Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ३३

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ३३
श्रीगणेशायनमः ॥ श्रीपांडवपालकायते नमः ॥
ॐ क्षत्रं क्षयाय विधी नोपत्‍हृतं महात्मा ब्रह्म ध्रुगुझ्झितपथं नरकार्तिलिप्सु ॥
उत्धंत्य साव वनि कंटक मुग्रवीर्यस्त्रिः सप्त कृत्वरु रुधारपरश्‍वधेन ॥१॥
नमोस्तुते नारायणा नमोस्तुते नरा नरोत्तमा नमो सरस्वती विद्यादि कारणा श्रीवेदव्यासा नमोस्तुते ॥१॥
ऐसा नमनाचा विधी कवींनीं केला असे आधीं तो म्या करोनी सुबुद्धी ग्रंथनिधी रचियेला ॥२॥
श्रोते करिती पुनः प्रश्न नाना प्रकारें स्मृती वचन नानापुराणें पृथग्वर्णन चित्तासी भ्रमण होय ऐकतां ॥३॥
कलीमध्यें गुरुही त्रिविध जाण कोणाचें मानावें प्रमाण तरी आपुले ठायीं परशुराम मुख्य काय तें सांगे ॥४॥
ऐकतां तो शुक हांसोन ह्मणे विचारितां अज्ञानें करुन आपुले कंठींचा मणी विसरोन व्यर्थ पाहता चहूंकडे ॥५॥
परशुराम अंतरीं बैसोन वदवी शुकमुखें करोन तें परिसोत श्रोते जन विचारण करुनी ॥६॥
हा तुमचा तुह्मींच विचार करा जो तुह्मां उपदेश परंपरा तोच विचारितां असे खरा चतुरक्षरा समवेश ॥७॥
ही भूमी जगन्माता जनार्दन सर्वांचा पिता त्याच्याच नामें विवाह करितां संन्यास घेतां न सुटेतो ॥८॥
तेव्हां आईबाप कुळदैवत मोक्षासिही निश्चित आणि अग्नी सूर्यामध्यें अत्यंत नित्य विप्रासी आराध्य असे ॥९॥
चोवीस नामें चोवीस अक्षर तेणेंच ओळखा चतुरक्षर शंखचक्र गदा पद्मधर सर्व वेदांनीं प्रतिपाद्यतो ॥१०॥
स्थिरचर जनीं जनार्दन वासुदेव रुप राजें किंवा विप्रांतही विष्णुरुप ऐसें एक सर्वांतूनि ईश्‍वररुप ओळखणें तप हेंचि जाणा ॥११॥
तेव्हां त्याच्या प्रेरणेंत प्रीत्यर्थ सकळ हे धर्मार्थ जाणा तुह्मीं श्रोते यथार्थ संशयीं व्यर्थ शिणूं नका ॥१२॥
बहुत जरीं झालीं पुराणें त्यांमध्यें श्रीहरी वाक्य प्रमाण बाकीचें ते असुरमोहन नारायणानींच केलें ॥१३॥
श्लोक ॥ द्वौभूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एवच ॥ विष्णु भक्ती परो देवो विपरी तस्तथासुरः ॥१॥
इति अग्निपुराणे ॥ पुराणें असती अनेक परी महाभारत एक त्याचा सारांश काय देख विवेक धरुनि ॥१४॥
आदौ मध्यें अंते विष्णू सर्वत्र गीयते मी थोडक्यांत सांगीतलेंतें श्रोत्यांते विनवोनी ॥१५॥
तेव्हां आईबाप कुळदैवत यांचें प्रमाण मानावें अत्यंत न मानितां नरक निश्चित अखंड भोगिती ते ॥१६॥
ऐसें असे निर्णय तत्व आतां ग्रंथानुक्रमणिका सर्व सांगतों मी ती अपूर्व ऐका तुह्मीं ॥१७॥
पहिले अध्यायीं नमन दुसरे अध्यायीं गौप्यज्ञान तिसर्‍यांत श्रीपरशुराम प्रकट होती ईश्‍वर ॥१८॥
चवथे अध्यायीं जाण नामकर्ण अन्नमाशन पांचव्यांत फरशु आख्यान मौंजी गजासुर वध असे ॥१९॥
विद्यामिषें कैलासीं गमन प्रमथेशाचा गर्वहरण सहाव्यांत जालें हें कथन सातव्यांत परशुरामें है हय मारिला ॥२०॥
तीर्थ क्षेत्रांचें वर्णन तुळसी महात्म्य महान आठव्यांत जाहलें कथन श्रीमत्परशुरामासीं ॥२१॥
नवव्यांत पित्राज्ञेचें पालन आणि उपदेश ग्रहण सदाचाराविषयीं जाण सांगती जमदग्नी ॥२२॥
भू निक्षेत्री करण्याचें कारण आणि निक्षेत्री करण मातापिता संतुष्ट करुन विदेह दर्शन घेतलें ॥२३॥
सीतेचें आख्यान ऐसें दहाव्यांत कथन अकराव्यांत दुसर्‍या रुपें करुन भेद दाखविला असुरांसीं ॥२४॥
बाराव्यांत स्थीर मन होण्याविषयीं कारण ध्यान योगाभ्यसन भक्ति लक्षण सांगीतलें ॥२५॥
तेराव्यांत ईश्‍वरावतार कितीं तें कथन केलें समग्र ध्यान भक्तियोग अपार तत्व शब्दार्थ सांगीतला ॥२६॥
चवदाव्यांत स्नान तिलकादि सांगीतला पूजाविधी पद्माक्ष महात्म्य संवादीं रामापासूनी ऐकिलें ॥२७॥
पंधराव्यांत वर्णधर्म एकादशीचें महिमान सोळाव्यांत कथन आणीक व्रतांचें असे ॥२८॥
सतराव्या अध्यायांत कथन परशुराम सत्द्याद्रीपासून जातां केले ब्राह्मण संजीवन सागरा प्रार्थिती मगते ॥२९॥
अठराव्यांत विश्‍वामित्र ऊर्वशी गोष्ट आणि मुक्तीपाळ पंजरासी एकोणिसाव्यांत धर्मासी वैतरणी महिमान कथियेलें ॥३०॥
विसाव्यांत एकवीसाव्यांत विमळासुराचें चरित्र बावीसाव्यांत मुक्ति देत परशुराम त्या दैत्यासीं ॥३१॥
तेणें विमळ तीर्थाचें महिमान तेथींचें यात्राविधान सत्ताविसाव्यापर्यंत वर्णन पुढें प्रचीत विप्राची गोष्ट असे ॥३२॥
तिसाव्यांत तिथी परत्वें यात्रा आणीक वदल्या परम पवित्रा ॥ त्रिलोकी प्रख्यात सर्वत्रा महिमा तेथींचा ॥३३॥
विमळ निर्मळ वैतरणी त्याचें महाम्त्य त्रिभुवनीं महेंद्र पर्वतीं राहोनी तेथींचें महिमान वाढविलें ॥३४॥
श्लोक ॥ जामदग्न्य नमस्तेस्तु रेणुकानंद वर्धन ॥ आमलकीकृत छायभुक्ति मुक्ति फलप्रद ॥१॥
इति पूजामंत्रः ॥ धात्री धात्रि समुद्भूते सर्व पातक नाशिनी ॥
आमलकी नमस्तुभ्यं गृहाणार्घ्यं नमोस्तुते ॥१॥धात्र्याऽर्घ्यं ॥ 
आमलकीच्या सहित हे भार्गवेश्‍वर राहत तेथें पूजिती जे सतत इच्छित प्राप्ती होय तयां ॥३५॥
फाल्गुन शुक्ल एकादशीसी परशुराम प्रगटवेषी इच्छित देवोनि स्वभक्तांसी अमल करिती मनुष्यां ॥३६॥
आतां महेंद्र पर्वतीं यात्राविधान कलौ श्रीकृष्ण बळिराम करिते जाहले प्रीती करुन एकतिसाव्यांत तें कथिलें ॥३७॥
आणि त्याच अध्यायीं कथन संख्यासहीत महापुराणें नामें करुनि उपपुराणें वर्णिलीं असती ॥३८॥
बत्तिसाव्यांत वर्णन करु सर्व देव ब्राह्मणाचे जे गुरु त्यांचें जें का पवित्र थोरु तें वर्णितां श्रीसंतोषले ॥३९॥
परशुरामचरित्र महान त्याची ग्रंथानु क्रमणिका कथन जो करी पठण श्रवण तया प्रसन्न श्रीहरी ॥४०॥
परशुरामचरित्र महाग्रंथ पारायण करितां यथार्थ तयां चतुर्विध पुरुषार्थ महेंद्रनाथ देइजे ॥४१॥
तीर्थेंक्षेत्रें दैवत पारायण करितां यथार्थ वश होती तीं निश्चित न करीत कधीं विघ्नातें ॥४२॥
जी जी असे मनकामना पारायण करावें त्या कारणा भावें पूजितां परशुरामा इच्छीत प्राप्ती होतसे ॥४३॥
परशुराम चरित्र जे वाचिती भक्तिभावें विचार करिती ते मोक्षपदा पावती पुनरावृर्त्तीवर्जित ॥४४॥
उप पातकें महापातकें रोगव्याधी शत्रू भयादिकें निवारणार्थ हे देखे परशुराम चरीत्र पारायण ॥४५॥
वैशाख शुक्ल तृतीया सायान्ह व्यापिनी ग्रात्द्या तें पर्व जगतींया पारायणाविषयीं ॥४६॥
परशुरामाचा उत्साह अपार करोनि वाचावें चरित्र असतां पुनर्वसू नक्षत्र पर्वमोठें ह्मणावें ॥४७॥
