अविवाहित असताना देखील कुंतीने कर्णाला जन्म दिला होता. समाजाच्या कलंकांपासून वाचण्यासाठी तिने कर्णाला स्वीकार केले नाही. कर्णाचे पालन एका रथ चालवणार्या व्यक्तीने केले ज्यामुळे कर्ण सूतपुत्र म्हणून ओळखू लागला. कर्णाला दत्तक घेणारे त्याचे वडील आधीरथ यांची इच्छा होती की कर्णाने विवाह केला पाहिजे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्णाने रुषाली नावाच्या ऐका सूतपुत्रीशी विवाह केला. कर्णाच्या दुसर्या बायकोचे नाव होते सुप्रिया. सुप्रियाचे वर्णन महाभारताच्या कथेत जास्त आलेले नाही आहे.
रुषाली आणि सुप्रियाकडून कर्णाला 9 पुत्र झाले होते. वृशसेन, वृषकेतू, चित्रसेन, सत्यसेन, सुशेन, शत्रुंजय, द्वीपात, प्रसेन आणि बनसेन. कर्णाचे सर्व पुत्र महाभारताच्या युद्धात सामील झाले होते, ज्यात 8 वीरगतिला प्राप्त झाले होते. प्रसेनची मृत्यू सात्यकीच्या हाताने झाली, शत्रुंजय, वृशसेन आणि द्विपातची अर्जुन, बनसेनची भीम, चित्रसेन, सत्यसेन आणि सुशेनची नकुलाद्वारे मृत्यू झाली होती.
वृषकेतू एकमात्र असा पुत्र होता जो या युद्धा जीवित राहिला होता. कर्णाच्या मृत्यू पश्चात त्याची पत्नी रुषाली त्याच्या चितेत सती झाली होती. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा पांडवांना ही बाब कळली की कर्ण त्यांच्याच ज्येष्ठ होता, तेव्हा त्यांनी कर्णाचे जीवित पुत्र वृषकेतूला इंद्रप्रस्थाची गादी सोपवली होती. अर्जुनाच्या संरक्षणात वृषकेतूने बरेच युद्ध लढले होते.