिसावी पुढती ॥ असो धामणगांव बालेघांटाप्रती ॥ प्रसिद्ध जाणती संतसाधु ॥१२॥
तेथील पाटील वैष्णव भला ॥ प्रेमळ भक्त माणकोजी बोधला ॥ शूद्र यातींत उपनाम त्याला ॥ जगताप ऐसें म्हणताती ॥१३॥
ममताई तयाची निजकांता ॥ परम भाविक पतिव्रता ॥ जे भ्रतारआज्ञेविण सर्वथा ॥ न वर्तें वृथा संसारीं ॥१४॥
ज्येष्ठपुत्र अति उदासी ॥ यमाजी नामाभिधान त्यासी ॥ तैसीच स्नुषा सद्गुणराशी ॥ नाम तियेसी भागीरथी ॥१५॥
ऐशीं चौघें जण एकचित्त ॥ प्रपंचीं असोनि अति विरक्त ॥ हृदयीं आठवोनि पंढरीनाथ ॥ भजन करित निशिदिनीं ॥१६॥
घरीं धनधान्य असे अपार ॥ महत्त्व मान्यता कारभार ॥ गायी वृषभ निरंतर ॥ गोठवण भरून असती पैं ॥१७॥
पंधरा दिवसीं एकादशीसी ॥ जात असे पंढरीसी ॥ नेमवारी धरिली ऐसी ॥ बोधराजें निजनिष्ठा ॥१८॥
द्वादशी पर्वकाळ सुदिन ॥ करी ब्राह्मणसंतर्पण ॥ दीन याचक क्षुधित जाण ॥ वांटित अन्न त्यांलागीं ॥१९॥
त्रयोदशीस उठोन लगलाहीं ॥ परतोनि यावें धामणगांवीं ॥ ऐसें बहुत दिवस लोटतां पाहीं ॥ तों अवर्षण पडलें देशांत ॥२०॥
दुष्काळ पडला अति कठीण ॥ साहा शेरांची जाहली धारण ॥ द्रव्य देऊनि विकत अन्न ॥ दुर्बळांकारण मिळेना ॥२१॥
ऐसा कठिण काळ देखतां दृष्टीं ॥ बोधल्यास करुणा उपजली पोटीं ॥ म्हणे भूतमात्रीं जगजेठी ॥ आहे सर्वां घटी व्यापक ॥२२॥
मग कांतेसी नेऊनि एकांतीं ॥ निजहित सांगे तिजप्रती ॥ म्हणे भुकेलियासी यथाशक्ती ॥ अन्नोदक देइंजे ॥२३॥
क्षुधार्थियासी द्यावें अन्न ॥ सुकत्या झाडासी घालावें जीवन ॥ शीतकाळीं वस्त्रें अर्पितां जाण ॥ तरी अक्षय पुण्य जोडतसे ॥२४॥
प्रवासी रोगिया औषध देतां ॥ कीं बुडत्यासी जळांतूनि काढितां ॥ कीं दुर्बळ ब्राह्मणाचें लग्न करितां ॥ तरी अक्षय पुण्य जोडतसे ॥२५॥
पावकें जळतां विझविलें घर ॥ कीं अनाथ प्रेतासी अग्निसंस्कार ॥ तृषाक्रांतासी पाजितां नीर ॥ तरी अक्षय पुण्य जोडतसे ॥२६॥
निर्बळ ढोरासी कुरवाळणें ॥ कीं पाशांतूनि सावज सोडविणें ॥ याचकांसीं बोलतां नम्र वचनें ॥ तरी अक्षय पुण्य जोडतसे ॥२७॥
हें सुकृत असतां पदरीं जाण ॥ तरी सात्विक वैराग्य उपजेल तेणें ॥ मग जोडती श्रीरामचरण ॥ पळती विघ्नें विषयांचीं ॥२८॥
येर जपतपें उग्र करिती ॥ तीं फळभोगें सुकृतें विलया जाती ॥ आणि परोपकार जे साधिती ॥ तयांसी विरक्ति ठसावे ॥२९॥
यापरी बोधला एकांतीं ॥ शिकवण देतसे कांतेप्रती ॥ अवश्य म्हणोनि ते सती ॥ तैशाचि रीतीं वर्ततसे ॥३०॥
करुणा धरूनि सर्वां भूतीं ॥ दुष्काळीं अन्नदान करिती ॥ स्वदेशांत प्रगटली कीर्ती ॥ याचक येती धांवूनि ॥३१॥
सारखेचे राशीवरी देखा ॥ गोळा होती मुंग्या मक्षिका ॥ कीं वृक्षच्छायेचिया देखोनि सुखा ॥ पांथ येती धांवोनि ॥३२॥
नातरी डोंगराचिया उदकापासीं ॥ श्वापदें येती निजप्रीतीसीं ॥ तेवीं बोधल्याचें मंदिरासी ॥ तृषार्त क्षुधार्त येती बहु ॥३३॥
अश्वावरी सामग्री घालूनि बहुत ॥ पंढरीसी निघावें दशमी आंत ॥ एकादशीसी जाऊनि तेथ ॥ स्नान करीत चंद्रभागेचें ॥३४॥
जात पुंडलिकाचें दर्शना ॥ हातीं शोभे टाळ वीणा ॥ घालूनि क्षेत्रप्रदक्षिणा ॥ करी गर्जना हरिनामें ॥३५॥
सप्रेमभरीं ते अवसरीं ॥ लोटांगण घाली महाद्वारीं ॥ मग प्रवेशोनि राउळांतरीं ॥ स्वरूप दृष्टीभरी न्याहाळीत ॥३६॥
देवासी देऊनि आलिंगन ॥ सांगत आपुले जीवींची खूण ॥ जैसी कन्या सासुरवासीण ॥ गुज सांगत मातेसी ॥३७॥
मस्तक ठेवूनि चरणांवरी ॥ सभामंडपीं कीर्तन करी ॥ जागरण होत प्रहर चारी ॥ स्वानंदगजरीं तेधवां ॥३८॥
