श्रीसद्गुरुलीलामृत हे श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांचे ओवीबद्ध चरित्र आहे. कै. गोपाळ विष्णु फडके यांनी लिहिलेले आहे. श्री गोपाळरावांनी इ. स. १९१८ च्या पुण्यतिथीचे दिवशी गोंदवले येथें चरित्र लिहिण्यास प्रारंभ केला आणि "श्रीसद्गुरुलीलामृत" १९२२-२३ साली प्रथम प्रसिद्ध झाले. भक्त या ग्रंथाचे नियमित पारायण करतात.
जेथें नामाचे स्मरण तें माझे वसतीस्थान,
जेथें रामाचे नांव तेथेची माझा ठाव,
हेची वसावे चित्तीं,
दीनदास म्हणे राम देईल मुक्ती
- श्री महाराज