Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कालिया नाग कोण होता आणि यमुनेत का लपला होता ?

कालिया नाग कोण होता आणि यमुनेत का लपला होता ?
, मंगळवार, 9 जून 2020 (07:37 IST)
पुराणांनुसार ऋषी कश्यपांच्या पत्नी कद्रू पासून त्यांना अनेक नागांची उत्पती झाली होती. जसे की अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पिंगला, पद्म, महापद्म, शंख, कुलिक, चूड़, धनंजय इत्यादी. अग्नीपुराणात तब्बल ८० प्रकारांच्या नागांच्या कुळाचे वर्णन केले आहेत. असे म्हणतात की कालिया नाग देखील कद्रुचें पुत्र आणि पन्नग जातीचे नागराज असे.

कालिया नाग पूर्वी रमण नावाच्या बेटांवर राहत होते. असे म्हणतात की पक्षिराज गरुड यांच्याशी त्यांची शत्रुता वाढल्यावर ते आपल्या बायकांसह यमुनेत वास्तव्यास आले. 
 
त्यांना ठाऊक होते की ही जागा सर्वोपरी सुरक्षित आहे आणि या स्थळी गरुड येऊ शकणार नाही. कारणं याच स्थळी तपस्वी सौभरींच्या म्हटल्यावर देखील गरुड यमुनेत असलेल्या मासे खाऊन टाकायचा. या मुळे संतप्त होऊन तपस्वींनी त्याला श्राप दिले होते की जर का आता तू इथे येऊन मास्यांना भक्षण करशील तर तू मृत्यूला प्राप्त होशील. हेच कारणं असे की कालिया नाग इथे लपून राहत असे.
 
कालियाच्या विषामुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते. जेणे करून गोकुळवासीयांना पाणी मिळत नव्हतं. कालिया कुंडाच्या जवळ जर कोणी जात असे कालिया त्याला खाऊन टाकत असे. त्यामुळे त्याला कालिया दाह म्हणत असे. 
 
असे म्हणतात की एकदा श्रीकृष्णाचा चेंडू यमुनेच्या कुंडात पडला. श्रीकृष्ण चेंडू घेण्यासाठी यमुनेच्या त्या भागात झेप टाकतात. पाण्याखाली जाऊन कालिया नागाशी युद्ध करतात आणि त्याला शरण येण्यास भाग पाडतात. तेव्हा कालिया जीवाची भिक्षा मागतात. तेव्हा कृष्ण त्याला म्हणतात की तू तिथेच जाऊन वास्तव्य कर जेथे आधी वास्तव्यास होता. 
 
यावर कालिया म्हणतो की प्रभू तिथे आपले सेवक पक्षीराज गरुड आहे जे माझे शत्रू आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या डोक्यावर माझ्या पायाचे ठसे उमटलेले बघून तो आपल्याला काहीच करणार नाही. कालिया नाग आपल्या बायकांसह परत रमण बेटांवर निघून जातात. भारतात नल, कवर्धा, फणि-नाग, भोगिन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदि, शिशूनंदी किंवा यशनंदी, तनक, तुश्त, ऐरावत, धृतराष्ट्र, अही, मणिभद्र, अलापत्र, कम्बल, अंशतर, धनंजय, कालिया, सौंफू, दौद्धिया, काली, तखतू, धूमल, फाहल, काना, गुलिका, सरकोटा या नावानी नागवंशीय आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चतुर्थी तिथीच्या मागील 8 रहस्य, जाणून घ्या प्रत्येक चतुर्थीचा प्रभाव