विप्राहातीं स्वयंपाक करून ॥ क्षुधार्थियांसी अर्पावें अन्न ॥ मग देवासीं आज्ञा मागून ॥ यावें परतोन गृहासी ॥३९॥
ऐसें लोटतां बहुत दिन ॥ पदरींचें सरलें धान्यधन ॥ मग अलंकार बस्ता मोडून ॥ करी अन्नदान याचकां ॥४०॥
गायी वृषभ चार्‍याविण पीडती ॥ म्हणोनि वांटिलीं लोकांप्रती ॥ निरुपाधि होऊनि ऐशा रीतीं ॥ भजन एकांतीं करीतसे ॥४१॥
निंजांगें कष्ट करून ॥ मजुरी करूनि मिळवावें अन्न ॥ त्यांतही अतिथी संतोषवून ॥ कुटुंबरक्षण करीतसे ॥४२॥
ऐसी येतां दरिद्रआपदा ॥ आपुला निश्चय न सांडी कदा ॥ सद्भावें आळवूनि गोविंदा ॥ गुणानुवादा वर्णीतसे ॥४३॥
ऐसी निष्ठा देखोनि चित्तीं ॥ प्रसन्न जाहला रुक्मिणीपती ॥ साक्षात दर्शन एकांतीं ॥ बोधल्याप्रती देतसे ॥४४॥
एक चित्तीं नसतां भावो ॥ सर्वथा न भेटे देवाधिदेवो ॥ प्रेम भक्तीविण पाहा वो ॥ जाणपण वावो कासया ॥४५॥
अंगीं भरतां ज्ञानाभिमान ॥ कदापि न ठसे  भोळेपण ॥ जैसा तरुवर थोर वाढला जाण ॥ तो लवों नेणेचि सर्वथा ॥४६॥
कीं वृद्धत्व पातला द्विजवर ॥ त्याचें मुखीं न बैसे वेदाक्षर ॥ कीं कोल्हाटी थोर वाढल्या वर ॥ त्याचें अंग न लवेचि ॥४७॥
कीं अग्नीमाजी मडकें भाजिती ॥ त्याची परतोनी नव्हेचि माती ॥ नातरी जीं बीजें अग्नीनें आहाळती ॥ तीं अंकुरासी न येती सर्वथा ॥४८॥
तेवीं जाणपण येतां अंगासी ॥ भोळेपण न ठसेच तयासी ॥ भाव विश्वास नसतां मानसीं ॥ हृषीकेशी आतुडेना ॥४९॥
म्हणूनि साधुसंतजन ॥ डावलोनि टाकिती ज्ञानाभिमान ॥ जेवीं हिवराचे वृक्षालागून ॥ न जाती सज्ञान सर्वथा ॥५०॥
असो संतांची वर्णितां स्थित ॥ पुढें ग्रंथ वाढेल बहुत ॥ बोधल्याची देखोनि भोळी भक्त ॥ पंढरीनाथ भेटला ॥५१॥
एके दिवसीं हरिदिनीसी ॥ पंढरीस चालिले यात्रेसी ॥ वाटखर्ची नाहीं द्यावयासी ॥ मग कांता मानसीं चिंतावली ॥५२॥
चंद्रभागेसी करितां स्नाना ॥ ब्राह्मणासी द्यावया नाहीं दक्षिणा ॥ द्वादशीस विप्रासी भोजना ॥ कोठूनि द्यावें निजकांतें ॥५३॥
तरी काष्ठें आणोनियां स्वकरीं ॥ विकीन पंढरीचे बाजारीं ॥ मग कुर्‍हाद घेवोनि करीं ॥ पंढरीस सत्वर चालिले ॥५४॥
पायांस न मिळे पायतण ॥ वस्त्रें चवाळ अति जीर्ण ॥ डोक्यास चिंध्या बांधोन ॥ करित भजन श्रीहरीचें ॥५५॥
म्हणे गेलें घरींचें संपत्ति धन ॥ हें बहुत वाटें समाधान ॥ देवें मायाजाळ काढोन ॥ प्रपंचभान उडविलें ॥५६॥
जैसें नितळोनि गेलिया आभाळ ॥ आकाश दिसे अति निर्मळ ॥ कीं पूर ओहटोनि गेलिया तुंबळ ॥ गंगा निश्चळ वाहतसे ॥५७॥
तेवीं लया जातां धनसंपत्ती ॥ बोधला निश्चळ जाहला चित्तीं ॥ अंतरीं होऊन प्रेमभरित ॥ भजन करीत चालिला ॥५८॥
सन्निध उरतां क्षेत्र पंढरी ॥ भाराभार काष्ठें घेतलीं शिरीं ॥ तीं सत्वर नेऊनि बाजारीं ॥ तीन पैशांवरी दिधलीं ॥५९॥
चित्तीं अनुताप धरून ॥ केलें चंद्रभागेचें स्नान ॥ प्रयोग सांगतां विप्राकारण ॥ दक्षिणा दिधली एक पैसा ॥६०॥
एक पैसा मोडून ते वेळां ॥ घेतल्या खारका बुका माळा ॥ राउळा जाऊन घनसांवळा ॥ भावें पूजिला निजप्रीतीं ॥६१॥
रात्रीं ऐकोनि हरिकीर्तन ॥ चार प्रहर केलें जागरण ॥ द्वादशीस करोनियां स्नान ॥ उद्विग्नमन बैसला ॥६२॥
म्हणे विप्रासी शिधा द्यावयासी ॥ अनुकूलता नाहीं आजिचे दिवसीं ॥ मागुती तिरुका देऊनि वाणियासी ॥ पिष्ट अर्धशेर आणिलें ॥६३॥
तें चवाळ्यांत बांधोन ते अवसरीं ॥ बैसला चंद्रभागेचे तीरीं ॥ म्हणे कोणही द्विजवर येईल जरी ॥ तरी सभाग्य अंतरीं मी एक ॥६४॥