प्रातः स्नान तिलक मुद्रा संध्याहोम परशुधरा पूजन ऐसें नित्य कर्म करा मग पितृश्राद्ध ते दिवसीं ॥४८॥
नंतर चरित्र पठण श्रवन करा स्वयें उत्साहा अंतीं पारण नाना प्रकारचे समारंभ जाण करितां परशुराम संतोषती ॥४९॥
आणीक पारायण करण्यास सांगीतलासे दिवस आषाढ शुक्ल पूर्णा विशेष सज्जन ह्मणती ॥५०॥
जे जे दिवसीं चरीत्र वाचाल ते ते दिवसीं भार्गव दयाळ इच्छित देतसे सकळ स्वधर्म निष्ठासी ॥५१॥
चरित्राचें पत्र पृष्ठ वोवी वाचितां होयतो कवी आणि जावोनी वैकुंठ पदवी अखंड राहती ते ॥५२॥
जो का परशुराम चरित्र कल्पतरु तोचि परशुराम जगद्गुरु त्यासी चिंतितां इच्छित वरु दैन्यवारुनी देइजे ॥५३॥
हाच चरित्र कल्पतरु जगतीं मध्यें जालागुरु तेथें कृतार्थ होती शुकवरु ज्ञानामृत बिढारु सेउनी ॥५४॥
ऐसा यथार्थ गंथ श्रोते ह्मणती पूर्वीं न भूतोन भविष्यती जेथें सांगोनि ईशकीर्ती त्याप्रती तोषविलें ॥५५॥
जैसें श्रीहरी प्रीतीसी जगतीं मध्यें पद्म तुळसी कीं विष्णुपदी गंगा एकादशी तैसे त्द्या चरित्रानी प्रती असे ॥५६॥
परशुराम महेंद्रवासी शुक ठेवोनि देह पिंजर्‍यासी बोलविलें आपले चरित्रासीं स्वभक्तांसी तारावया ॥५७॥
श्रीपरशुरा्रामचरित्र नाम वदतां पापासी होय दहन त्‍हृदयीं प्रगटोनि परशुराम आणि प्रसाद करिती ॥५८॥
शुकासी जितुकें शिकवावें तितुकेंचि बोलतो ऐसें नवे तयासी पुष्कळ शिकवावें तेव्हां यथाशक्ती बोले तो ॥५९॥
तैशा परी माझी वाचा सारांश असे सित्धांतींचा श्रोते विचार करोत साचा श्रीहरी पदीं येवोत ॥६०॥
तेतीस अध्यायीं ओव्या चोविश्यें झाल्या सार्‍या तुळशीपुष्पा परी गुंफिल्या अर्पिल्या रामचरणीं ॥६१॥
त्द्या ग्रंथाचे प्रथम मध्यें अंतीं वर्णिला पूर्ण एक फरशुधर नारायण सर्वशास्त्रें वर्णिती जो ॥६२॥
त्या नारायण चरणीं मस्तक सर्वदा असो भक्तिभावात्मक त्याच्या भक्ताचाहि सेवक मी असें निश्चित पैं ॥६३॥
सर्वांचा कुलदेव नारायण नवसाचे होती अन्य जाण आपणां जोगेश्‍वरी महान अंब क्षेत्रींची ॥६४॥
दुसरे कुलदेव परशुराम आणि पुष्कळ सौम्य दारुण परी न सुटे एक नारायण ब्राह्मण जातीला ॥६५॥
सन्यास घेतला जरी तरी न सुटे नारायण हरी जो कां जन्मस्छिती लय करी सर्वोत्तम ईश्‍वर एकला ॥६६॥
जय सर्वोत्तमा लक्ष्मीवरा एका अनेक फल दातारा सत्य संकल्पा ईश्‍वरा फरशुधरा नमोस्तुते ॥६७॥
जय चिद्घन परमात्मा शिवविरिंची नुता पूर्णकामा रामाविरामा परशुरामा नारायणा नमोस्तुते ॥६८॥
श्लोक ॥ स्वानंदं कुल तीलकं भ्रुगोःपवित्रं श्रीरामं परशुधरं विचित्र लीलं ॥
ब्रह्मण्यं बृहदवतार वन्हिरुपं क्षत्रघ्नं दुरित हरं परं हि वंदे ॥१॥
सर्व प्राकृत ग्रंथाचा शेखरु जाला भांर्गव चरित्र कल्पतरु ऐकोनि तोषविती श्रीवरु आनंद विढारु सांपडे तयां ॥६९॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु ॥ त्रयःत्रिंशोऽध्याय गोड हा ॥३३॥
श्रीमत्परशुरांमार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु॥श्रीलक्ष्मीकेशव प्रसन्नोक्त॥श्रीरस्तु॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ३२