Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ९

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ९
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरेणुकानंदनाय नमः ॥
श्रीव्यास शिष्य ह्मणे ऐका कोणी एक समयीं रेणुका जला करितां गंगा तटाका कुंभ घेऊनी गेली असे ॥१॥
तेथें मत्स्यजला भीतरीं क्रीडाकरी सहनारी देखोनी ती प्रेमभरी आश्रमी येई लगबगा ॥२॥
उशीर जाला जावयासी नाहीं समजलें होम वेळेसी तरी देईल शापासी काय करावें ह्मणतसे ॥३॥
येऊनी कुंभ ठेविला पुढें अतिभयें स्पुंदत रडे अपराध क्षमावे येवढे विनवी हस्त जोडोनी ॥४॥
तंव ऋषी टक टका करी डोळयासी अंग थरारे क्रोधेंसी ह्मणे पुत्रा मर ईसी व्यभिचारिणीही सत्य ॥५॥
पितृवचन ऐकोनी पुत्र विचारकरिती मनांत जमदग्नी बोले अति क्रोधांत रामासी सांगे वधावयां ॥६॥
वसु मदा सहित मातेसी वधकरी रामा तूं निश्चयेंसी होतां ती आज्ञा वेगेंसी त्रयासी तात्काळ वधियेलें ॥७॥
प्रभाव जाणोनी मुनीचा तप समाधी सत्यवाचा गृहिता हाचि आज्ञेचा ह्मणोनी वर माग ह्मणतसे ॥८॥
कर्ता करविता ईश्‍वर वरमागें परशूधर जेवीं होईल आश्चर्य फार वर मागा ह्मणतसे ॥९॥
हे जमदग्नें मुनीवरा दयाशीला मम पितरा तूं इच्छितासी दातारा आणि दातृत्व तुझेंचि ॥१०॥
मातेसहित भ्रातर जीवंत व्हावे सत्वर मीं न मारिले ऐसें कर द्यावा वर मज हाचि ॥११॥
ऐसें मागतां तात्काळ उठिले तेचि सकळ ॥ निद्रेंतुनी जैसें बाळ तयापरी दीसती ॥१२॥
पित्याचें तप पराक्रमी परशुरामें जाणोनी सुत्दृ द्वय केला कारणी यश विचित्र दाविलें ॥१३॥
प्रसन्न करोनी मातापितर प्रश्न करीस भ्रातर जनोपकारी गौप्य फार अमृतापरी ॥१४॥
दुर्लभ हा जन्म ब्राह्मण ॥ त्यांत तुमचे पोटीं आमुचें जनन तरी कांहीं सांगावें साधन सर्वांलागीं तारक तें ॥१५॥
ब्राह्मणासी कोण दैवत्य वेदशास्त्रीं जें वर्णिलें सत्य तयाचें सांगावें मुख्य कृत्य कोण धर्मे वर्तावें ॥१६॥
प्रश्न ऐकोनी जमदग्नी सांगती पुत्रां लागोनी करावें ब्रह्मचर्य तप नी उक्त विधी करावा ॥१७॥
ब्राह्मणांसी लक्ष्मी नारायण शुभाशुभीं दैवत्य जाण त्याची मूर्ती एक शालग्राम आणिक सप्तविध असती ॥१८॥
मुख्य पूजन ब्राह्मणासी वेदमंत्रें शालग्रामासी यावांचूनि स्त्रि शुद्रासीं नाममंत्र तयाचा ॥१९॥
प्रातः काळीं उठोन ॥ विष्णू विष्णु पत्‍नी स्मरण सद्गुरु आई बापांचे नमन तुलसी नमावी आणिक ॥२०॥
स्त्रियांसी भूविष्णूचें वंदन पति चरणाचें स्मरण तुळसी वृंदावनीं प्रदक्षिण प्रातःकाळीं करावी ॥२१॥
शौच करावा यथाशुत्धी दंत धावन स्वच्छ आधीं हरिस्मरण पूर्व करुन विधी ब्राह्मणांसी अवश्य ॥२२॥
स्नानाविणें जो ब्राह्मण तो शूद्रचि होय जाण दुखणे करी यानें मार्जन तरी केलें पाहिजे ॥२३॥
मृल्लेपनादिकें स्नान धौत अस्पृष्ट वस्त्र परिधान कुशाजीन वस्त्राचें आसन वरी सम बैसावें ॥२४॥
घ्यावी स्योना पृथिवी ह्मणोनी मृत्तिका इमं मे मंत्रानें जल पुत्रका शोधन करावें विष्णोर्नुका मूलमंत्र लिहावा ॥२५॥