नाहीं डाळ तांदूळ लवण ॥ कोण दुर्बळाचें घेईल अन्न ॥ थोर थोर लोक यात्रेसी येऊन ॥ समाराधना घालिती ॥६५॥
सांडूनियां दिव्य मंदिर ॥ खोपटांत न येती वस्तीकर ॥ कां पात्रींचें टाकोनियां क्षीर ॥ ताक जेवणार न घेती ॥६६॥
तेवीं थोर थोर टाकोन यजमान ॥ मजकडे कोण येतील ब्राह्मण ॥ ऐसा चिंताक्रांत होऊन ॥ करित भजन श्रीहरीचें ॥६७॥
बोधल्याचा भाव निर्मळ ॥ जाणोनियां भक्तवत्सल ॥ वृद्ध ब्राह्मण दीनदयाळ ॥ जाहले तत्काळ ते समयीं ॥६८॥
हातीं काठी डोईसी टोपी ॥ जीर्ण वस्त्र नेसले जगजेठी ॥ थरथरां कांपत उठाउठीं आले वाळुवंटीं तेधवां ॥६९॥
बोधल्यासी म्हणे जगज्जीवन ॥ तूं आमुचा यजमान पुरातन ॥ मी पंढरीक्षेत्रीं राहून ॥ आशीर्वचन तुज देतों ॥७०॥
आणिक उदंड असती द्विजवर ॥ त्यांचे यजमान थोरथोर ॥ मज दुर्बळालागीं साचार ॥ कोणीच पामर न पुसती ॥७१॥
म्हणोनि क्षुधित होऊनि पोटीं ॥ पातलों बोधल्या तुझें भेटी ॥ काय साहित्य असेल जें गांठीं ॥ तें उठाउठीं मज द्यावें ॥७२॥
ऐकोनि विप्राचें वचन ॥ चित्तीं वाटलें समाधान ॥ म्हणे मज पावला रुक्मिणीरमण ॥ आनंदघन कृपाळु ॥७३॥
मग चवाळ्याची गांठ सोडूनि सत्वरीं ॥ पिष्ट काढिलें ते अवसरीं ॥ घातलें ब्राह्मणाचे पदरीं ॥ परी संकोच अंतरीं वाटला ॥७४॥
म्हणे स्वामी हें कोरडें पीठ ॥ द्यावयासी नाहीं डाळ मीठ ॥ वचन ऐकूनि वैकुंठपीठ ॥ काय बोलत तेधवां ॥७५॥
समयीं होतें जें अनुकूल ॥ तें त्वां दिधलें ये वेळ ॥ कासयासी पाहिजे लवण डाळ ॥ ऐसें घननीळ म्हणतसे ॥७६॥
बोधल्याचें चित्तीं आवडी बहुत ॥ कीं ब्राह्मण जेवावा दृष्टीदेखत ॥ हे जीवींची खूण पंढरीनाथ ॥ जाणता जाहला ते काळीं ॥७७॥
मग म्हणे रुक्मिणीकांत ॥ आमुचें बिर्‍हाड देउळांत ॥ स्वयंपाक करावया तेथ ॥ स्थलही रितें दिसेना ॥७८॥
शुभां वेचोनि देशील मातें ॥ तरी पानगे करूनि भक्षूं येथें ॥ ऐकोनि बोधल्याच्या चित्तातें ॥ संतोष परम वाटला ॥७९॥
म्हणे जैसें होतें माझें मनीं ॥ तैसेचि बोलिला विप्र वाणी ॥ मग चवाळ्याची ओंटी करूनी ॥ शुभा वेंचोनि आणिल्या ॥८०॥
स्नान करोनि आला ब्राह्मण ॥ ओलें वस्त्र नेसला जीर्ण ॥ बोधल्यानें यात्रेकर्‍यापासोन ॥ कृशानु आणोन दिधला ॥८१॥
ज्याचें ऐश्वर्य देखोनि डोळां ॥ लक्ष्मी जडली चरणकमळा ॥ तो वैकुंठवासी घनसांवळा ॥ पानगे करीत बैसला ॥८२॥
वेदोक्तमंत्र उच्चारूनी ॥ ज्यासी अवदान देती ऋषी हवनीं ॥ तो निजभक्ताची आवडी देखोनी ॥ पिष्ट मळीत निजकरें ॥८३॥
हा रुक्मिणीसी कळतां वृत्तांत ॥ कीं स्वयंपाक करिती पंढरीनाथ ॥ मग ती वृद्धरूप धरोनि त्वरित ॥ येती जाहली त्या ठायीं ॥८४॥
जैसा दीपक सूक्ष्म होतां जाण ॥ प्रकाश तैसाचि दिसे मलिन ॥ कीं वृक्षासी येता पोखरपण ॥ लता पिंगट होताती ॥८५॥
कां मृदंगाऐसीचि उमटे ध्वनी ॥ कीं पुष्पाऐसाचि परिमळ जाण ॥ कीं मेघाअंगीं चपळा जाण ॥ शोभायमान चमकत ॥८६॥
नातरी चित्राऐसा उमटे रंग ॥ कीं प्रकृतीऐसेंचि होय अंग ॥ कां मुगाऐसीचि जैसी शेंग ॥ झाडीं असतां वाढतसे ॥८७॥
काम ऋतुऐसेंचि आकाश होये ॥ कीं ओघाऐसी सरिता वाहे ॥ तेवीं भ्रताराऐसी रुक्मिणीमाये ॥ रूपें नटली तेधवां ॥८८॥
मुखांत नाहीं द्विजपंक्ती ॥ कर्णीं ताटंकें लखलखती ॥ सौभाग्यभूषणें विराजती ॥ कुंकुम ललाटीं लाविलें ॥८९॥
शुभ्र फाटकें वस्त्र जीर्ण ॥ काठी टेंकीत स्थिरावोन ॥ मग वाळुवंटीं येऊन जाण ॥ जगज्जीवन धुंडीतसे ॥९०॥
तो वाळुवंटीं थाळ घालूनी ॥ पिष्ट मळीतसे चक्रपाणी ॥ हें देखोनि विश्वजननी ॥ हांसोन काय बोलतसे ॥९१॥
यजमान आला यात्रेसी ॥ एकलेच आलां त्याजपासीं ॥ आम्हांसी टाकोनि मागेंसीं ॥ स्वयंपाकासी निघालां ॥९२॥
रुक्मिणी म्हणे ते समयीं ॥ मी स्वयंपाकार्थ पातलें पाहीं ॥ मग स्नान करोनि लवलाहीं ॥ बैसली येऊन सन्निध ॥९३॥
म्हणे एकलेच करूं पाहतां भोजन ॥ परी जेवावयास आली सुवासिण ॥ ऐकोनि बोधल्याचें मन ॥ संतोषयुक्त तेधवां ॥९४॥
बोधला विचारी स्वमनांत ॥ अन्न असे कीं हें किंचित ॥ उभयतां कैसीं जेवितील यांत ॥ न कळे निश्चित मजलागीं ॥९५॥
अनंतशक्तींची स्वामिणी जेथ ॥ सकळ सिद्धि ओळंगती तेथ ॥ तिचे हात लागतां त्वरित ॥ आली बरकत अन्नासी ॥९६॥
रांजणीं बैसली भागीरथी ॥ तरी ती आटेल कैशा रीतीं ॥ कामधेनूचिया गोढ्याप्रती ॥ चार्‍यासी तुटी न ये की ॥९७॥
नातरी उर्वीचें लग्नांत जाण ॥ नव्हे स्थळाची अडचण ॥ तेवीं जेथें बैसली माता रुक्मिण ॥ तेथें किंचित न्यून न पडेचि ॥९८॥
आतां पक्वान्नें करावीं जर ॥ तरी बोधल्याचें दुखवेल अंतर ॥ म्हणोनि पानगेच भाजिले फार ॥ जे अमृताहून सुरस ॥९९॥
तीन पात्रें तत्काळ वाढून ॥ निजभक्तासी म्हणे जगज्जीवन ॥ तुम्हींही आतांच उठोन ॥ प्रसाद घ्यावा ये पंक्ती ॥१००॥
येरू म्हणे जी द्विजवरा ॥ मी आतांच न जेवीं सत्वरा ॥ तुम्ही उभयतां जेविल्या पुढारां ॥ उच्छिष्ट पात्र मज द्यावें ॥१॥
अवश्य म्हणे हृषीकेशी ॥ मग सत्वर बैसले भोजनासी ॥ तों सुरवर येवोनि आकाशीं ॥ कौतुक दृष्टीसी पाहाती ॥२॥
इतर जनांच्या न पडतां दृष्टी ॥ परस्परें बोलताती गोष्टी ॥ म्हणती भक्तवत्सल जगजेठी ॥ प्रेमळापाठीं लागतसे ॥३॥
आम्ही करितों नाना यत्न ॥ परी कदा न करी अमृतपान ॥ तो बोधल्याची भक्ती देखोन ॥ भक्षी कदन्न निजप्रीतीं ॥४॥
ब्राह्मण सुवासिनी जेवल्यावर ॥ बोधल्यासी दिधलें उच्छिष्ट पात्र ॥ निमिष न लागतां शारंगधर ॥ अदृश्य जाहले तेधवां ॥५॥
तेव्हां उमजलें याचें मनीं ॥ कीं विप्रवेषें आले चक्रपाणी ॥ माझें समाधान करूनी ॥ गेले ऐसें वाटतसे ॥६॥
पात्रीं प्रसाद होता उरला ॥ तो निजप्रीतीनें भक्षी बोधला ॥ देउळासी जाऊन ते वेळां ॥ काय बोलिला देवासी ॥७॥
म्हणे भक्तवत्सला जगज्जीवना ॥ आजि कदन्न आवडलें तुझिया मना ॥ थोरथोर टाकूनि समाराधना ॥ सांभाळिलें दीना निजकृपें ॥८॥
यावरी म्हणे रुक्मिणीरमण ॥ द्विजांसी वाढिती नाना पक्वान्न ॥ तेथेंही मी जातसें जाण ॥ परी कोणीच भोजन न घालिती ॥९॥
बोधल्यास म्हणती अधोक्षज ॥ उदयीक कौतुक दाखवीन तुज ॥ तों एका सावकारें सहज ॥ सहस्रभोजन मांडिलें ॥११०॥
सर्व साहित्य करोनि ते दिनीं ॥ रात्रीं द्विजांसी सांगितलीं आमंत्रणीं ॥ सकळांचीं नांवें पुसोनी ॥ पत्रीं लिहोनि ठेविलीं ॥११॥
मग वाळुवंटीं कनात देऊनी ॥ स्वयंपाक केला दुसरे दिनीं ॥ विप्रांसी स्नानें सांगतां त्यांनीं ॥ पात्रीं येऊनि बैसले ॥१२॥
कागदीं ताळा पाहतां सहज ॥ तों सहस्रांची आली बेरीज ॥ तंब बोधल्यासी म्हणे अधोक्षज ॥ कौतुक तुज दाखवितों ॥१३॥
मग आपण जाहला वृद्ध ब्राह्मण ॥ वस्त्र नेसला फाटकें जीर्ण ॥ हातीं काठी जगज्जीवन ॥ थरथरां मान कांपवीत ॥१४॥
ऐसें रूप धरोनि पाहीं ॥ सत्वर चालिले लवलाहीं ॥ बोधल्यासी म्हणती तये समयीं ॥ कौतुक पाहीं दुरोनि ॥१५॥
ब्राह्मणपंक्तीपासीं जाण ॥ येऊनि बोलतसे जगज्जीवन ॥ मी क्षुधित उपवासी ब्राह्मण ॥ पक्वान्नभोजन इच्छीतसें ॥१६॥
ते म्हणती परतोनि जाईं ॥ येथें समावेश होत नाहीं ॥ वचन ऐकोनि शेषशायी ॥ काय बोलती तेधवां ॥१७॥
सहस्र ब्राह्मण बैसले देख ॥ यांत एक न समाये काय आगंतुक ॥ ऐसें बोलतां वैकुंठनायक ॥ सावकार बोलत तें ऐका ॥१८॥
आमंत्रिले ब्राह्मण असतां जाण ॥ आगंतुकाचें काय कारण ॥ ऐसे येतील उदंड जन ॥ आम्हीं कोठून अन्न पुरवावें ॥१९॥
मग बळेंचि पात्रीं उठाउठीं ॥ जाऊनि बैसले जगजेठी ॥ बोधला कौतुक विलोकूनि दृष्टी ॥ आश्चर्य पोटीं करीतसे ॥१२०॥
सावकार सेवकांसी सांगे देखा ॥ ब्राह्मणासी बाहेर उचलोनि टाका ॥ तेव्हां कोणीचि न करिती विवेका ॥ वैकुंठनायाका उठविलें ॥२१॥
कोणीं धरिलें चरण हात ॥ कोणी शेंडी धरोनि ओढीत ॥ म्हणती हा ब्राह्मण झोंड बहुत ॥ बळेंचि बैसतो पात्रावरी ॥२२॥
ऐसें परस्परें बोलोनि वचन ॥ द्विजासी टाकिलें भिरकावून ॥ पुढती सरसावोनि जगज्जीवन ॥ उभे राहिले तेधवां ॥२३॥
तों इकडे पात्रीं वाढिलें घृत ॥ पुरोहितें संकल्प सोडिला त्वरित ॥ मग आपोशन घेऊनि समस्त ॥ द्विज बैसले भोजना ॥२४॥
हें देखोनि वैकुंठविहारी ॥ परतोनि चालिले ते अवसरीं ॥ जैसा सिद्धांपासोनि त्रिपुरारी ॥ रुसोनि सत्वरी निघाला ॥२५॥
कीं कुडी सांडोनि वैकुंठविहारी ॥ परतोनि चालिले ते अवसरीं ॥ तेवीं पाठमोरा होतां रुक्मिणीकांत ॥ विघ्न अद्भुत ओढवलें ॥२६॥
अपार सुटला प्रभंजन ॥ धुळीनें कोंडूनि भरलें गगन ॥ अन्न पात्रें मृत्तिका भरोन ॥ गेलीं उडोन चोहींकडे ॥२७॥
कनात मंडप सुटोनि पडले ॥ सकळ द्विजवर उठोनि गेले ॥ हें कौतुक बोधल्यासी दाखविलें ॥ आश्चर्य वाटलें तयासी ॥२८॥
एक विमुख होतां जगज्जीवन ॥ उपवासी उठले सकळ ब्राह्मण ॥ जैसें मुळापासोनि तोडितां जीवन ॥ मग शाखा कोठून येतील ॥२९॥
कीं वरमाय मंडपांतूनि रुसोन जाय ॥ तेथें वर्‍हाडणी जेवितील काय ॥ कीं वत्सासी पान्हा न देतां गाय ॥ तरी धर्धनी काय दोहिती ॥१३०॥
तेवीं विप्रमुखें भोक्ता घननीळ ॥ ज्यासीं हृदयीं ध्यातो जाश्वनील ॥ तो विमुख होतां दीनदयाळ ॥ विघ्न तत्काळ ओढवलें ॥३१॥
बोधल्यासी म्हणे वैकुंठनाथ ॥ ऐसेचि दांभिक लोक समस्त ॥ तुझा देखोनि भावार्थ ॥ कदन्न आवडत मजलागीं ॥३२॥
म्यां मोडोनि दुर्योधनाच्या वचना ॥ विदुराच्या गृहीं खादल्या कण्या ॥ द्रौपदीसतीचे भाजीच्या पाना ॥ आलों पाहुणा अर्धरात्रीं ॥३३॥
गोपाळांचें उच्छिष्ट जाण ॥ म्या खादलें निजप्रीतीनें ॥ ऋषिपत्न्यांनीं आणिलें अन्न ॥ तें आवडीकरोन भक्षीतसें ॥३४॥
गोपाळ चाळवूनि घालिती कवळ ॥ ते मज वाटती अति निर्मळ ॥ ऐसा बोलती दीनदयाळ ॥ भक्तप्रेमळ संतोषला ॥३५॥
बोधला म्हणे जगज्जीवना ॥ तुझा पार न कळे कवना ॥ ऐशा रीतीं बोलोनि वचना ॥ मिठी चरणीं घातली ॥३६॥
चोखामेळा वैष्णवभक्त प्रेमळ ॥ त्याचें घृत भक्षीत घननीळ ॥ भिल्लेणीचीं उच्छिष्ट फळें सकळ ॥ प्रेमआवडीनें खातसे ॥३७॥
मग देवाची आज्ञा घेवोनि पाहीं ॥ परतोनि चालिले धामणगांवीं ॥ मार्गीं चालतां लवलाहीं ॥ तों ओसाड अरण्य लागलें ॥३८॥
क्षुधेतृषेनें व्यापिलें जाण ॥ जवळ न दिसे पुर पट्टण ॥ निजदासाचें अंतर जाणून ॥ जगज्जीवन पातले ॥३९॥
इच्छामात्रें तये वेळां ॥ वाटेसी निर्माण केला मळा ॥ जो दृष्टीनें देखतां डोळां ॥ विश्रांति वाटे पांथिकासी ॥१४०॥
आपण बनकर होऊनि प्रीतीं ॥ मोट हांकी वैकुंठपती ॥ माळीण होऊनि रुक्मिणी सती ॥ वाट पाहाती भक्तांची ॥४१॥
हें बोधल्यानें दृष्टीं देखोन ॥ मळ्यांत जावयास न घेच मन ॥ शीत उष्ण दुःख सुख समान ॥ मानोनि भजन करीतसे ॥४२॥
मग पांटींत घालोनि ताकभाकरी ॥ कंदमूळफळें घेतलीं बरीं ॥ लावलाहीं घेऊन मस्तकावरी ॥ रुक्मिणी पुढारी येतसे ॥४३॥
बोधल्यासी म्हणे ते वेळां ॥ आमचा डावलोनि जातोसी मळा ॥ माळी वाट पाहत बैसला ॥ दुरूनि तुजला देखोनि ॥४४॥
तूं पंढरीचा वारकरी ॥ आमुचा आश्रय पवित्र करीं ॥ क्षुधा तृषा असली जरी ॥ तरी संकोच अंतरीं न धरावा ॥४५॥
बोधला विस्मित जाहला चित्तीं ॥ म्हणे या स्थळीं कधींच नव्हती वस्ती ॥ मग परतोनि जाऊनि मळ्याप्रती ॥ घेतली विश्रांति क्षणभरी ॥४६॥
कंद फळें खाऊनि कांहीं ॥ सत्वर चालिले धामणगांवीं ॥ परतोनि मागें पाहातां पाहीं ॥ तों कोणीच न पडे दृष्टीसी ॥४७॥
म्हणे मी क्षुधित जाहलों बहुत ॥ म्हणोनि माव रची पंढरीनाथ ॥ मंदिरीं जाऊन वृत्तांत ॥ कांतेप्रति सांगतसे ॥४८॥
एके दिवशीं बोधराज ॥ शेतीं राखण बैसले सहज ॥ ध्यानांत आणोनि अधोक्षज ॥ नामस्मरण करीतसे ॥४९॥
म्हणे चाडियावरी मूठ धरिती जेव्हां ॥ विश्वभाग्य पिको म्हणे तेव्हां ॥ तरी आतां कासया पक्षी उडवा ॥ त्यांचिया जीवा दुःख वाटे ॥१५०॥
ज्याचें अन्न असेल येथ ॥ ते सुखें खावोत या क्षेत्रांत ॥ सर्वां भूतीं रुक्मिणीकांत ॥ बोलिले संट पुरातन ॥५१॥
मस्तकीं गोफण गुंडाळोन ॥ अनुतापें करीत नामस्मरण ॥ तों पांटींत भाकर घालोन ॥ कांतां पातली सत्वर ॥५२॥
भोजन घालोनि बोधल्यासी ॥ ममतायी बोलिली काय त्यासी ॥ तुम्ही हुरडा वांटितां यांचकांसी ॥ तरी पुढें गति कैसी होईल ॥५३॥
दिवाणाचा फिटला पाहिजे सारा ॥ धान्य लागतें आपुलें उदरा ॥ म्हणोनि माझी गोष्टी भ्रतारा ॥ चित्तीं धरा आजि एक ॥५४॥
आपुल्या हातें कणसें जाण ॥ द्याल तरी विठोबाचीच आण ॥ ऐसें बोलोनियां वचन ॥ कांता गेली मंदिरा ॥५५॥
तों कीर्तन करीत आनंदेंसीं ॥ यात्रा चालिली पंढरीसी ॥ तें बोधल्यानें देखोनि दृष्टीसी ॥ आनंद मानसीं वाटला ॥५६॥
मग मळ्याखालीं उतरोनि सत्वर ॥ घातला साष्टांग नमस्कार ॥ तों पुढें चालत होते द्विजवर ॥ ते म्हणती कोमळ अंतर बहु याचें ॥५७॥
ब्राह्मण म्हणे रे विष्णुभक्ता ॥ तूं दुष्काळीं आमुचा अन्नदाता ॥ जरी कणसें चार देशील आतां ॥ तरी संतोष क्षुधिता मज होय ॥५८॥
ऐकोनि द्विजवराची वाणी ॥ करुणा उपजली त्याचें मनीं ॥ म्हणे मज कांतेनें आण घालूनी ॥ घरासी गेली आतांचि ॥५९॥
तरी तुम्हीं जाऊनि क्षेत्रांत ॥ कणसें न्यावीं आपुले हातें ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ विप्र चित्तांत संतोषला ॥१६०॥
लगबगें मोडितां ते अवसरीं ॥ तों मागोनि आले यात्रेकरी ॥ त्यांनीं द्विजवराचे करीं ॥ कणसें देखिलीं तेधवां ॥६१॥
मग विठ्ठलनामें गर्जोनि सत्वरीं ॥ बोधल्यासी म्हणती ते अवसरीं ॥ आम्हांसी कणसें देशील जरी ॥ तरी कृपा श्रीहरी करील तुज ॥६२॥
महर्घता पडली अति कठिण ॥ तीन पायल्यांची जाहली धारण ॥ ये समयीं करिशील अन्नदान ॥ तरी अगणित पुण्य होईल ॥६३॥
वचन ऐकोनि बोधल्यानें ॥ चित्तीं वाटलें समाधान ॥ म्हणे धन्य आजिचा सुदिन ॥ संतसज्जन भेटले ॥६४॥
मग यात्रेकर्‍यांसी ते अवसरीं ॥ म्हणे कणसें मोडा आपुले करीं ॥ मज शपथ घालोनि झडकरी ॥ कांता मंदिरीं गेली असे ॥६५॥
यात्रा होती दोनशत ॥ क्षेत्रामाजी शिरले त्वरित ॥ जोंधळा लुटोनि केला फस्त ॥ मग निघाले समस्त बाहेरी ॥६६॥
गांवांत कळला वृत्तांत ॥ कीं बोधल्यानें लुटविलें शेत ॥ ऐकोनि नरनारे समस्त ॥ आश्चर्य करीत मानसीं ॥६७॥
एक म्हणती अति उदार ॥ एक म्हणती दिवालखोर ॥ एक म्हणती त्याचा संसार ॥ रुक्मिणीवर चालवितो ॥६८॥
पुत्र कांता गांजितील म्हणोन ॥ गांवांत न येचि परतोन ॥ ध्यानांत आणोनि जगज्जीवन ॥ सप्रेम भजन करीतसे ॥६९॥
तंव ज्येष्ठपुत्रानें वृत्तांत ऐकोनी ॥ पहावयासी आला तये क्षणीं ॥ तों ताटांस थोटीं कणसें देखोनी ॥ उद्वेग मनीं वाटला ॥१७०॥
चिंताक्रांत बैसला तेथ ॥ पित्यासी कळलें समस्त ॥ एक अभंग उपदेश तेथ ॥ केला असे पुत्रासी ॥७१॥
म्हणे ऐक बापा जिवाचें लक्षण ॥ हें व्यर्थचि धरितोसी कृपणपण ॥ जैशा मधुमक्षिका उपवासी राहून ॥ रस सांचोन ठेविती ॥७२॥
मग पारधी येऊनि एक वेळ ॥ झाडोनि नेत तें मोहळ ॥ मग मक्षिका करिती तळमळ ॥ अरण्यामाजी जाऊनि ॥७३॥
तेवीं कृपणता धरोनि पोटीं ॥ लोक करिती संसारराहाटी ॥ मग आलिया नागवणीची पटी ॥ देती शेवटीं धनधान्य ॥७४॥
आजी सत्पात्रीं वेंचिलें शेत ॥ आणि तूं कां मनांत चिंताक्रांत ॥ ऐसें बोलतां प्रेमळभक्त ॥ अनुताप चित्तांत ठसावला ॥७५॥
हरिणीच्या पाडसाकारणें ॥ शिकवणें न लागती जैसीं किराणें ॥ कीं विहंगमीच्या पिल्यांसी जाणें ॥ उडतां कष्ट न होती ॥७६॥
नातरी मीनाचिया पिलियां ॥ सांगड बांधणें कासया ॥ तेवीं यमाजीसी अनुताप व्हावया ॥ सायास नाहीं लागले ॥७७॥
बोधल्यासी करोनि साष्टांग नमन ॥ घरासी नेलें हातीं धरून ॥ मग ममतायीसी सकळ वर्तमान ॥ जाहलें तैसें सांगितलें ॥७८॥
यात्रेकर्‍यांसी शेत वांटिलें ॥ ऐकोनि कांतेसी समाधान वाटलें ॥ म्हणे सत्पात्रीं अन्न वांटिलें ॥ हें सुकृत फळलें मागील कीं ॥७९॥
वाटलें पत्नीस समाधान ॥ परी निंदा करिती कुटिल पिशुन ॥ म्हणती दिवाणसारा कोठून ॥ देईल आतां कळेना ॥ देईल आतां कळेना ॥१८०॥
तंव गांवांत पटी मांडिली जाण ॥ वायदा लिहिला सात होन ॥ गांवकरी समापत्र करून ॥ काय बोलती तें ऐका ॥८१॥
पदरीं नसतां कांहीं ताकत ॥ बोधल्यानें लुटवून टाकिलें शेत ॥ हरिनाम गर्जोनि दिवसरात ॥ टाळ कुटित निजप्रेमें ॥८२॥
तरी त्याचे आधीं मागावे होन ॥ मग आपण देऊं सकळ जन ॥ ऐसा विचार दृढ करून ॥ पत्र लिहून पाठविलें ॥८३॥
यांत अंतर करील कोणी दुसरा ॥ तरी बोधल्याचा त्यानें द्यावा सारा ॥ मग हवालदार पाठवून त्याचिया घरा ॥ म्हणे होन सत्वर देइंजे ॥८४॥
तीन होन मंदिरीं होते जाण ॥ चार न मिळती करीतां प्रयत्न ॥ गांवांत एक नागाऊ ब्राह्मणीण ॥ सावकारीण होती कीं ॥८५॥
प्रहररात्र लोटल्यावरी ॥ बोधराज गेले तिचिया घरीं ॥ म्हणे कलांतर घेऊन अगोदरी ॥ होन चार सत्वरीं मज द्यावें ॥८६॥
अवश्य म्हणे सावकारीण ॥ प्रातःकाळीं देईन होन ॥ मग बोधराज सत्वर उठोन ॥ निजमंदिरा पातला ॥८७॥
द्रव्याची चरवी भरोनि मोठी ॥ ठेविली होती भुईचे पोटीं ॥ ते उकरोनियां उठाउठीं ॥ चार होन त्यांतून काढिले ॥८८॥
दुसरे दिवसीं गांवांत ॥ तीस परस्परें कळली मात ॥ कीं यात्रेकर्‍यांहातीं शेत ॥ लुटविलें निश्चितीं तयानें ॥८९॥
नागाऊ म्हणे आपुलें चित्तीं ॥ होन दिधले परतोनि न येती ॥ व्याजाची लांलुच धरिली निश्चितीं ॥ तरी मुद्दलचि बुडेल दिसताहे ॥१९०॥
भुसाची आशा धरितां जाण ॥ तरी वृषभ खाऊन जातील कण ॥ कीं ताकाचें भाजन करितां रक्षण ॥ तंव दुग्धचि नासोन जाईल ॥९१॥
प्रत्यक्ष आहाणा बोलती जन ॥ अदमणासाठीं जाती मण ॥ टक्क्याची आशा धरितां जाण ॥ तों सगळाच होन बुडतसे ॥९२॥
असो दुसरे दिवसीं बोधला येऊन ॥ नागाऊपासीं मागे होन ॥ ती म्हणे एकाचा भरंवसा धरून ॥ तुम्हांसी वचन दिधलें ॥९३॥
परी तो आतां म्हणतो नाहीं ॥ यासी उपाय आपुला कायी ॥ आणिक तों धामणगांवीं पाहीं ॥ सावकार कोणी नसे कीं ॥९४॥
