Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंचामृत पवित्र का मानले जाते? या पाच दिव्य पदार्थांचे महत्त्व काय आहे?

Panchamrut
हिंदू धर्मात पंचामृत हे केवळ एक मिश्रण नसून त्याला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व दिले जाते. 'पंच' म्हणजे पाच आणि 'अमृत' म्हणजे देवलोकातील पेय, जे अमरत्व देते. पूजेमध्ये देवाचा अभिषेक करण्यासाठी आणि नैवेद्य म्हणून याचा वापर केला जातो. तसेच पंचामृत हे हिंदू पूजेतील एक पवित्र नैवेद्य आहे, परंतु त्याचे घटक आणि उपयोग वेगवेगळे आहे. भक्तीभावाने त्याचे सेवन केल्याने व्यक्तीची पापे आणि दुःखे नष्ट होतात आणि आत्मा शुद्ध होतो. पंचामृत हे दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच दिव्य घटकांचे मिश्रण आहे. याचा उपयोग देवतेला अभिषेक करण्यासाठी केला जातो. नंतर भक्त प्रसाद म्हणून त्याचे सेवन करतात.

सनातन धर्मात पंचामृताला विशेष महत्त्व आहे. ते केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही त्याचे अनेक फायदे आहे. पंचामृताशिवाय कोणताही धार्मिक विधी अपूर्ण मानला जातो. पंचामृताचा उपयोग प्रामुख्याने देवतांना अभिषेक करण्यासाठी केला जातो. देवतेला त्यात स्नान घातले जाते. यानंतर, ते भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाते.

असे मानले जाते की भक्तीभावाने त्याचे सेवन केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो आणि दुःख व पापे नष्ट होतात. धार्मिक महत्त्वाबरोबरच, पंचामृताचे आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यातील दूध शरीराचे पोषण करते आणि मनाला शांत करते. दही पचनसंस्था सुधारते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. मध शरीरासाठी फायदेशीर असून त्याला गोडव्याचे प्रतीक मानले जाते. साखर ऊर्जा देते आणि थकवा कमी करते. दुसरीकडे, तूप शरीराला शक्ती देते आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. अशाप्रकारे, पंचामृत केवळ धार्मिक दृष्ट्याच महत्त्वाचे नाही, तर त्याचे सेवन आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.  

पूजेनंतर पंचामृत घेताना ते नेहमी उजव्या हाताच्या तळव्यात घेऊन प्राशन केले जाते. हे घेताना मनात शुद्ध विचार असावेत, जेणेकरून त्याचा आध्यात्मिक लाभ पूर्णपणे मिळावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: रामायण आणि महाभारत यांच्यातील हे १० प्रमुख फरक तुम्हाला माहित आहे का?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sridevendrakrita Srimat Somasundara Stuti श्रीदेवेन्द्रकृत श्रीमत् सोमसुन्दर स्तुतिः