शुभ असावी मृत्तिका ती अवश्य होय तिलका किंवा तुलसी मूलमृत्तिका द्वारावती सर्वोत्कृष्ट ॥२६॥
उत्तम करावा संकल्प टिळे लावितां कर्म साफल्य टिळका वांचोनि निष्फल सर्व कर्म होतसे ॥२७॥
सुरचित लाविजे वेणु पत्रका त्‍हृदयीं लेखन पद्म कलिका द्वादश संख्या तिलका सांतराल करावें ॥२८॥
ब्राह्मणांसी पुंड ऊर्ध्व ऊर्ध्वलोक प्राप्त्यर्थ सर्व तर्जनी करोनी लाव भक्तिभावें करोनी ॥२९॥
ललाटी लाविजे केशव वक्षस्थळें श्रीमाधव कंठामध्यें गोविंद लाव उदरे नारायण जाण ॥३०॥
विष्णु कुक्षौ दक्षिण त्याचि बाहु मधुसूदन दुसरे बाहौ त्रिविक्रम वामकुक्षी ॥३१॥
मन त्दृषीकेश कंधर दक्षिण स्तनीं श्रीधर त्रिक पृष्ठी दामोदर पद्मनाभ पृष्ठासी ॥३२॥
हस्तक्षालन तो यानी वासुदेव तु मूर्धनी ऐसे तिलक द्विजांनीं मग मुद्रा लाविजे ॥३३॥
दक्षिणाम्गीं पद्मचक्र वामभागीं गदां शंख ललाटीं नाम मुद्रा मुख्य नारायणाची ॥३४॥
सुदर्शनाय विद्महे० आणिये न देवाः पवित्रेणा० असे चक्राचे दोन मंत्र पांच जन्याय विद्महे हा मंत्र ॥
चमूषत्छेनः० गदेचा ॥ पद्मानने पद्माचा मंत्र ॥ नारायण मुद्रेचा नारायणाय विद्महे० ॥३५॥
ऐशा पंचमुद्रा होत प्रार्थोनि जे लावित तयाचें पुण्य अनंत वेदपुराणीं वर्णिलें असे ॥३६॥
सदां सर्वदां ब्राह्मणांसी गोपीचंदनाचे तिलकासी लाविले पाहिजे मुद्रिकेसी नाहीं तरी सत्कर्म व्यर्थ ॥३७॥
शुद्र आणि स्त्रियांनीं कपाळीं लावणें प्रीती करुनी अखंड तिलक सुवासिनीनीं रात्रंदिनीं कुंकुमाचा ॥३८॥
तुलसी अक्षमाला यज्ञोपवित गोपीचंदन मुद्रिका सूक्त पाहिजे द्विजांसी अत्यंत पालाश दंड ब्रह्मचर्यासी ॥३९॥
तुलसी अक्ष धारणासी मिश्रित । मण्यांची संख्या द्वादश शत जपासी अष्टोत्तरशत आणीक यथा लाभ घ्यावे ॥४०॥
तिलक मुद्रा लावोनी प्राणायाम करोनी सुमनीं लक्ष्य देवोनि अर्घ्यदानीं जप उपस्थान करावें ॥४१॥
होमविधी संध्या करोनी पूजा मंडपीं जावोनी तेथें बैसोनी स्थिरासनीं ध्यान करावें जनार्दनाचें ॥४२॥
नानाविध न्यास करुनी षोडशोपचारें पूजोनी पुनरावाहुनी त्‍हृदयस्थानीं प्रसादें पार्षद पूजावे ॥४३॥
तीर्थ तुलसी चंदनादी धूपशेष अक्षतादी येणें अलंकृत यथाविधी मग प्रसाद जेवावा ॥४४॥
ऐसें करावें नित्यपूजन नारायणाचें आराधन नाना मंत्रांचें अनुष्ठान पठण करावे वेदादिक ॥४५॥
येणे विधी ब्राह्मणांनीं राहाटावें तत्व विचारणीं सर्वकाळ हरिस्मरणीं असावें शुद्धपणें ॥४६॥
सर्व नारायणासी अर्पण गृहदारा पुत्रद्रव्य आपण ई‍श्‍वराधीन जगज्जाण ईश चरणीं लीन हो ॥४७॥
ब्राह्मनाचा हा सदाचार वर्णिला तुज विस्तार सार ऐकतां होय मनोहर मुनीयांसी ॥४८॥
वसुमदादिक परशुराम राहोनिते आज्ञापालन मातापितरांसी वंदिती जाण ईश्‍वर माहात्म्य येणेपरी ॥४९॥
स्वस्ति श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु नवमोध्याय गोड हा ॥९॥
श्रीभ्रुगुकुलटिळकार्पणमस्तु॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ८