ज्याने पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याची मृत्यू निश्चित आहे. कोणी कितीही शक्तिशाली असला तरी त्याला एक दिवस मरायचे आहे हे निश्चित आहे. आमच्या शास्त्रांमध्ये आणि पुराणात मृत्यू अगोदर काही संकेतांबद्दल सांगण्यात आले आहे. गरूड पुराणानुसार मृत्यू अगोदर प्रत्येक व्यक्तीला काही संकेत मिळू लागतात.
मृत्यू जवळ आल्याचे हे आहे 10 संकेत
1- जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येऊ लागतो तर त्याची सावली त्याचा साथ सोडून देते. त्याची सावली पाणी आणि तेलात देखील दिसत नाही.
2- जेव्हा व्यक्ती परलोकात जाणार असतो तर त्याला त्याचे पितर जवळपास दिसण्याचा आभास होऊ लागतो. त्याला कोणी त्याचा सोबत आहे असे वाटू लागत.
3- मृत्यूच्या काही दिवस आधी व्यक्तीच्या शरीरातून एक वेगळ्या प्रकारचा गंध येऊ लागतो. हा गंध त्याला याच्या आधी कधीही जाणवला नाही.
4- जेव्हा आरशात आपल्या चेहर्याच्या जागेवर कोणा दुसर्याचा चेहरा दिसू लागतो तेव्हा समजून घ्यायला पाहिजे की त्याचा मृत्यू जवळ आला आहे.
5- जेव्हा व्यक्तीला चंद्रावर भेग दिसू लागेल तेव्हा ह्या गोष्टीचे संकेत आहे की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
6- जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर पिवळे आणि हलके होऊ लागतात तेव्हा समजावे की त्याचा मृत्यू जवळ आला आहे.
7- ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असतात त्यांना त्यांच्यासमोर एक दिव्य प्रकाश दिसू लागतो आणि व्यक्ती मृत्यूच्या वेळेस देखील भयभीत होत नाही.
8 - जेव्हा व्यक्तीला चंद्र आणि सूर्याची चमक दिसत नाही तर समजून घ्या की त्याच्या मृत्यू जवळ आला आहे.
9- जेव्हा व्यक्तीचे नाक, तोंड आणि जीभ जड होऊ लागते तेव्हा समजून घ्या की त्याचा मृत्यू लवकरच होणार आहे.
10- मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीच्या डोळ्यांचा प्रकाश जाऊ लागतो, त्याला जवळ बसलेले व्यक्ती देखील दिसत नाही.