Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तमिळनाडूतील मकरसंक्रांत अर्थात पोंगल

तमिळनाडूतील मकरसंक्रांत अर्थात पोंगल
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (08:27 IST)
तमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेला येतो. हा शेतकऱ्यांचा उत्सव मानला जातो. तो तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पशूधनाची पूजा केली जाते.
webdunia
पोंगलच्या दिवशी स्नान करून अंगणात मातीच्या नव्या भांड्यात खीर बनवली जाते. त्याला पोंगल असे म्हणतात. त्यानंर सूर्याला नैवैद्य दाखविला जातो. मग ही खीर प्रसाद म्हणून लोक भक्षण करतात. या दिवशी मुलगी व जावयाला घरी बोलावून त्याचे आदरातिथ्य केले जाते. तिसऱ्या दिवशी घरातील जनावरांना सजविले जाते. त्यांची मिरवणूक काढली जाते. पोंगल या उत्सवात मुलींचे खूप महत्त्व आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांती विशेष : या संक्रांतीला ग्रहांचे विशेष योग, हे दान करा