वचन ऐकोनि प्रेमळ भक्त ॥ घरासी उठोनि आला त्वरित ॥ मनीं होऊनि चिंताक्रांत ॥ काय बोलत कांतेसी ॥९५॥
सार्‍यासाठीं अडविलें फार ॥ कोठें होन न मिळती चार ॥ तरी मी राळेरासी जाऊनि सत्वर ॥ पाहातों सावकार एखादा ॥९६॥
ऐसें बोलोनि कांतेप्रती ॥ बोधराज निघाले सत्वरगती ॥ मार्गीं चालतां एकांतीं ॥ श्रीहरीचें भजन करितसे ॥९७॥
गोविंदा गोपाळा श्रीपती ॥ जगदुद्धारा अमूर्तमूर्ती ॥ सगुणस्वरूपा अक्षयचित्तीं ॥ भजनप्रीति असों दें ॥९८॥
तंव इकडे गांवांत बोभाट जाहला ॥ म्हणती बोधला पळोनि गेला ॥ द्वारीं प्यादा येवोनि बैसला ॥ दारवटा बंद केला तयानें ॥९९॥
गुरेंवासरें ते अवसरीं ॥ कोंडून टाकिली घरच्याघरीं ॥ कृशानु उदक भीतरी ॥ जाऊं नेदीचि सर्वथा ॥२००॥
ऐसा दुर्जनीं अपाय करितां ॥ करुणा उपजली पंढरीनाथा ॥ म्हणे संकट पडलें माझिया भक्ता ॥ तरी कार्य आतां साधावें ॥१॥
त्यानें लुटंविलें नसतें शेत ॥ तरी कां होता ऐसा आकांत ॥ मग अंत्यजरूप धरूनि त्वरित ॥ रुक्मिणीकांत पातले ॥२॥
गांवींचा होता विठ्या महार ॥ तैसेचि जाहले शारंगधर ॥ सात होन घेऊनि सत्वर ॥ चावडीं नेऊनि दीधले ॥३॥
जोहार मायबाप ऐका वचन ॥ माणकोजी पाटलानें पाठविले होन ॥ मग चौगुल्यांपासीं देऊन ॥ जगज्जीवन परतले ॥४॥
गांवकरीयांनीं करोनि पटी ॥ पोतें पाठविलें उठाउठीं ॥ म्हणती बोधल्यासी या संकटीं ॥ द्रव्य कोठोनि मिळालें ॥५॥
दुसरे दिवसीं प्रेमळ भक्त ॥ होन घेऊनि आला त्वरित ॥ तंव बोभाट नाहीं गांवांत ॥ दिवणाचें पोतें सरलिया ॥६॥
चौगुले काय बोलती वचन ॥ तुम्हीं महाराहातें पाठविले होन ॥ ते आम्हीं सत्वरी घेऊन ॥ पोतें पाठविलें राजद्वारीं ॥७॥
कांतापुत्रांसी पुसतां पाहीं ॥ तीं म्हणती ठाउकें आम्हासी नाहीं ॥ मग विठ्या महारासी लवलाहीं ॥ बोलावूनि पुसतसे ॥८॥
तो म्हणे माझिया घरीं अन्न ॥ एका दिवसाचें नाहीं जान ॥ आणि मी तुमचा सारा कोठून ॥ देईन नेऊन चावडीसी ॥९॥
ऐसी ऐकोनि वचनोक्ती ॥ बोधला उमजला आपुलें चित्तीं ॥ म्हणे माझें संकट देखोनि प्रीतीं ॥ रुक्मिणीपती पावले ॥२१०॥
कंठ जाहलासे सद्गदित ॥ नेत्रीं अश्रुपात वाहात ॥ म्हणे दीनदयाळ अनाथनाथ ॥ शिणलेत कीं मजलागीं ॥११॥
क्षीराब्धिवासा पंढरीराया ॥ त्वां अंत्यजवेष धरिला कासया ॥ म्यां तरी सोडूनि प्रपंचमाया ॥ तुझिया पायां जडलों कीं ॥१२॥
तुझें भजनाचें लागलें वेड ॥ मजला लोकांची नाहीं चाड ॥ नाशवंत हें शरीर जड ॥ याचेंही कोड न धरीं मी ॥१३॥
आतां सगुणरूप धरोनि त्वरित ॥ मज भेट देईं साक्षात ॥ बोधल्याचा शुद्ध देखोनि हेत ॥ पंढरीनाथ पावले ॥१४॥
देवासी भेटोनि त्या अवसरा ॥ म्हणे कोठूनि दिधला आमुचा सारा ॥ ऐसें पुसतां भक्तचतुरा ॥ अनाथसोयरा काय बोले ॥१५॥
तूं राळेरासीं गेलियावर ॥ गांवकर्‍यांनीं अडविलें फार ॥ मग नागाऊचे होन चार ॥ चोरोनियां आणिले ॥१६॥
आणि घरचे तीन घालोनि त्यांत ॥ चावडीसी नेऊनि दिधले सात ॥ ऐसें बोलतां पंढरीनाथ ॥ बोधला हांसत तेधवां ॥१७॥
म्हणे दीनदयाळा पंढरीराया ॥ गरीबाचे होन घेतले कासया ॥ आतां व्याजीं आणिले काढोनियां ॥ ते नेऊनि तिजला देतों मी ॥१८॥
ऐकोनि बोले जगज्जीवन ॥ तूं जरी देशील तिचे होन नेऊन ॥ तरी गुप्त आहे तियेचें ठेवण ॥ तें मी उडवीन क्षणमात्रें ॥१९॥
बोधला मिठी घाली पायीं ॥ म्हणे समर्थांपुढें उपाय नाहीं ॥ आणिक कौतु

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय ५२